Maratha Reservation Protest Manoj Jarange Live : कुठे डीजे, तर कुठे ढोल-ताशांचा गजर, मनोज जरांगे अन् मराठा समाजाचा आरक्षण लढा यशस्वी, गावागावांत जल्लोष

Maratha Reservation Protest Manoj Jarange Live : मनोज जरांगेंची नेतृत्वाखालील मराठा मोर्चा मुंबईच्या वेशीवर  येऊन धडकलाय. त्यांच्या सोबत मराठा क्रांती मोर्चात सहभागी झालेले हजारो आंदोलक आहेत.  

एबीपी माझा ब्युरो Last Updated: 27 Jan 2024 12:05 PM
Manoj Jarange LIVE : बीड जिल्ह्यात मातोरीमध्ये डीजेच्या तालावर अख्ख्या गावानं धरला ठेका

Manoj Jarange LIVE : मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण घेऊनच परत येणार अशी घोषणा केली होती आणि आज अखेर ही घोषणा खरी ठरली आणि म्हणून मनोज जरांगे पाटील यांच्या मूळ गावी मातोरी डीजेच्या तालामध्ये भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली आहे. गुलाल उधळला जातो पेढे वाटले जात आहेत आणि यामध्ये अख्खा गाव नाचताना पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे, गावातील महिलासुद्धा या आनंद उत्सवामध्ये सहभागी झाल्या आहेत. 

Maratha Reservation LIVE UPDATES: येवला : मराठा समाजाचा येवल्यात भगवे झेंडे घेवून जल्लोष

Manoj Jarange, Maratha Reservation LIVE UPDATES: मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे मनोज जरांगे यांनी राज्य सरकारपुढे  ठेवलेल्या सर्व मागण्या मान्य केल्यानं नाशिकच्या येवल्यातील विंचूर चौफुली येथे सकल मराठा समाजाच्या वतीने जल्लोष करण्यात आला. हातात भगवे ध्वज घेवून छत्रपती शिवाजी महाराज की जय,  एक मराठा लाख मराठा अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. अनेक सरकार, मुख्यमंत्री झाले मात्र मराठ्यांचा आरक्षणाचा प्रश्न सोडवू शकले नाही, तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोडवला अशी प्रतिक्रिया देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही आभारही यावेळी मानण्यात आले.

Manoj Jarange, Maratha Reservation LIVE : मराठा समाजाच्या आरक्षण अध्यादेश निघाल्यानंतर नाशिकमध्ये मराठा समाजाचा विजय उत्सव

Manoj Jarange, Maratha Reservation LIVE : मराठा समाजाच्या आरक्षण अध्यादेश निघाल्यानंतर नाशिकमध्ये मराठा समाजाच्या वतीने विजय उत्सव साजरा करण्यात आला. सकल मराठा समाजाच्या वतीने नाशिक रोड येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून जल्लोष साजरा करण्यात आला. घोषणाबाजी, आतषबाजी, आणि गुलालाची उधळण करत विजय उत्सव साजरा करण्यात आला.

Manoj Jarange, Maratha Reservation LIVE : दिलेला शब्द पाळणं हीच माझी कार्यपद्धती : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Manoj Jarange, Maratha Reservation LIVE : मी जाहीरपणे छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती. ती शपथ पूर्ण करण्याचं काम हा एकनाथ शिंदे करतोय. दिलेला शब्द पाळणं हीच माझी कार्यपद्धती आहे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Manoj Jarange, Maratha Reservation LIVE : मनोज जरांगे अन् मराठा समाजाचा आरक्षण लढा यशस्वी, गावागावांत जल्लोष

Manoj Jarange, Maratha Reservation LIVE : मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाचा आरक्षणाचा लढा यशस्वी झाला, यानंतर ग्रामीण भागात गावागावांमध्ये जोरदार जल्लोष साजरा केला जात आहे. परभणीच्या कातनेश्वर गावामध्ये महिलांनी घरांसमोर वेगवेगळ्या रांगोळ्या काढल्यात साखर वाटली जात आहेत, डीजे लावून गावांमध्ये मराठा समाजाकडून आनंदोत्सव सुरू आहे. तसेच, फटाके फोडत, जोरदार गुलाल उधळून मराठा समाजाकडून आरक्षण मिळाल्याचा आनंद साजर करत आहे. 

Maratha Reservation LIVE : जालना-अंतरवली सराटी मध्ये जल्लोष

Maratha Reservation LIVE : मनोज जरांगे यांनी ज्या ठिकाणाहून आरक्षणाचा लढा उभा केला, त्या आंतरवली सराटी गावांमध्ये देखील आंदोलन गावकऱ्यांनी जल्लोष केला, फटाके फोडून पेढे भरवत, गुलाल लावून आंदोलकांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. गावांमध्ये आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण असून यावेळी समस्त गावकऱ्यांनी एबीपी माझाचे आभार देखील मानले, या ठिकाणचा आढावा घेतला आहे. 

Maratha Reservation LIVE : हा एकनाथ शिंदे शब्द पाळणारा, शिवरायांची शपथ पूर्ण करणारा शेतकरी पुत्र, मुख्यमंत्री काय काय म्हणाले?

CM Eknath Shinde on Manoj Jarange नवी मुंबई : मराठा आरक्षण (Maratha reservation) आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते ज्यूस पिऊन उपोषण मागे घेतले. यानंतर मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगे पाटील यांचं कौतुक करुन आपलं मनोगत व्यक्त केलं. मलाही गोरगरीब समाजाचं दुख आणि वेदना याची कल्पना आहे. म्हणून मी जाहीरपणे छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती. ती शपथ पूर्ण करण्याचं काम हा एकनाथ शिंदे करतोय. दिलेला शब्द पाळणं हीच माझी कार्यपद्धती आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.


सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

Chhagan Bhujbal : सगेसोयरे कायद्याच्या कसोटीत टिकरणार नाही; छगन भुजबळांनी स्पष्टच सांगितलं

Chhagan Bhujbal : नाशिक : मराठा आरक्षणाचा अध्यादेश मुख्यमंत्र्यांनी स्वतः मनोज जरांगेंना सुपूर्द केला. मराठा बांधवांकडून राज्यभरात जल्लोष केला जात आहे. यासंदर्भात मंत्री छगन भुजबळांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, "झुंडशाहीनं कायदे नियम बदलता येत नाहीत. कोणालाही न घाबरता आम्ही निर्णय घेऊ, अशी मंत्रीमंडळानं शपथ घेतली आहे. 16 फेब्रुवारीपर्यंत यासंदर्भातील हरकती मागवल्या आहेत, ओबीसी समाजाकडून हरकती पाठवाव्यात, यामुळे सरकारला कळेल की, आम्ही समता परिषदेत यासंदर्भात चर्चा करू, सगेसोयरे कायद्याच्या कसोटीत टिकरणार नाही, हे मला मराठा समाजच्या लोकांना निदर्शनास आणून द्यायचं आहे."

Manoj Jarange Maratha Reservation LIVE : ही शुभ सुरुवात; काँग्रेस नेते अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया

Manoj Jarange Maratha Reservation LIVE : मराठा समाजातील नोंदी आढळलेल्या तसेच त्यांच्या सगे सोयऱ्यांना आरक्षण देण्याचा झालेला निर्णय हा शुभ सुरुवात आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी दिली आहे. 'एबीपी माझा'शी एक्सकलुसिव्ह बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. आता नोंदी नसलेल्या लोकांबाबत देखील निर्णय होईल, याबाबत मी आशावादी आहे, असंही चव्हाण म्हणाले आहेत. 

Manoj Jarange, Maratha Reservation LIVE: अहमदनगरमध्ये मराठा बांधवांचा जल्लोष

Manoj Jarange, Maratha Reservation LIVE: अहमदनगर शहरातील माळीवाडा परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून, फटाके फोडून, एकमेकांना पेढे भरवत मराठा बांधवांकडून जल्लोष साजरा केला जातोय. यावेळी डीजेच्या तालावर मराठा बांधवानी ठेका धरलाय. विशेष म्हणजे, मराठा समाजातील महिलांचाही यात मोठ्या संख्येने सहभाग पाहायला मिळत आहे.

