Marathi Bhasha Gaurav Din 2023 : कवी वि. वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्रच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिलं. मराठी कवितेला कुसुमाग्रजांनी एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं. शिवाय महाराष्ट्राच्या मायबोलीला साहित्यात विशेष स्थान निर्माण करुन देण्यात कुसुमाग्रजांचं मोलाचं योगदान आहे. मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले.
Marathi Bhasha Gaurav Din 2023 : मराठी भाषा गौरव दिन
कुसुमाग्रजांचं मूळ नाव विष्णू वामन शिरवाडकर. कुसुमाग्रज यांचा जन्म नाशिक येथे 27 फेब्रुवारी 1912 रोजी झाला. नाशिकच्या निफाड तालुक्यातील शिरवाडे हे त्यांचं जन्मगाव वि. वा. शिरवाडकर यांच्या मोठ्या बहिणीचं नाव कुसुम होते. त्या नावावरुनच त्यांनी कवी म्हणून कुसुमाग्रज हे नाव वापरलं. कुसुमाग्रज यांनी आपल्या आत्मनिष्ठ प्रतिभेने आणि समाजनिष्ठ भावस्पर्शी लेखणीने जागतिक दर्जाचे लेखन केलं. आपल्या मातृभाषेचा गौरव म्हणून आणि कुसुमाग्रज यांना अभिवादन सरकारने म्हणून त्यांचा जन्मदिवस 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय 21 जानेवारी 2013 रोजी घेण्यात आला. तेव्हापासून 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो.
'मराठी भाषा गौरव दिन' आणि 'मराठी राजभाषा दिन' यामधील फरक
आज 27 फेब्रुवारी रोजी कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिन मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. तर 1 मे हा दिवस मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. मराठी भाषा गौरव दिन आणि मराठी राजभाषा दिन दोन्ही महत्त्वाचे आहेत. 1 मे 1960 ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. राज्य कारभाराची अधिकृत भाषा म्हणून मराठी भाषेला मान्यता देण्यात आली. तेव्हापासून 1 मे दिवस हा 'मराठी राजभाषा दिन' किंवा 'मराठी भाषा दिन' म्हणून साजरा केला जातो.
Marathi Bhasha Gaurav Din Wishes : मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठीजाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी!मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
माझा शब्द माझे विचार, माझा श्वास माझी स्फूर्ती, माझ्या रक्तात मराठी, माझी माय मराठी!मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
माझा मराठीचे बोलू कौतुके परी अमृतातेही पैजासी जिंके, ऐसी अक्षरे रसिके मिळविनमराठी भाषा गौरव दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
आम्हाला गर्व आहे आम्ही मराठी असल्याचा...मराठी भाषा गौरव दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, हिच्या संगाने जागल्या दऱ्याखोऱ्यातील शिळामराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
मराठी भाषा सहज सुलभ आणि मधाळमराठी भाषा आहेच अशी रसाळमराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, मराठ्यांशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राच्या मातीलामराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
रुजवू मराठी, फुलवू मराठीचला बोलू फक्त मराठीमराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
जगत राहावी, शिकत राहावीसमजत राहावी, हसत राहावी अशी ही मायाशब्दांच्याही पलीकडल्या भावनांनाअखंड उमलवणारी ही मातृभाषेची कोवळी मायामराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
माझा स्वाभिमानसर्व भाषांची राजभाषा असे मराठीभाग्य आहे अमुचे, नसे बोलणे कधी गर्वापोटीधर्म मराठी, कर्म मराठी,मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!