मुंबई : 'दिल्लीत बसलेला तो शेंबडा मुलगा गतीमंद आहे', असे म्हणत अभिनेते शरद पोंक्षे यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. दरम्यान महात्मा गांधीपेक्षा स्वातंत्र्यवीर सावरकर श्रेष्ठ असं विधान आपण केलं नाही, तर माध्यमांनी याचा विपर्यास केल्याचा दावा शरद पोंक्षे यांनी केला आहे.

पिंपरी चिंचवड येथे आयोजित केलेल्या 'सावरकर विचार दर्शन' या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. दरम्यान महात्मा गांधींपेक्षा स्वातंत्र्यवीर सावरकर श्रेष्ठ असं विधान आपण केलं नाही, माध्यमांनी याचा विपर्यास केल्याचा दावा शरद पोंक्षेनी केला.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासंबंधी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. मराठी अभिनेते शरद पोंक्षे यांनी राहुल गांधी यांच्या या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. 'दिल्लीत बसलेला तो शेंबडा मुलगा मतिमंद आहे, असं म्हणत काँग्रेसचे नेते राहुल गांधींवर टीका उडवली. मला राहुल गांधींचे आभार मानायचे आहेत. त्यांनी एक-दोन महिन्याने असे वक्तव्य करावेत. मी त्यांच्यावर चिडत नाही, उलट त्यांचे आभार मानायचे आहे. कारण त्या निमित्ताने आम्ही जागे होतो.

sharad Ponkshe | गांधीपेक्षा सावरकर श्रेष्ठ असं म्हणालोच नव्हतो : शरद पोंक्षे | ABP Majha



सावरकरांचे कार्य हे आंबेडकर-फुलेंच्या तोडीसतोड आहे. मात्र सावरकरांचा अपमान झाल्यावर एकही ब्राह्मण रस्त्यावर येत नाही. फक्त घरात सोफ्यावर बसून बोलतात अशी खंत पोंक्षे यांनी यावेळी व्यक्त केली. गांधीवाद हा समस्येवरील तात्पुरता उपाय तर सावरकरांचे विचार म्हणजे समस्येवरील कायमस्वरूपी तोडगा असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं. हेच सांगताना अहिंसेचं लोण हे शिवाजी महाराजांच्या काळात नव्हतं हे एक बरं झालं. नाहीतर आज या महिला इतक्या रात्री इतक्या नसत्या,अशी टिपणी देखील त्यांनी या वेळी केली.

देशातील बलात्काराच्या वाढत्या घटनांवर बोलताना राहुल गांधी यांनी देशाचा उल्लेख 'रेप इन इंडिया' केला होता. या वक्तव्यावरून राहुल गांधींनी माफी मागावी अशी मागणी भाजपने केली होती. त्यावर काँग्रेसच्या 'भारत बचाओ' रॅलीत राहुल गांधी यांनी भाजपवर निशाणा साधला. "मी माफी मागणार नाही. मी राहुल सावरकर नाही, राहुल गांधी आहे", असं राहुल गांधींनी म्हटलं होतं. मी मरेन मात्र माफी मागणार नाही. नरेंद्र मोदी यांनी देशाची माफी मागायला हवी. मोदींचे असिस्टंट अमित शाह यांनी देशाची माफी मागायला हवी, असं राहुल गांधी यांनी म्हटलं होतं.