Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्यावर सुरू असलेले आंदोलन शमवण्यासाठी न्या. शिंदे समितीच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला. मात्र, उपोषणावर असलेल्या मनोज जरांगे यांनी सरकारचा निर्णय अमान्य असल्याचे म्हटले आहे. सरकार ने घेतलेले आजचा एकही निर्णय आम्हाला मान्य नाही. अर्धवट प्रमाणपत्र घेणार नाही आणि वाटू देणार नाहीत, असेही मनोज जरांगे यांनी म्हटले. मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी त्यांनी केली. सरकारने पावले न उचलल्यास उद्यापासून पाणी घेणेही बंद करू, पुढील परिणामाला सरकार जबाबदार असेल असेही त्यांनी म्हटले. बीडमधील हिंसाचार प्रकरणी निर्दोष मराठा युवकांना अटक करण्यात आली असून ही दडपशाही बंद करावी असा इशाराही जरांगे यांनी दिला.


मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटीमध्ये उपोषण स्थळावरून माध्यमांशी संवाद साधला. मनोज जरांगे यांनी म्हटले की, सकाळी सरकारला सांगितले होते की सरसकट निर्णय घ्यावा. ज्यांच्याकडे नोंदी आहे, त्यांनाच कुणबी प्रमाणपत्र न देता सरसकट प्रमाणपत्र देण्याची मागणी जरांगे यांनी केली. 


राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलावण्याची घोषणा करून शिंदे समितीचा प्रथम अहवाल तयार करावा. उद्यापर्यत ठोस निर्णय घेतला नाही तर उद्या पासून पाणी घेणे बंद करणार असल्याचा इशाराही जरांगे यांनी दिला. 


आंदोलकांना कोणताही त्रास देऊ नका...


बीडमधील हिंसाचारानंतर पोलीस प्रशासनाने कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. पोलिसांनी निर्दोष, गरीब मराठा युवकांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. बीड पोलिसांनी ही कारवाई ताबडतोब बंद करावे. बीडमधील पोरांवर गुन्हे दाखल केले तर मी बीडमध्ये जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलनाला बसेल. त्यावेळी पाच लाख येतील, अथवा 10 लाख आंदोलक आले तर मला त्याची काळजी नाही, असा इशाराही त्यांनी दिला. महाराष्ट्रातील कोणत्याही आंदोलकाला त्रास दिला तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही असेही त्यांनी म्हटले. 


मनोज जरांगे काय म्हणाले? 


सरकार ने घेतलेले आजचा एकही निर्णय आम्हाला मान्य नाही. स्पष्टपणे सकाळी सरकारला सांगितले की सरसकट निर्णय घ्या. अर्धवट प्रमाणपत्र घेणार नाही, आणि वाटू देणार नाहीत. सरकारने विशेष अधिवेशन बोलावण्याची घोषणा करून शिंदे समितीचा प्रथम अहवाल तयार त्याला राज्याचा दर्जा देऊन  प्रमानपत्र सरसकट द्यावी. उद्यापर्यंत ठोस निर्णय घेतला नाही तर उद्यापासून पाणी बंद करेन. आज संध्याकाळी किंवा उद्यापर्यंत निर्णय घेतला नाही तर उद्या पाणी बंद होईल. 


अगोदर आमचे आंदोलन नंतर तुमची संचारबंदी, बीडमधील पोरांवर गुन्हे दाखल केले तर मी बीडमध्ये कलेक्टर, SP कार्यालयासमोर 10 लाख आंदोलक घेऊन बसेल. महाराष्ट्रातील कोणत्याही आंदोलकाला त्रास दिला तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही. एकदा झाले पुढे सहन करणार नाही. केजमधील लोकांना उचलण्याची गरज नव्हती, ते आंदोलन करत होते, शहाणे व्हा. 


बीड चे SP जातीयवादी ,तुम्ही तुमच्या लोकांना तंबी द्या. बीडसह महराष्ट्रातील लोकांना त्रास देऊ नका. अधिवेशन बोलवा. मुख्यमंत्री यांना स्पष्ट सांगितले होते, जेवढ्या नोंदी तेवढेच प्रमाणापत्र जमणार नाही, मग तुमचं आमचं जमणार नाही. 


आम्ही 50 टक्के आहोत, बौद्ध, मुस्लिम ,धनगर, obc यांचा आम्हाला पाठिंबा. अर्धवट निर्णय मान्य नाही, उद्यापर्यत निर्णय घ्या


Obc नेत्यांना खाता तर खाता ,धमक्या देऊन गोरं गरीबांच्या मराठ्याची पोरं मारायची का? फुकट ते फुकट खायचं आणि धमक्या द्यायच्या. 37 टक्के लोकसंखेला 30 टक्के आरक्षण असतं का? कोण कोण आंदोलन करतो ते पाहून घेऊ, आमच्या मराठ्यांची गरज नाही का?


देवेंद्र फडणवीस टार्गेट 


त्यांना आयुष्यात दुसरं काय आलं?  घरं कोणी जाळले आम्हाला माहिती नाही, भाजप तुमच्यामुळेच संपायला आलंय,आमच्या पैशावर बासुंदी ,गुलाबजामुन खायले,करा काय करायचे ते, तुम्ही किती ताकतवर आहेत किती 307 करायचे ते करा?


उद्धव ठाकरेंच्या फोनवर प्रतिक्रिया 


माझे बोलणे झाले,सरकार ला आम्ही वस्ताद भेटलो, असं जरांगे म्हणाले.


OBC नी सरकारचे ऐकूण रस्त्यावर येऊ नये 


शासनाची इंटरनेट सेवा बंद होत असल्याचे मेसेज. Obc ना संगतो, सरकारचे एकूण रस्त्यावर येऊ नका, हे मराठा obc झुंज लावणार आहेत. 


राज ठाकरेंच्या पत्राचा आदर 


राज ठाकरे यांच्या म्हणण्याचा आदर,हे भंपक असू की कसेही,पण सरकारच्या धमक्यांना घाबरणार नाही,अंगावर आल्यावर सोडणार नाही,याला सरकार जबाबदार, एक उपमुख्यमंत्री याला खास करून जबाबदार. 


वातावरण जाणून बुजून खराब करू नका, उद्या पासून।मी पाणी सोडणार आहे. उद्या सकाळी साडेदहा वाजता बैठक बोलवलीय. मग आज काय दिवसभर काय करत होते, नुसती बैठक झाली म्हणता.  तुम्हाला आज रात्र आणि उद्या दिवस तुमच्याकडे आहे. जाती एकमेकांच्या अंगावर घालू नका.