CM Eknath Shinde LIVE: कुणावरही अनन्या न करता आरक्षण दिलं जाईल : मुख्यमंत्री

CM Eknath Shinde LIVE: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलताना म्हणाले की, "सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्याचं काम केलं आहे. जे निर्णय घेतले आहेत, ते मान्य केले जातील. कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी आपण शिबीर लावलंय आहे. कुणावरही अनन्या न करता आरक्षण दिलं जाईल. ओबीसीचा सवलती देखील दिल्या जातील.  आपण आंदोलनात मृत्यूमुखी पडलेल्या तरुणांच्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडणार नाही."

Maratha Reservation LIVE UPDATES: आजचा दिवस आनंदाचा, गुलाल उधळण्याचा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Maratha Reservation LIVE UPDATES: नवी मुंबईतील मराठा बांधवांच्या विजयी सभेत बोलताना मुख्यमंत्र्यांनी मराठा आंदोलक आणि मनोज जरांगेंचं कौतुक केलं आहे. ते म्हणाले की, "आजचा आंदोलनाकडे सर्व मराठा बांधवांच लक्ष लागलं होतं. कुठल्याही प्रकारचे गालबोट लागले नाही. मी देखील शेतकऱ्याचा मुलगा आहे. गोरगरीब लोकांच्या अडचणी कळत आहे. मी त्यामुळेच मराठा आरक्षण देईल अशी शपथ घेतली होती. आज आनंद दिघे यांची आज जयंती आहे. बाळासाहेब ठाकरे यांची देखील जयंती नुकतीच पार पडली. या दोघांचे आशीर्वाद मला आहेत. स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्या कर्मभूमित आपला लढा यशस्वी होतं आहे. आमचं सरकार म्हणजे हे तुमचं सरकारं आहे. आम्ही मतासाठी नाहीतर हितासाठी निर्णय घेतले आहेत. अनेक मोठे नेते मराठा समाजात झाले. आजचा दिवस आनंदाचा दिवस आहे गुलाल उधळण्याचा दिवस आहे. आम्ही सर्व मागण्या मान्य केल्या आणि केवळ तुमच्या प्रेमापोटी इथं आलो. आज मनोज जरांगे यांनी सांगितलं की कुणबी नोंदी मराठवाड्यात सापडत नव्हती माञ आता लाखो कुणबी नोंदी सापडू लागल्या आहेत आपलं सरकारं घेणारे नाही तर देणारे आहे. मराठा समाज म्हणत होता की कुणाच्या ताटातील नको आमचं हक्काचं हवं आहे."

Maratha Reservation LIVE UPDATES: मराठा आरक्षणाला मोठं यश, लोणावळ्यात गुलालाची उधळण, मराठा बांधवांनी डिजेवर धरला ठेका

Maratha Reservation LIVE UPDATES: मनोज जरांगेंनी उभारलेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला मोठं यश मिळालं आहे. याचा आनंद आता गावागावात साजरा व्हायला लागला आहे. पुण्यातील लोणावळ्यात जिथं मुंबईत दाखल होण्यापूर्वी विराट सभा झाली होती, तिथंही मराठा बांधवांनी मोठा जल्लोष सुरू केला आहे. गुलालाची उधळण करत, डीजेच्या तालावर इथं जरांगे समर्थकांनी ठेका धरलाय. 

Maratha Reservation LIVE UPDATES: मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्यानंतर सोलापुरात जल्लोष

Maratha Reservation LIVE UPDATES: मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्यानंतर सोलापुरात जल्लोष


मराठा समाज बांधवासह मुस्लिम बांधव देखील जल्लोषात सहभागी


गुलाल उधळत, डान्स करीत, फटाका्यांच्या आतिषबाजीत साजरा केला विजयउत्सव


गेली अनेक दशक जे स्वप्न पाहिलेलं होतं ते स्वप्न आज सत्यात आलं, याचा हा आनंद असल्याच्या मराठा समाजाच्या भावना

Manoj Jarange Maratha Reservation LIVE : मराठा समाजानं एकजून कायम ठेवली : मुख्यमंत्री

Manoj Jarange Maratha Reservation LIVE : मराठा समाजानं एकजून कायम ठेवली आणि शिवरायांची घेतलेली शपथ पूर्ण करुन दाखवली, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. पुढे बोलताना म्हणाले की, आपल्यासाठी न्याय मागताना, आपला हक्क मागताना मराठा समाजानं कोणालाही त्रास होऊ दिला नाही, मराठा समाजासाठी हा ऐतिहासिक क्षण आहे,

Manoj Jarange Maratha Reservation LIVE : मराठा समाजासाठी न्याय मागणाऱ्या मनोज जरांगेंचं अभिनंदन; मुख्यमंत्र्यांकडून जरांगेंचं कौतुक

Manoj Jarange Maratha Reservation LIVE : मराठा समाजासाठी न्याय मागणाऱ्या मनोज जरांगेंचं अभिनंदन, मराठा समाजाच्या सभेत बोलताना मुख्यमंत्र्यांनी जरांगेंचं कौतुक केलं आहे. तसेच, मनोज जरांगेंच्या नेतृत्त्वात शांततेनं, संयमानं आंदोलन यशस्वी झालं, असंही मुख्यमंत्री म्हणाले आहेत. 

Manoj Jarange Maratha Reservation LIVE : अध्यादेशाला धोका झाला तर परत आलोच म्हणून समजा : मनोज जरांगे

Manoj Jarange Maratha Reservation LIVE : मनोज जरांगे म्हणाले की, "हा विजय महाराष्ट्रातील सगळ्या मराठ्यांचा आहे. अध्यादेशाला धोका झाला तर परत आझाद मैदानावर येणार, हा गुलालाचा सन्मान असाच राहू द्या."

Manoj Jarange Maratha Reservation LIVE : मी माझ्या जिवाची पर्वा न करता मायबाप समाजासाठी रात्रंदिवस झगडलोय : मनोज जरांगे

Manoj Jarange Maratha Reservation LIVE : मनोज जरांगेंनी मुख्यमंत्र्यांना भर सभेतून एक विनंती केली आहे. मनोज जरांगे म्हणाले की, "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तुम्हाला आमची एकच विनंती आहे की, सगे सोयऱ्यांबाबत जो अध्यादेश तुम्ही काढला आहे, ज्याची कुणबी नोंद मिळाली त्याच्या गणगोत्यातील सगळ्या सोयऱ्यांना त्याच जातप्रमाणपत्र मिळणार आहे. याच मागणीसाठी जो गुलाल उधळलाय, त्याचा अपमान होऊ देऊ नका." तसेच, पुढे बोलताना मी माझ्या जिवाची पर्वा न करता मायबाप समाजासाठी रात्रंदिवस झगडलोय, असंही म्हणाले. 

Manoj Jarange LIVE : मराठ्यांचा विजय, राज्यभरात जल्लोष; मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगे यांना गुलाल लावला

Manoj Jarange : नवी मुंबई : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते ज्यूस पिऊन उपोषण मागे घेतले. नोंदी सापडणाऱ्या सगेसोयऱ्यांना प्रमाणपत्र देण्यासह मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या प्रमुख तीनही मागण्या मान्य झाल्या. कुणबी प्रमाणपत्र नोंद सापडणाऱ्या कुटुंबाला सरसकट आरक्षण द्यावं, सगेसोयऱ्यांनाही प्रमाणपत्र आणि राजकीय गुन्हे


54 लाख नोंदी सापडलेल्या कुटुंबांना प्रमाणपत्र द्यावं, कुणबी प्रमाणपत्र नोंद सापडणाऱ्या कुटुंबाला सरसकट आरक्षण द्यावं आणि तिसरी मागणी होती. ज्याची नोंद सापडली त्याच्या सग्यासोयऱ्यांनाही प्रमाणपत्र द्यावं अशा तीन मागण्या मनोज जरांगे पाटील यांच्या होत्या. त्या मागण्या मान्य करण्यात आल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: राजपत्र घेऊन नवी मुंबईत मनोज जरांगे यांची भेट घेतली. सर्व मागण्या मान्य करुन, मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगे यांना गुलाल लावला.

