नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्याचा निर्णय तेल कंपन्यांनी घेतला आहे. पेट्रोल एक पैसा प्रति लीटर रुपये तर डिझेल 44 पैसे प्रति लीटरने महाग झालं आहे. मध्यरात्रीपासून हे नवे दर लागू होतील.

यापूर्वी 1 एप्रिलला पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी कपात करण्यात आली होती. पेट्रोल प्रति लीटर 3.77 रुपये तर डिझेल प्रतीलिटर 2.91 रुपयांनी स्वस्त झालं होतं. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण झाल्यानं पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झाले होते.

दरम्यान, सोने-चांदी दराप्रमाणे यापुढे आता दररोज पेट्रोल-डिझेलचेही दर ठरणार आहेत. 1 मेपासून सुरुवातील 5 शहरांत दररोज पेट्रोल-डिझेलचे दर पाहायला मिळतील.

पाच शहरांमध्ये पाँडेचरी, विशाखापट्टणम (आंध्र प्रदेश), उदयपूर (राजस्थान), जमशेदपूर (झारखंड) आणि चंदीगढ यांचा समावेश आहे. दैनंदिन इंधन दराचा हा प्रयोग यशस्वी झाल्यास, देशभरात या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

एका पैशाचं महत्व का?

पेट्रोलची एका पैशाने झालेली वाढ पाहून अनेकांना या दर वाढीबद्दल वेगवेगळे प्रश्न पडले. मात्र भारतासारख्या देशामध्ये एका पैशाचंही मोठं महत्व आहे. 2013 च्या आकडेवारीनुसार देशात दररोज 58 कोटी 19 लाख 40 हजार लीटर पेट्रोलची विक्री होते. यानुसार एका पैशाने झालेल्या दर वाढीमुळे देशात 58 लाख 19 हजार 400 रुपयांची उलाढाल वाढेल.

संबंधित बातम्या :

दारुबंदीचा फटका पेट्रोलला, पेट्रोल 3 रुपयांनी महागलं


इंधनात महा'ग'राष्ट्र, देशात सर्वात महाग पेट्रोल महाराष्ट्रात!


पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी कपात