Manoj Jarange : जे आपल्याला संपवायला निघालेत, त्यांना संपवण गरजेचं आहे. संपवण्यातसुद्धा विजय असतो असे मत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी व्यक्त केले. उभा राहूनच विजय मिळावा असं काही नसतं, हरवण्यातसुद्धा विजय असतो. समाज राजकारण करण्यासाठी एकत्र आला नव्हता, असेही जरांगे म्हणाले.
मराठा आंदोलक मनोज जरांगे हे उद्या आपली राजकीय भूमिका जाहीर करणार आहेत. ते पाडणार की उमेदवार उभे करणार? हा प्रश्न अनुत्तरीत असतानाच, आज झालेल्या राजकीय तज्ञ अभ्यासक आणि वकिलांसोबतच्या बैठकीनंतर मनोज जरांगे यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवरून ते लोकसभेप्रमाणे यावेळी देखील पाडापाडीचीच भूमिका घेऊ शकतात असा अंदाज वर्तवला जातोय. मनोज जरांगे यांनी आज झालेल्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना याचे संकेत दिले आहेत. उभा राहूनच विजय मिळावा असं काही नसतं, ठरवण्यात सुद्धा विजय आहे असं मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.
उद्याच्या बैठकीत होणार निर्णय
राज्यात विधानसभा निवडणुकीचे (Maharashtra Assembly Elections 2024) बिगुल वाजले आहे. मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी गेल्या अनेक महिन्यांपासून रस्त्यावर उतरलेले मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी राज्यात निवडणुका जाहीर होताच आपला संताप व्यक्त केला. आता या निवडणुकीमध्ये निर्णायक मतदान हे मराठ्यांचे आहे. आता रणशिंग फुंकले आहे. लढाईला उतरायचं म्हणजे तलवार काढावी लागेल. सरकारने मराठा आरक्षणाबाबत आमची आशा संपवली असल्याचे त्यांनी म्हटले होते. दरम्यान, मनोज जरांगे पाटील आगामी विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Elections 2024) उमेदवार पाडायचे की लढवायचे याचा निर्णय समाज बांधवांसमोर निर्णायक बैठकीत उद्या (ता.20 सप्टेंबर) घेणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
मनोज जरांगे समर्थकांनी भाजप नेते संजय केनेकर यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळला.
भाजप नेते संजय केनेकर यांनी छत्रपती संभाजी नगरमध्ये मनोज जरांगे यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ मनोज जरांगे समर्थकांकडून संजय केनेकर यांचां पुतळा जाळण्यात आला. जालन्यातील भोकरदन येथे मनोज जरांगे समर्थकांकडून जोरदार घोषणाबाजी करत केनेकर यांच्या वक्तव्याचा यावेळी निषेध करण्यात आला. काल केनेकर यांनी मनोज जरांगे यांच्या विरोधात वक्तव्य केले होते. त्याचाच निषेध करत जोडे मारुन त्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याच यावेळी दहन करण्यात आले.
महत्वाच्या बातम्या:
Manoj Jarange Patil : उमेदवार पाडायचे की लढवायचे याचा निर्णय समाज बांधवांसमोर निर्णायक बैठकीत होणार; मनोज जरांगेंचा इशारा