सांगली : सांगलीत आज मराठा मोर्चा काढला जाणार आहे. कोपर्डीतील बलात्कार प्रकरणाच्या निषेधार्थ राज्यभर मराठा समाजाचे मोर्चे काढले जात आहेत.

मोर्चादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून 1800 पोलिस कर्मचारी, 750 होमगार्ड, एसआरपीएफच्या 4 तुकड्या, 9 विभागीय पोलिस अधिकारी, 5 पोलिस उपअधीक्षक, असा चोख बंदोबस्त सांगलीत तैनात केला आहे.

विश्रामबाग येथील कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यापासून या मूक मोर्चाला सुरवात होईल आणि राम मंदिर चौक येथे मोर्चाची समाप्ती होईल. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सांगली शहरातली वाहतूक सकाळी 6 पासूनच बंद करण्यात आली आहे.

मोर्चासाठी हजारो महाविद्यालयीन तरुण आणि तरुणींना स्वयंसेवक म्हणून नेमण्यात आलं आहे. या मोर्चात सीमेवरील कर्नाटकच्या गावांमधून तसंच कोल्हापूरमधूनही आंदोलक सहभागी होणार आहेत.

तसंच आजच्या मूक मोर्चात पतंगराव कदम, विश्वजित कदम, जयंत पाटील, आर आर पाटील यांचे कुटुंबीय, सर्व आमदार आणि खासदार संजय पाटील हजेरी लावणार आहे.