Manoj Jarange Maratha Reservation LIVE : मनोज जरांगेंच्या विजयी सभेला सुरुवात

Manoj Jarange Maratha Reservation LIVE : मनोज जरांगेंकडून भाषणाला सुरुवात. जरांगेंनी भाषणाला सुरुवात करताना सर्वात आधी सर्व उपस्थित अधिकाऱ्यांचे आभार मानले. 54 लाख मराठा समाजाच्या कुणबी नोंदी सापडल्यात त्यांना प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात यावं, तसेच, त्यांच्या कुटुंबातील लोकांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं, अशीही आपली मागणी आपली होती. सगेसोयऱ्यांनाही कुणबी प्रमाणपत्र दिलं जावं, हीसुद्धा आपली मागणी होती, असं जरांगे म्हणाले. 

Manoj Jarange Maratha Reservation LIVE Updates: मुख्यमंत्र्यांच्या हातानं ज्यूस घेत मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं

Manoj Jarange Maratha Reservation LIVE Updates: नवी मुंबईत मराठ्यांचा जनसागर उसळला आहे. अखेर मनोज जरांगे आणि मराठा समाजाच्या आंदोलनाला यश मिळालं आहे. राज्य सरकारकडून आरक्षणासंदर्भातील मागण्यांचा अध्यादेश मनोज जरांगेंना सुपूर्द करण्यात आला आहे. तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हातानं ज्यूस घेत, मनोज जरांगेंनी आपलं उपोषण मागे घेतलं आहे.


थोड्याच वेळात नवी मुंबईतील वाशीमध्ये मनोज जरांगेंची विजयी सभा पार पडणार आहे. यावेळी मंचावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप नेते गिरीश महाजन, मंत्री दीपक केसरकर स्वतः उपस्थित आहेत. 

Manoj Jarange Maratha Reservation LIVE Updates: मुख्यमंत्र्यांकडून मनोज जरांगेंना अध्यादेश सुपूर्द

Manoj Jarange Maratha Reservation LIVE Updates: मनोज जरांगेंच्या मागण्या मान्य करत राज्य सरकारकडून तसा अध्यादेश सुपूर्द करण्यात आला आहे. त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मनोज जरांगेंच्या भेटीसाठी वाशीमध्ये दाखल झाले आहेत. मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या हातानं मनोज जरांगेंना अध्यादेश सुपूर्द केला आहे. अध्यादेश देताना मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगेंची गळाभेट घेतली. 

Manoj Jarange Maratha Reservation LIVE : सरकारच्या जीआरमधील शब्द जसाच्या तसा!

Kunbi Certificate : मराठा आरक्षणासाठी ( Maratha Reservation) गेल्या पाच महिन्यांपासून रस्त्यावर उतरलेल्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मोठी लढाई जिंकली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत (Manoj Jarange Patil in Mumbai) धडक दिल्यानंतर सरकारकडे (Shinde Government) 13 मागण्या करतानाच निर्णायक इशारा दिला होता. मात्र, वाशीमधील गर्दी पाहून सरकारने एक पाऊल मागे टाकत जरांगे पाटील यांनी केलेल्या मागण्या मान्य केल्या आहेत.

Manoj Jarange Maratha Reservation LIVE : मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर हिंगोलीत उत्साह

Manoj Jarange Maratha Reservation LIVE : मागील सात महिन्यापासून सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या लढ्याला अखेर आज यश मिळाला आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारच्या वतीने घेण्यात आला आहे. या निर्णयाचा आनंद हिंगोलीत साजरा करण्यात आला आहे. सकाळीच शहरांमध्ये दूध विक्रीसाठी घेऊन आलेल्या शेतकऱ्यांनी हे दूध मोफत वाटत मराठा आरक्षण मिळाल्याचा उत्साह आनंद साजरा केला आहे. गांधी चौकामध्ये फटाके फोडत मराठा समाज बांधवांच्या वतीने हा आनंद आज साजरा करण्यात आला आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर मराठा समाज बांधवांच्या वतीने आनंद जल्लोष साजरा केला जातो. 

Manoj Jarange Maratha Reservation LIVE : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगेंकडून छत्रपती शिवरायांना अभिवादन

Manoj Jarange Maratha Reservation LIVE : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे सभास्थळी दाखल झाले असून वाशी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलं आहे. 

Manoj Jarange Maratha Reservation LIVE : मनोज जरांगे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभास्थळी दाखल, मराठ्यांचा जल्लोष

Manoj Jarange Maratha Reservation LIVE : वाशीमध्ये मराठा बांधवांकडून जल्लोष साजरा केला जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे सभास्थळी दाखल झाले असून त्यांच्यासोबत गिरीश महाजनही उपस्थित आहेत. 

Manoj Jarange LIVE : नाशिकमधील मनमाडहून कार्यकर्ते विजयी सभेसाठी मुंबईकडे रवाना

Manoj Jarange LIVE : मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारकडून विविध मागण्या आज पहाटे मान्य झाल्यानंतर वाशी येथे विजयी जल्लोष करण्यात येत आहे. या विजयी जल्लोषात सहभागी होण्यासाठी नाशिकच्या मनमाडहून मराठा कार्यकर्ते पंचवटी एक्स्प्रेसने रवाना झाले आहेत. यावेळी एक मराठा लाख मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की जय, अशा घोषणा देत हे कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले.

Manoj Jarange LIVE : आंदोलन संपलं नसून, सध्या स्थगित करण्यात येतंय : मनोज जरांगे

Manoj Jarange LIVE : मनोज जरांगे म्हणाले की, "आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी माझ्या समाजाने खूप संघर्ष केला. आरक्षण मिळत कसं नाही यासाठी शेवटी आम्हाला मुंबईत यावं लागलं. मराठे एवढ्या ताकतीने मुंबईत आले की, या ताकतीमुळेच आज आदेश निघाला आहे. अन्यथा हा आदेश निघाला नसता. मराठे चारही बाजूंनी मुंबईत घुसू लागले आणि सरकारला हा निर्णय घ्यावा लागला. मात्र, आंदोलन संपले नसून, आंदोलन सध्या स्थगित करण्यात येत आहे." 

Manoj Jarange, Maratha Reservation LIVE : मनोज जरांगे पाटील लढ्यात जिंकले, परंतु तहामध्ये हरले : माजी खासदार हरिभाऊ राठोड

Manoj Jarange, Maratha Reservation LIVE : मनोज जरांगे पाटील यांनी  मराठा समाजाचा लढा तीव्रतेने लढला, त्यांना प्रचंड प्रतिसाद मराठा बांधवांनी दिला ,एक प्रकारे ही लढाई त्यांनी जिंकली, परंतु  तहामध्ये मात्र हरले,असे चित्र उभे ठाकले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन आंदोलन करणाऱ्या त्यांच्या मावळ्यांच्या, वंचित बहुजन आणि बारा - बलुतेदार समाजाची ताटातील 17 भाकरी खाण्यामध्ये असं त्यांनी कुठला विजय प्राप्त  केला ,त्यांच्या या लढ्याला जर यश मिळाले असेल, तर निश्चितच मंत्री भुजबळ, प्रकाश शेंडगे आणि ओबीसीच्या लढ्याला अपयश आले आहे.


सरकारने ओबीसी आरक्षणाला साधे धक्के नाही तर, भूकंपाचे धक्के दिलेत ,कारण राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री वारंवार सांगत होते की, आम्ही काही झालं तरी ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, आता माञ मराठा समाजाला सगे -सोयाऱ्यांच्या कुणबी दाखल्या प्रमाणे किवा  कुणबी नोंदी प्रमाणे दाखले दिल्यास ओबीसीवर हा प्रचंड अन्याय होणार असून, ओबीसींच्या 17 टक्के आरक्षणामध्ये करोडोच्या संख्येने मराठा समाज आल्यावर बारा बलूतेदारांच्या ताटातील तसेच मायक्रो ओबीसी चे आरक्षण दिवसाढवळ्या ओढून घेण्याचा हा प्रकार असून ओबिसीचे संपूर्ण आरक्षण ते फस्त करतील, यासाठीच आम्ही सांगत होतो की, मराठा बांधवांना न्यायमूर्ती रोहिणी आयोगाच्या नियमानुसार ओबीसी आरक्षणाचे विभाजन करून आरक्षण द्यावे, जेणेकरून सर्व समाज घटकांना सामाजिक न्याय मिळाला असता. परंतु आता मात्र या सर्व प्रकरणास जितके सरकार जबाबदार आहे, किंबहुना तितकेच ओबीसी नेते देखील जबाबदार आहेत, मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी  आरक्षण अभ्यासक/ माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी केली आहे त्याचबरोबर राठोड यांनी सरकार आणि ओबीसी नेत्यांचा जाहीर निषेध देखील व्यक्त  केला .

