मुंबई : राज्यातल्या प्रत्येक सिनेमागृहात राष्ट्रगीताअगोदर आता दादासाहेब फाळके यांच्या आयुष्यावरील एक शॉर्टफिल्म अर्थात लघुपट दाखवला जाणार आहे. आज 54 व्या महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी ही घोषणा केली.


54 वा महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळा आज वांद्रे रेक्लेमेशन येथे पार पडला. त्यावेळी राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी ही घोषणा केली. भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक असणारे दादासाहेब फाळके यांची आज 147 जयंती देखील आहे. त्यानिमित्त फाळकेंचं स्मरण म्हणून हा निर्णय घेतला गेला आहे. 55 सेंकदाची ही शॉर्टफिल्म असेल.

55 सेकंदाचं ही शॉर्टफिल्म असेल. दादासाहेब फाळकेंचा जीवनपट या 55 सेकंदांमध्ये उलगडून दाखवला जाणार आहे. व्हेंटिलेटरचे दिग्दर्शक राजेश मापुसकर यांनी या लघुपटाची निर्मिती केली आहे.