जालना (आंतरवाली सराटी) : मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) सरकारने आज विशेष अधिवेशन बोलावले असून, यापूर्वी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी पत्रकार परिषद बोलावून अप्ळू भूमिका स्पष्ट केली आहे. "आमचं आंदोलन सगेसोयरे अध्यादेशाच्या अमलबजावणी करण्यात यावी यासाठी सुरु आहे. त्यामुळे आजच्या अधिवेशनात सगेसोयरे अध्यादेशाच्या अमलबजावणी करण्यात यावी अशी आमची मागणी आहे. अन्यथा माघार नाही अन् सुट्टी देखील नाही असा थेट इशारा मनोज जरांगे यांनी सरकारला दिला आहे.
यावेळी बोलतांना मनोज जरांगे म्हणाले की, "मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे यासाठी आम्ही आंदोलन उभं केलं आहे. त्यामुळे सरकारला विनंती आहे आजच्या विशेष अधिवेशनामध्ये सगेसोयऱ्याचा अध्यादेशाची अंमलबजावणी करावी. मराठा समाजातील सर्व आमदारांनी हा विषय लावून धरावा. मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण हवं अशी मागणी आमदारांनी करावी. आजच्या अधिवेशनात सर्वात आधी सगेसोयरे विषयावर चर्चा करावी. सगेसोयरे हा विषय किती महत्वाचा आहे हे सरकारला माहीत असून, आता त्यांनी पुन्हा याची माहिती करून घेऊ नका, असे जरांगे म्हणाले.
राज्यात प्रचंड मोठं आंदोलन उभं केलं जाईल
सरकारने स्वतः सगेसोयरे शब्द दिला होता. त्यांनी आता त्यांचा शब्द पाळावा. आमची मागणी मान्य न झाल्यास राज्यात प्रचंड मोठं आंदोलन उभं केलं जाईल. तुम्ही देत असलेला आरक्षण आम्ही नाकारलं नाही. मात्र, सगेसोयरेप्रमाणे करोडो मराठ्यांना आरक्षण हवे होते आहे. फक्त मोजक्या शंभर दोनशे लोकांसाठी हे नवीन आरक्षण दिले जात आहे. मात्र, मराठ्यांची मागणी ओबीसीमधून आरक्षणाची आहे. त्यामुळे शंभर दीडशे मराठे महत्त्वाचे आहे की, सहा करोड मराठे महत्त्वाचे आहे याचे उत्तर आता सरकारला द्यावा लागणार असल्याचे जरांगे म्हणाले आहेत.
गेल्यावेळी स्वतंत्र आरक्षण दिलं त्याचं काय झालं...
स्वतंत्र आरक्षण देण्याची मागणी मराठ्यांची नाहीच. शंभर दीडशे लोकांनी मागणी केल्याने लगेच विशेष अधिवेशन बोलवण्यात आले. आम्ही पाच ते सहा महिन्यापासून मागणी करत आहोत त्याचं काय?, गेल्यावेळी स्वतंत्र आरक्षण दिलं त्याचं काय झालं. मुलांना आरक्षण मिळालं, त्यांना नोकरी लागली आणि आरक्षण रद्द झालं. आता त्या मुलांना नियुक्ती मिळत नसून, गावाकडे जाणं देखील त्यांना अवघड झालं आहे. त्यामुळे ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या त्यांच्यासाठी सगेसोयरे अध्यादेश महत्वाचा असल्याचं जरांगे म्हणाले आहेत.
शिष्टमंडळावर टीका...
आता कोणताही शिष्टमंडळ येत नाही. मला खोटं बोलता येत नाही. मी मागील पुढे सगळं खरं खरं सांगून देतो. या लोकांना आता आंदोलनासाठी वेळ मिळत नाही. विमानात वेगवेगळ्या ठिकाणी फिरण्यासाठी त्यांच्याकडे वेळ असल्याचं जरांगे म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या :