सरकारचा नवा जीआर जरांगेंना सुपूर्द, सरकारचा नवा जीआर 'एबीपी माझाच्या' हाती

Manoj Jarange, Maratha Reservation LIVE Updates : सरकारचा नवा जीआर 'एबीपी माझाच्या' हाती लागला आहे. सरकारचा नवा जीआर मनोज जरांगेंना सुपूर्द करण्यात आला आहे. राज्य सरकारच्या शिष्टमंडळाकडून नवा अध्यादेश जरांगेंना सुपूर्द करण्यात आला आहे. 


 

Maratha Reservation LIVE Updates: मनोज जरांगेंच्या कोणत्या तीन मागण्या मान्य?

Maratha Reservation LIVE Updates: सरकारच्या शिष्टमंडळाने रात्री उशिरा मनोज जरांगेंची भेट घेतली. जवळपास तीन तास शिष्टमंडळ आणि मनोज जरांगेंमध्ये चर्चा झाली. यावेळी सुधारित अध्यादेश मनोज जरांगेंना सुपूर्द करण्यात आलाय. अध्यादेशामध्ये सग्यासोयऱ्यांच्या मुद्द्याचा समावेश आहे. तसंच मनोज जरागेंच्या मागण्याही मान्य करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता मनोज जरांगे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस पिऊन थोड्याच वेळात उपोषण सोडणार आहेत.


कोणत्या तीन मागण्या मान्य? 



  • कुणबी नोंदी सापडलेल्यांना प्रमाणपत्रं देणं

  • त्यांच्या कुटुंबाना कुणबी प्रमाणपत्र देणं

  • सग्यासोयऱ्यांबाबतचे अध्यादेशही काढले

Manoj Jarange Maratha Reservation LIVE Updates: मनोज जरांगेंच्या लढ्याला यश : दीपक केसरकर

Manoj Jarange Maratha Reservation LIVE Updates: मराठा आंदोलक मनोज जरांगेंना अध्यादेश सुपूर्द केल्यानंतर दीपक केसरकरांनी आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, "राज्य सरकारच्या वतीनं मनोज जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या असून त्यासंदर्भातील सर्व कागदपत्र त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली आहेत. मनोज जरांगेंनी खूप मोठी लढाई आपल्या समाजासाठी लढली, मनोज जरांगेंच्या लढ्याला यश आलं आहे. त्यांनी मागितलेली सर्व कागदपत्रं त्यांच्याकडे सुपूर्द करुन त्यांनी विनंती करण्यात आली आहे की, त्यांनी आपलं उपोषण मागे घ्यावं. मात्र, त्यांचं म्हणणं असं आहे की, ज्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सातत्यानं माझ्याशी संपर्क साधला आणि हे काम करण्यामध्ये त्यांनी आपल्याला मदत केली, त्यांनी समाजाला भेटायला आणि माझं उपोषण सोडायला स्वतः इथे यावं. त्यांचं हे म्हणणं आम्ही मुख्यमंत्र्यांकडे पोहोचवलं आहे. त्यानुसार सकाळी 8 वाजता स्वतः मुख्यमंत्री जरांगेंचं उपोषण सोडण्यासाठी इथे येणार आहेत. एकादृष्टीनं हा विजय साजरा करण्यात येणार आहे."

Manoj Jarange LIVE Updates: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस पिऊन उपोषण सोडणार : मनोज जरांगे 

Manoj Jarange, Maratha Reservation LIVE : "समाज म्हणून आमचा आता एकनाथ शिंदे यांचा विरोध संपला आहे. सकाळी 8 वाजता वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मुख्यमंत्री पत्र घेऊन येणार आहेत.", असं मनोज जरांगेंनी सांगितलं. तसेच, मी सगळ्यांना विचारून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बोलावलं आहे. उद्या आम्ही येथे सभा घेणार असून मुंबईत जाणार नसल्याचं मनोज जरांगेंनी स्पष्ट केलं. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस पिऊन उपोषण सोडणार असल्याचंही मनोज जरांगेंनी यावेळी जाहीर केलं. 


रात्री उशीरा राज्य सरकारच्या शिष्टमंडळानं मनोज जरांगेंची भेट घेतली आणि त्यांच्याकडे सुधारित अध्यादेश सुपूर्द करण्यात आला. मागण्या मान्य झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी रात्री दोन वाजता पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी सर्व मागण्या मान्य झाल्याचं मराठा बांधवांना सांगितलं. तसेच, सर्व मागण्यांचे अध्यादेशही निघाल्याचं सांगितलं. कुणबी प्रमाणपत्राच्या ज्या नोंदी सापडल्या आहेत, त्यांना प्रमाण पत्र द्यावं, तसेच त्यांच्या कुटुंबानासुद्धा प्रमाणपत्र द्यावं, ही मागणी मान्य झाली आहे. तसेच, सरकारनं सगे सोयऱ्यांबद्दल अध्यादेश काढले आहेत. सुधारित अध्यादेश मला देण्यात आल्याचंही मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं. त्याचप्रमाणे आंतरवली सराटीत मराठा बांधवांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते, तेसुद्धा मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. 


"वंशावळीसाठी तालुका पातळीवर समिती नेमली जाणार आहे. मराठवाड्यात कमी प्रमाण पत्र सापडले त्या बाबत आता शिंदे समिती गॅझेट काढून त्यावर काम करणार आहे. तसेच विधानसभेत यावर कायदा करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमचे आरक्षणचे काम केले आहे.", असंही मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं. 

Manoj Jarange LIVE: शिष्टमंडळाकडून नवा अध्यादेश जरांगेंना सुपूर्द, थोड्याच वेळात जरांगे पाटील उपोषण सोडणार

Manoj Jarange, Maratha Reservation : नवी मुंबई : राज्य सरकारच्या शिष्टमंडळानं रात्री उशिरा मनोज जरांगे यांची भेट घेतली. जवळपास तीन तास शिष्टमंडळ आणि मनोज जरांगेंमध्ये चर्चा झाली. यावेळी सुधारित अध्यादेश मनोज जरांगेंना सुपूर्द करण्यात आला आहे. दरम्यान, अध्यादेशामध्ये सग्यासोयऱ्यांच्या मुद्द्याचा समावेश करण्यात आलेला आहे. तसेच, मनोज जरागेंच्या मागण्याही मान्य करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता मनोज जरांगे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस पिऊन थोड्याच वेळात उपोषण सोडणार असल्याची माहिती मिळत आहे.

महाराष्ट्रात मराठा समाजावर झालेले दाखल गुन्हे मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले

मराठा समाजावर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी मनोज जरांगे यांनी केली होती. दरम्यान आता हे गुन्हे मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. 

Manoj Jarange : मनोज जरांगेंची भेट घेऊन चर्चा करु - शिष्टमंडळ

Manoj Jarange :  आम्ही मनोज जरांगे यांच्यासोबत चर्चा करु. ती चर्चा झाल्यावर मनोज जरांगे हे त्यांची भूमिका स्पष्ट करतील, अशी प्रतिक्रिया शिष्टमंडळाने दिली आहे. 

Manoj Jarange Live : सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे यांच्या भेटीला

Manoj Jarange Live : सरकारचं शिष्टमंडळ हे मनोज जरांगे यांच्या भेटीला वाशीत पोहचले आहे. दरम्यान सरकारसोबत झालेल्या चर्चेची माहिती हे शिष्टमंडळ मनोज जरांगे यांना माहिती देणार आहे. 

Manoj Jarange Live : थोड्याच वेळात सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंची भेट घेणार, नवीन अध्यादेश आणि इतर मागण्यांसंदर्भात जरांगेंना माहिती देणार

Manoj Jarange Live :  थोड्याच वेळात सरकारचं शिष्टमंडळ हे मनोज जरांगे यांची भेट घेणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या चर्चेची माहिती देखील यावेळी हे शिष्टमंडळ मनोज जरांगे यांना देणार असल्याचं सांगण्यात येत आहे. 

