Maratha Reservation Special Assembly session : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) देण्यासाठी काही वेळात विशेष अधिवेशनाला सुरवात होणार असून, त्यापूर्वी मोठ्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकीकडे महाविकास आघाडीची (Maha Vikas Aghadi) बैठक सुरु झाली आहे. तर दुसरीकडे कॅबिनेट बैठकीला सुरुवात झाली आहे. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) देखील उपस्थित राहणार आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाबाबत होत असलेल्या विशेष अधिवेशनापूर्वी राजकीय हालचालींना वेग आल्याचे दिसत आहे. 


मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष अधिवेशनाची घोषणा केली होती आणि त्यानुसार आज हे अधिवेशन होत आहे. त्यामुळे सर्वच आमदार आज मुंबईत असून, अनेकजण विधानसभेत पोहचले आहेत. विशेष म्हणजे अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरवात झाली आहे. या बैठकीत सर्वच मंत्री आणि मुख्यमंत्री यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री देखील उपस्थित आहेत. त्यामुळे आज मराठा आरक्षणाबाबत नेमकं कोणत्या घडामोडी घडतात आणि विशेष अधिवेशनात काय निर्णय होणार हे पाहणं महत्वाचे असणार आहे. 


महाविकास आघाडीच्या बैठकीला सुरवात...


मराठा आरक्षणाबाबत आज बोलवण्यात आलेल्या विशेष अधिवेशनात महत्वाचा निर्णय होणार आहे. दरम्यान एकीकडे कॅबिनेटची बैठक सुरु झाली असतानाच, दुसरीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीला देखील सुरवात झली आहे. आजच्या अधिवेशनात मराठा आरक्षणाबाबत आपली काय भूमिका असावी, कोणते मुद्दे मांडायचे आणि कोणत्या नेत्यांने कोणत्या मुद्द्यावर बोलायचे याबाबतीत या बैठकीत चर्चा होत असल्याची माहिती मिळत आहे. 


अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया... 


दरम्यान, विरोधी पक्षनेते अंबादास यांची देखील प्रतिक्रिया येत असून, आज आरक्षणाबाबत चर्चा होणार आहे. मराठा समाजाला याआधी देखील आरक्षण देण्यात आले होते. पृथ्वीराज चव्हाण, देवेंद्र फडणवीस यांच्याही काळात आरक्षण दिले होते. त्यामुळे आज आरक्षण दिले आणि ते 50 टक्क्यांच्या वर दिले तर हे लबाडाच्या घरचे आमंत्रण आहे. मनोज जरांगे यांची भूमिका काय आहे. निवडणुकीच्या हेतून आरक्षण देण्याचा प्रयत्न सरकार करत आहेत. त्यामुळे मराठा समाजाची पुन्हा फसवणुक करण्याचा हेतू असल्याचा आरोप दानवे यांनी केला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


Manoj Jarange : माघार नाही अन् सुट्टी देखील नाही; अधिवेशनापूर्वी मनोज जरांगे सगेसोयरे अध्यादेशावर ठाम