Prakash Shendge on Maratha Reservation : सरकारनं जर वेगळं आरक्षण मराठ्यांना दिलं,त्यात परतीचे मार्ग कापले जातील, ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंचा इशारा 

मनोज जरांगे यांनी सगेसोयऱ्यांसंदर्भात आजच अध्यादेश काढावा अशी मागणी केली आहे. त्यावर ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी प्रतिक्रिया दिलीये. सरकारने जर सगेसोयऱ्यांवरुन अध्यादेश काढला तर तो न्यायालयात टिकणार नाही, आम्ही या संदर्भात न्यायालयात जाऊ,असं ओबीसी नेते प्रकाश अण्णा शेंडगे म्हणालेत. सरकारनं जर वेगळं आरक्षण मराठ्यांना दिलं तर त्यामधून मराठ्यांचे परतीचे मार्ग कापले जातील असा इशारा देखील यावेळी प्रकाश शेंडगे यांनी म्हटलं. 

Manoj Jarange Live : तीन IPS अधिकारी मनोज जरांगे यांच्या भेटीला, बंददाराआड चर्चा , अति. पोलीस आयुक्त वीरेंद्र मिश्रा यांच्यासह दोन अधिकारी वाशीत

Manoj Jarange Live :  तीन आयपीएस अधिकारी मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी वाशीमध्ये पोहचले. एडिशनल सीपी वीरेंद्र मिश्रा, एडिशनल सीपी विनायक देशमुख, उपयुक्त पुरुषोत्तम कराड मुंबई पोलिसांचे तीन आयपीएस अधिकारी यावेळी मनोज जरांगे यांच्या भेटीला पोहचलेत. यावेळी मनोज जरांगे यांनी पोलिसांनी पूर्णपणे सहकार्य करु अशी प्रतिक्रिया दिली. 

Manoj Jarange : मुंबई पोलीस आयुक्त विवेक फळणसाळकर मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला, जरांगेंच्या आंदोलनाचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा

Maratha reservation march :  विवेक फणसळकर, देवेन भारती आणि सत्यनारायण चौधरी हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला पोहचले आहेत. तसेच मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून मनोज जरांगे यांच्या मराठा आंदोलनाचा देखील आढावा घेतला जाणार आहे. 

Babanrao Tayvade on Manoj Jarange : जो अध्यादेश जरांगे मागतायत, ते सगळे जुनेच नियम, बबनराव तायवाडे यांची प्रतिक्रिया 

Babanrao Tayvade on Manoj Jarange :  जरांगे म्हणत आहेत, 37 लाख लोकांना प्रमाणपत्र निर्गमत केले आहे आणि त्यांच्याकडे यादी देखील आहे. आम्ही याच यादीच्या प्रतीक्षेत आहोत. जर 37 लाख लोकांना प्रमापत्र मिळाले असतील, तर आरक्षण मिळालेलं आहे. तर मग नोकर भरती स्थगित ठेऊन जागा रिक्त ठेवण्याच्या मागणीचे कारण काय? असा सवाल देखील बबनराव तायवाडे यांनी उपस्थित केला आहे. सगे सोयऱ्यांसंदर्भात निर्णय घेणं हे राज्यसरकारच्या हातात नाही, असं बबनराव तायवाडे म्हणालेत. 

Manoj Jarange Live : जरांगेंच्या मागणीवर आजच अध्यादेश निघण्याची शक्यता, सरकार सकारात्मक

Maratha reservation march : मनोज जरांगे यांनी सरकारला केलेल्या मागण्यांवर आजच अध्यादेश निघण्याची शक्यता असल्याची माहिती समोर आलीये. तसेच सरकार देखील याबाबत सकारात्मक असल्याचं देखील सांगण्यात येत आहे.

Manoj Jarange Live : मनोज जरांगे यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

Maratha reservation march :   1. मराठा समाजातील ५४ लाख लोकांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत, त्यांना जातप्रमाणपत्रांचं वाटप करा, नोंद नेमकी कोणाची हे माहिती करायचं असलं तर ग्रामपंचायतीला नोंदी मिळालेले कागद बाहेरच्या भिंतीवर चिकटवण्यास सांगा. त्यानंतर लोक प्रमाणपत्रं घेण्यासाठी अर्ज करू शकतील. नोंदी मिळाल्या आहेत त्या सर्व कुटुंबांना नोंदींच्या आधारावर प्रमाणपत्र दिलं जावं. ५४ लाख नोंदींनुसार वंशावळी जुळल्यावर त्यांना प्रमाणपत्र मिळायला हवं. ज्याची नोंद मिळाली आहे त्यांनी तातडीने अर्ज भरण्यास सुरुवात करावी. त्यानुसार राज्य सरकारकडे चार दिवसांत प्रमाणपत्र वितरित करण्याची मागणी केली होती. त्यावर राज्य सरकारने म्हटलं आहे की, आतापर्यंत ३७ लाख लोकांना प्रमाणपत्रं दिली आहेत. तसेच वंशावळी जुळवण्यासाठी समिती नेमली आहे.


२. ज्या ३७ लाख लोकांना प्रमाणपत्रं दिली आहेत त्यांची माहिती आम्हाला (मराठा आंदोलक) द्यावी, काही दिवसांत हा डेटा आपल्याला मिळेल.


३. शिंदे समिती रद्द करायची नाही, या समितीने मराठ्यांच्या कुणबी नोंदी शोधत राहावं. त्यानुसार सरकारने दोन महिने मुदत वाढवली आहे. आंदोलकांनी मागणी केली आहे की, ही समिती एक वर्षभर असायला हवी. त्यावर राज्य सरकारने म्हटलं आहे की, टप्प्याटप्प्याने या समितीची मुदत वाढवू.


४. ज्यांची नोंद मिळाली त्याच्या कटुंबांतील सग्यासोयऱ्यांना प्रमामपत्र दिलं जावं. त्याचा शासननिर्णय/अध्यादेश दिला जावा. जो अद्याप सरकारने काढलेला नाही. ज्याची नोंद आहे ती व्यक्ती त्याच्या सग्यासोयऱ्यांबाबत शपथपत्र सादर करत असेल तर त्यांनाही कुणबी प्रमाणपत्र दिलं जावं. तसेच हे शपथपत्र मोफत दिलं जावं. यावर सरकारने होकार दिला आहे. सरकारने यासंबंधीचा अद्यादेश जारी करावा.


५. अंतरवालीसह महाराष्ट्रात ठिकठिकाणी मराठा आंदोलनादरम्यान दाखल केलेले गुन्हे मागे घेतले जावे. त्यावर गृहविभागाने म्हटलं आहे की, विहित प्रक्रिया राबवून गुन्हे मागे घेऊ.


६. सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणासाठी क्युरेटिव्ह पीटिशन दाखल केली आहे. त्यावर निर्णय होईपर्यंत आणि संपूर्ण मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत, मराठा समाजातील मुलांना १०० टक्के शिक्षण मोफत द्यावं, तसेच आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत सरकारी भरत्या थांबवा, अथवा आमच्या जागा राखीव ठेवून भरती करा, अशी मागणी केली होती. परंतु, सरकारने ही मागणी मान्य केलेली नाही. राज्य सरकाने म्हटलं आहे की, राज्यातील केवळ मुलींना केजी टू पीजीपर्यंतचं शिक्षण देण्याचा निर्णय निर्गमित करू. परंतु, यासाठीचा शासननिर्णय जारी केलेला नाही. राज्य सरकारने केवळ मुलींच्या शिक्षणाबाबत अनुकूलता दाखवली आहे. मुलांच्या मोफत शिक्षणाबाबत कुठलाही निर्णय घेतलेला नाही.

Manoj Jarange Live : आझाद मैदानावर निघालो तर माघारी वळणार नाही - मनोज जरांगे

Maratha reservation march :  आझाद मैदानावर निघालो तर मागे वळणार नाही. आजचा आणि उद्या सकाळपर्यंतचा सरकारला वेळ देऊयात. आज कुणीही आझाद मैदानाकडे जायचं नाही. उद्या त्याबाबत निर्णय घेऊयात. सरकारने आज दिलेल्या कागदपत्राचा आज रात्री वकिलांना सोबत घेऊन अभ्यास करतो, असंही मनोज जरांगे यांनी म्हटलं. 

Manoj Jarange Live : सर्वांनी सध्या वाशीतच थांबायचं, मनोज जरांगेंचं मराठा समाजाला आवाहन

Maratha reservation march :  अध्यादेश काढण्यासाठी उद्या सकाळी 11 डेडलाईन मनोज जरांगे यांनी सरकारला दिलीये. अध्यादेश काढला तरी गुलाल उधळायला आझाद मैदानावर जाणारच. अध्यादेश नाही काढला तर उपोषणासाठी आझाद मैदानावर जाणार, पण आरक्षण मिळाल्याशिवाय माघारी फिरणार नाही, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं. 

Manoj Jarange Live : मनोज जरांगे यांच्या मागण्या काय काय?

Maratha reservation march :  मनोज जरांगे यांनी सरकारकडे पुढील मागण्या केल्या आहेत - 



  • नोंद सापडणाऱ्यांच्या सोयऱ्यांनाही सरसकट प्रमाणपत्र द्या

  • शपथपत्र घेऊनच सोयऱ्यांना प्रमाणपत्र द्या 

  • कोर्टात आरक्षण मिळेपर्यंत मुला-मुलींना १०० टक्के शिक्षण मोफत करा 

  •  जिल्हास्तरावर वसतिगृह बांधा

  • आरक्षण मिळेपर्यंत सरकारी भरती करु नका, केल्यास मराठा आरक्षणाच्या जागा राखीव ठेवा 

  • आंतरवालीसह राज्यातील सर्व मराठा आंदोलकांवरील गुन्हे घ्या

  • SEBC अंतर्गत 2014 च्या नियुक्त्या त्वरित द्या 

  •  वर्ग 1 व 2 आणि पोलीस उपनिरीक्षक पदाच्या नियुक्त्या द्या

  • रात्रीपर्यंत शासननिर्णयाचे अध्यादेश द्या, आजची रात्र नवी मुंबईत काढतो

Manoj Jarange Live : उद्या दुपारी 12 पर्यंत अध्यादेश द्या, नाहीतर मुंबईतच येतो - जरांगे

Maratha reservation march : सगेसोयऱ्यांचा अध्यादेश आज रात्रीपर्यंत काढा. जर उद्या दुपारपर्यंत आम्हाला अध्यादेश मिळाला नाही, तर आम्ही मुंबईतच येणार. त्यामुळे सगेसोयऱ्यांचा अध्यादेश आज काढा, असं आव्हान मनोज जरांगे यांनी सरकारला केलं आहे. 

Manoj Jarange Live : आजची रात्र इथंच काढतो, आझाद मैदानावर जाणार नाही - मनोज जरांगे

Maratha reservation march : प्रजासत्ताक दिनाचा मान ठेवून मी आझाद मैदानावर जाणार नाही. आजची रात्र इथंच काढतो, पण आज रात्रीपर्यंत अध्यादेश इथं आणून द्या. रात्रभर अध्यादेशाचा अभ्यास करु, त्यामध्ये काही खोटंनाटं असेल तर त्याचा किस पाडू. हवं तर आझाद मैदानाऐवजी वाशीतच थांबतो, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं. 

Manoj Jarange Live : एकही मराठा आरक्षणापासून वंचित ठेवणार नाही - मनोज जरांगे

Maratha reservation march : या सगळ्या मागण्यांचा अध्यादेश काढा. मी शब्द देतो की एकही मराठा आरक्षणापासून वंचित ठेवणार नाही. आज रात्रीपर्यंत आम्हाला हा अध्यादेश द्या, अशी मागणी मनोज जरांगे यांनी यावेळी केली आहे. 

Manoj Jarange Live : सगळ्या मागण्या एकत्र मान्य होत नसतात, आपण टप्प्याटप्प्यानं मान्य करुन घेऊ - जरांगे

Maratha reservation march :  सगेसोयऱ्यांचा अध्यादेश आपल्यासाठी जास्त महत्त्वाचा आहे. तसेच सगळ्या मागण्या या एकत्र मान्य होत नसतात, पण आपण टप्प्याटप्प्यानं मागण्या मान्य करुन घेऊ. पण यामध्ये कानामात्र जरी राहिला तरी मी एकून घेणार नाही. लोक म्हणतात आरक्षण मिळत नाही मग 57 लाख नोंदी काय आहेत? या 57 लाखांमुळे प्रत्येकी पाच जणांना आरक्षण मिळून अडीच कोटी लोकांना फायदा होणार आहे.  निर्णय चांगले घेतले त्याबद्दल काही म्हणणं नाही,असं मनोज जरांगे यांनी म्हटलं. 

Manoj Jarange Live : 100 टक्के आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाला शिक्षण मोफत करावं, मनोज जरांगेंची मोठी मागणी

Maratha reservation march :   100 टक्के आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाला शिक्षण मोफत करावं अशी मागणी मनोज जरांगे यांनी केलीये. तसेच भरती करताना मराठा समाजाच्या जागा राखीव ठेवाव्यात अशी मागणी देखील यावेळी मनोज जरांगे यांनी केलीये. आपल्या मागण्या मान्य केल्यात पण त्याचा शासन निर्णय काढा, असंही मनोज जरांगे म्हणालेत. 

Manoj Jarange Live : अंतरवाली सराटीमधील सगळे गुन्हे मागे घेण्याची मनोज जरांगे यांची मागणी

Maratha reservation march :  अंतरवाली सराटीसह राज्यातील सर्व गुन्हे मागे घेण्याची मागणी यावेळी मनोज जरांगे यांनी केलीये. तसेच हे गुन्हे मागे घेतल्याची  सरकारी आदेशाचं पत्र आम्हाला दाखवा. सगळे गुन्हे मागे घेऊ असं आश्वासन दिलं होतं, असं म्हणत जरांगे यांनी पुन्हा एकदा सगळे गुन्हे मागे घेण्याची मागणी केलीये. 

Manoj Jarange Live : कुणबी नोंद मिळाल्यास सगळ्या सगेसोयऱ्यांना प्रमाणपत्र मिळावं, मनोज जरांगे यांची मागणी

Maratha reservation march :   शिंदे समितीची मुदत वर्षभरासाठी वाढवा अशी मागणी देखील यावेळी मनोज जरांगे यांनी केली आहे. तसेच सगेसोयऱ्यांसोबतचा अद्यादेश काढावा असं देखील मनोज जरांगे यांनी यावेळी म्हटलं. तसेच ज्याची कुणबी नोंद मिळेल त्याच्या सगेसोयऱ्यांना देखील प्रमाणपत्र मिळावं अशी मागणी देखील यावेळी मनोज जरांगे यांनी केलीये. 

Manoj Jarange Live : कुणबी नोंदी सापडल्या तरी अर्ज करावा लागणार, त्याशिवाय प्रमाणपत्र मिळणार नाही - मनोज जरांगे

Maratha reservation march :  ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या असतील त्यांना देखील प्रमाणपत्रासाठी अर्ज करावा लागणार आहे, त्याशिवाय प्रमाणपत्र मिळणार नाही, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं. 37 लाख लोकांना प्रमाणपत्र दिल्याचं सरकारने मनोज जरांगे यांना सांगितलं आहे. तसेच 54 लाख प्रमाणपत्रांपैकी 37 लाख प्रमाणपत्रांचे वाटप आतापर्यंत करण्यात आल्याचं मनोज जरांगे यांनी यावेळी सांगितलं. 

Manoj Jarange Live : मनोज जरांगेंनी मांडली मराठा समाजाची भूमिका

Maratha reservation march :  सरकारने त्यांची भूमिका सांगितली. आपली भूमिका तुमच्यासमोर सांगतो. 54 लाख नोंदी मराठ्यांच्या (कुणबी) खरच सापडल्या आहेत. ते प्रमाणपत्र तुम्ही वाटप करा. ज्या 54 लाख नोंदी सापडल्या,  नोंद नेमकी कुणाची हे माहिती करायची असेल, तर त्या ग्रामपंचायला मिळालेले कागद चिटकावयाला हवे. तरच नोंदी सापडली का नाही हे माहित होईल. तरच तो व्यक्ती प्रमाणपत्रासाठी अर्ज करेल, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं.  

Manoj Jarange Live : संपूर्ण देशाचं आपल्याकडे लक्ष, त्यामुळे जबाबदारीनं वागा - मनोज जरांगे

Maratha reservation march :  संपूर्ण देशाचं आपल्याकडे लक्ष लागून राहिलं आहे, त्यामुळे जबाबदारीनं वागा असं आवाहन मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला केलं आहे. ज्यांच्या नोंदी मिळाल्या आहेत, त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला कुणबी प्रमाणपत्र मिळतंय. एक नोंद जरी सापडली तरी 50-50 जणांना त्याचा लाभ मिळतोय. यामुळे 2 कोटी मराठे लाभार्थी ठरत आहेत, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं. 


Manoj Jarange Live : शासनासोबत चर्चा झालीये, आपल्या मागण्यांवरच सरकारबरोबर चर्चा केली

Maratha reservation march :  सरकारसोबत आपल्या मागण्यांवरच चर्चा करण्यात आलीये. 

Manoj Jarange Live : मनोज जरांगेंच्या भाषणाला सरुवात

Maratha reservation march :  छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करुन मनोज जरांगे यांनी त्यांच्या भाषणाला सुरुवात केली आहे. 

Manoj Jarange Live : मनोज जरांगे यांच्यासमोबत मुख्यमंत्री साधणार संवाद

मनोज जरांगे यांच्यासमोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोबाईलवरुन  संवाद साधणार आहेत. 

Pankaja Munde : एका समाजाला न्याय देताना दुसऱ्यावर अन्याय नको - पंकजा मुंडे

Maratha reservation march : घटनात्मकदृष्ट्या टिकावे असे आरक्षण सरकारनं  मराठा समजाला द्यावे.  मी आरक्षण संदर्भात आपली भूमिका वेळोवेळी मांडत आली आहे. मराठा समाजाला न्याय द्यायचा असेल तर टिकणार आरक्षण दिले पाहिजे. मात्र एका समाजाला न्याय देताना दुसऱ्यावर अन्याय नको. ओबीसी संघटना जर मुबंई ला जाणार आसतील तर सरकारची जबाबदारी वाढली आहे, असे पंकजा मुंडे म्हणाल्या. 

Manoj Jarange Live : सरकारने दिलेल्या अध्यादेशात कोणते प्रस्ताव असू शकतात

Maratha reservation march : सरकारने दिलेल्या अध्यादेशात कोणते प्रस्ताव असू शकतात, याबाबतचा अंदाज वर्तवला जातोय. कुणबी नोंदी सापडलेल्या लोकांच्या वंशावळीतील प्रमाणपत्र देण्याचा निर्णय?


रक्ताच्या नातेवाई आणि सगे सोयऱ्यांना प्रमाणपत्र देण्याबाबत निर्णय?
दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याबाबत निर्णय?
फेब्रुवारी मध्ये होणाऱ्या अधिवेशनात आद्यदेशाचे कायद्यात रूपांतर ?

Manoj Jarange Drone : नवी मुंबईत लाखो मराठे एकवटले, जरांगेंच्या सभास्थळावरील गर्दी पाहा

Manoj Jarange Live : विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला अधिकचा आरक्षण देण्याचा निर्णय घेऊ - मुश्रीफ

Maratha reservation march : मनोज जरांगे यांच्यासोबत चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. मागासवर्गीय आयोगाचा अहवाल फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात पोहोचेल आणि तात्काळ विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला अधिकचा आरक्षण देण्याचा निर्णय घेऊ, असे हसन मुश्रीफ म्हणाले.  


मुख्यमंत्री त्यांच्यासोबत चर्चा मध्ये आहेत काहीतरी तोडगा निघेल. मराठा आरक्षणावर देण्याची भूमिका सरकारचे ठाम असेल तर थोडा वेळ वाट पाहण्याची गरज आहे, असे हसन मुश्रीफ म्हणाले.   


सरकार मराठा समाजाला टिकणार आरक्षण देण्यासाठी अतिशय गंभीर आहे. कुणबी दाखले देण्यासाठी अधिकारी रात्रंदिवस काम करत आहेत. हे सर्व बघून मराठा समाजाने आणखी थोडं वाट पहावी असे आवाहन करण्यात आले. 
त्यांना आंदोलन करायचं असेल तर फेब्रुवारी चा पहिला आठवडा वगैरे बघून त्यांनी करावं. आता विनाकारण मुंबईमध्ये नागरिकांची प्रचंड मोठी कोंडी होणार आहे, असे हसन मुश्रीफ म्हणाले.  

मराठा समाजाला सगे - सोयाऱ्याच्या कुणबीच्या दाखल्याप्रमाणे किंवा कुणबी नोंदीप्रमाणे जातीचे दाखले दिल्यास ओबीसी वर प्रचंड अन्याय होईल - माजी खासदार हरिभाऊ राठोड

Maratha reservation march : बारा बलुतेदारांच्या ताटातील ओबीसी आरक्षण दिवसा-ढवळ्या ओढुन घेण्याचा हा प्रकार आहे मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्री वारंवार सांगत होते की ,ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठ्यांना आरक्षण देऊ, परंतु आता उघड झाले आहे की ,ओबीसी आरक्षणाच्या १९ टक्के आरक्षणामध्ये करोडच्या संख्येने मराठा समाज आल्यावर ओबीसींचे संपूर्ण आरक्षण ते फस्त करतील., यासाठीच आम्ही सांगत होतो की, मराठ्यांना ओबीसी आरक्षनाचे उप -वर्गीकरण करून आरक्षण द्यावे. या सर्व प्रकरणास जितके  सरकार जबाबदार आहे, तितकेच ओबीसी नेते देखील जबाबदार आहेत,   आम्ही सरकारचे तसेच ओबीसी नेत्यांचा धिक्कार करतो असा घणाघात करून माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी शासानासह ओबीसी नेत्यांचा निषेध व्यक्त केला.

Chhagan Bhujbal on Manoj Jarange Live : मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या, ...अन्यथा ओबीसी समाजाचंही आंदोलन सुरु होईल, छगन भुजबळ यांचा इशारा

Maratha reservation march : कायद्याच्या कसोटीत जे काही उतरेल ते देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. आजकाल कुणीही कोर्टात जातो, त्याची चिरफाड होते, त्यामुळे कायद्यात काय बसेल त्यानुसार होईल. मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या, असे माझे देखील म्हणणे आहे. पण ओबीसीवर अन्याय होता नये या मतावर आम्ही ठाम आहोत, अशे छगन भुजबळ म्हणाले. 


उद्या ओबीसीवर अन्याय झाला असे झालं तर निश्चितपणे ओबीसी समाजाचे देखील आंदोलन सुरू होईल. दोन्ही बाजूचा विचार करून योग्य तो निर्णय घेतील. आम्ही आमची मतं जाहीर सभेतून मांडतो आणि आम्ही त्याला विरोध देखील करतो आणि आम्ही ती मांडू असेही भुजबळ म्हणाले.

Manoj Jarange Live : राज्य सरकारकडून पाच ते सहा अध्यादेश

Maratha reservation march : वाशीतच आंदोलन मागे घेण्याची मनोज जरांगेंना शिष्टमंडळाची विनंती, आझाद मैदानात जात घोषणा करण्यावर जरांगे आग्रही, मुंबईत येण्यावर ठाम राहिल्यास अटल सेतू वापराची विनंती शिष्टमंडळाकडून करण्यात आली आहे. मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारकडून पाच ते सहा अध्यादेश काढण्यात आले आहेत. शिष्टमंडळाची मनोज जरांगे यांच्यासोबत चर्चा झाली आहे. थोड्याच वेळात मनोज जरांगे निर्णय घेणार आहेत. 

Manoj Jarange Live : मागण्या मान्य, पण आझाद मैदानावर जाण्यावर मनोज जरांगे ठाम

Maratha reservation march : वाशीमध्येच आंदोलन मागे घेण्याबाबत राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे यांना विनंती केली आहे. पण मुंबईत येण्यावर मनोज जरांगे ठाम आहेत. आझाद मैदानात जाऊन घोषणा करण्याबाबत मनोज जरांगे ठाम आहेत. थोड्याच वेळात मनोज जरांगे आपली भूमिका घेतात, हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल.

Manoj Jarange Sabha Navi Mumbai : सरकारने काही कागदपत्रे आपल्याला दिली आहेत : मनोज जरांगे


Manoj Jarange Live : राज्य सरकारकडून पाच ते सहा अध्यादेश

Maratha reservation march : मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारकडून पाच ते सहा अध्यादेश काढण्यात आले आहेत. शिष्टमंडळाची मनोज जरांगे यांच्यासोबत चर्चा झाली आहे. थोड्याच वेळात मनोज जरांगे आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.

मनोज जरांगे पाटलांनी सरकारला वेळ द्यावा - राधाकृष्ण विखे

Maratha reservation march : मराठा समाजाला आरक्षण देण्याची सरकारची भूमिका आहे त्यामुळे सरकारला मनोज जरांगे पाटील यांनी वेळ द्यायला हवा असं राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटल आहे...कोणताही सर्वे करायचा असेल तर त्याला वेळ लागतो, सोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः स्पष्टपणे सांगितला आहे की मराठा आरक्षणाला आरक्षण देण्यासंदर्भामध्ये एक विशेष अधिवेशन बोलावलं जाईल, त्यासाठी थोडासा कालावधी लागतो तो कालावधी जरांगे पाटील यांनी द्यावा अशी आमची विनंती आहे असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले. ते अहमदनगर येथे बोलत होते.



एका बाजूला दुसऱ्या समाजाचे देखील आंदोलन सुरू आहे त्यामुळे दोन समाजामध्ये तेढ निर्माण होणे हे राज्याला परवडणार नाही असं राधाकृष्ण विखे यांनी म्हटल आहे... सरकार नेमकी ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण देणार की स्वतंत्र आरक्षण देणार या पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना सरकार समोर सर्व पर्याय खुले असल्याचे राधाकृष्ण विखे म्हणाले.

Manoj Jarange Live : जरांगेंनी मुंबईच्या दिशेने जाण्याचा निर्णय घेतला तर

Maratha reservation march : मराठा आरक्षण मागणीसाठी वाशी मध्ये जमलेल्या लाखो जनसमुदायाने मुंबईच्या दिशेने जाण्याचा निर्णय घेतला तर मोठ्या प्रमाणामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी वाशी टोल नाका येथे रॅपिड ऍक्शन फोर्स ची टीम दाखल झाली आहे. या ठिकाणी राज्य राखीव पोलीस दल स्थानिक वाहतूक पोलीस नवी मुंबई पोलीस दाखल झाले आहेत. 

Manoj Jarange Live : आझाद मैदानाकडे मराठ्यांची कूच

Maratha reservation march : पश्चिम रेल्वेने अंधेरी बोरिवली जोगेश्वरीकडून आझाद मैदानाकडे ट्रेनने मराठा बांधव निघाले आहेत. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी पश्चिम उपनगरातील  मराठा बांधव ट्रेनने निघाले आहेत.  आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं अशा घोषणा देत आझाद मैदानाकडे मराठा बांधव कुच करत आहेत

Manoj Jarange Live : उद्या बघा किती मराठे येतात - मनोज जरांगे

Maratha reservation march :  आपल्याला पटांगणात जायचे आहे.  आज तर काही नाही उद्या बघा किती मराठे येतात, असे मनोज जरांगे म्हणाले. 

Manoj Jarange Live : साऊंड सिस्टिम खराब, 2 वाजता मनोज जरांगे भूमिका स्पष्ट करणार

Maratha reservation march : आवाज येत नसल्यामुळे मनोज जरांगेंनी एक तास संभाषण थांबण्याचा निर्णय घेतला आहे. तोपर्यंत साऊंड सिस्टिम उभी करण्यात येणार आहे. दोन वाजता सभा होणार आहे, सर्वांना सांगा, कुणामध्येही गैरसमज होऊ नये. सरकारसोबत चर्चा झालेली माहिती सर्वांना सांगणं गरजेचं आहे, असे मनोज जरांगे म्हणाले.

uday samant on Manoj Jarange : मागण्या मान्य करत असेल तर आंदोलन कशासाठी? सामंत

Maratha reservation march : सरकार सर्व मागण्या मान्य करत असेल तर आंदोलन कशासाठी करण्यात येत आहे. मनोज जरंगे समजूतदार आहेत, त्यामुळे ते योग्य निर्णय घेतील, असे उदय सामंत म्हणाले.  मुंबईत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी मराठा समाजाने घ्यावी. तोडगा निघाला पाहिजे मी या मताचा आहे, असे उदय सामंत म्हणाले. यामध्ये सामान्य माणूस भरला जाणार नाही याची काळजी दोन्ही माध्यमातून घेतली जावी. मी प्रचंड सकारात्मक आहे मराठा आरक्षण संदर्भात नक्की मार्ग निघेल. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जर सर्व करून देत असतील या तिघांसाठी चर्चेचा हट्ट धरू नये, असे उदय सामंत म्हणाले. 

Dhananjay Munde on Manoj Jarange : गैर मराठा कार्यकर्ता असलो तरी मी मराठा आरक्षणाच्या बाजूने

Maratha reservation march : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार सकारात्मक असून मी गैर मराठा कार्यकर्ता असलो तरी मराठा आरक्षणाच्या बाजूने आहे सर्वात पहिल्यांदा बीडच्या जिल्हा परिषदेमध्ये मराठा आरक्षणासाठी मी ठराव मंजूर केला होता मराठा आरक्षणाच्या चळवळीमध्ये अनेक वेळा मी आंदोलन केली मागच्या काळामध्ये मराठा समाजाला जे आरक्षण मिळाले ते कोर्टामध्ये टिकलं नाही त्यामुळे आता मराठा समाजाला जे आरक्षण दिले जाणार आहे ते टिकणारे आरक्षण असेल आणि त्यासाठी थोडा वेळ लागू शकतो असं धनंजय मुंडे म्हणाले आहेत

Deepak kesarkar on Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य झाल्या आहेत, दीपक केसरकर यांची माहिती

Maratha reservation march : मनोज जरांगे पाटील यांच्या सगळ्या मान्य झाल्या आहेत,  शासकीय विहित नियम असतात त्यानुसार अंमलबजावणी होईल, अशी माहिती मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. 


महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा असं घडलं की आपण 37 लाख कुणबी प्रमाणपत्र दिले होते परंतु आता आणखी देऊन 50 लाखाच्यावर ही संख्या जाणार आहे. हा न्याय मिळवण्यात त्यांचा हातभार होता, असे केसरकर म्हणाले. 


मुंबई ठप्प होण देशाच्या दृष्टीने योग्य नाही मुख्यमंत्री यांनी स्वतः पुढाकार घेऊन यंत्रणा कामाला लावली. शेवटी प्रताप परंपरेचा मान ठेवणे ही सुद्धा राज्याचे संस्कृती राहिली आहे, किती अधिकारी भेटायला गेले किती नेते भेटायला गेले राज्य शासन हे राज्य शासन असतं.  सर्व यंत्रणा कामाला लागल्या याचा सुद्धा त्यांनी मान ठेवला पाहिजे, त्यांनी आंदोलन मागे घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री त्यांना भेटून आनंद नक्कीच साजरा करतील, असे केसरकर म्हणाले.

Manoj Jarange Live : साऊंड सिस्टिम व्यवस्थित नसल्यामुळे जरांगेंनी संभाषण थांबवलं

Maratha reservation march : साऊंड सिस्टिम व्यवस्थित नसल्यामुळे मनोज जरांगे यांनी थोडावेळासाठी संभाषण थांबवलं. सर्वांना ऐकू येत नसल्यामुळे मनोज जरांगेंनी थोडावेळ थांबण्याचा निर्णय घेतला. नवीन साऊंड सिस्टिम मागवण्याबाबत चर्चा सुरु आहे. तोपर्यंत मनोज जरांगे यांनी संबोधन थांबवलं आहे. माझ्या माय-बापाला सर्व गोष्टी ऐकू येणं, गरजेचं असल्याचे जरांगे म्हणाले.  नवी मुंबई वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सर्व मराठा समाज एकवटला आहे. मनोज जरांगे आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. 


 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये फोनवर चर्चा झाली आहे.  ही चर्चा सकारात्मक झाल्याचं सांगण्यात येतेय. 

Manoj Jarange Live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मनोज जरांगेंशी फोनवर चर्चा

Maratha reservation march : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मनोज जरांगेंशी फोनवर चर्चा झाली आहे. शिष्टमंडळाच्या बैठकीनंतर जरांगे काय भूमिका घेणार? याकडे लक्ष

Manoj Jarange Live : मराठ्यांचा सीएसएमटीसमोर चक्काजाम, आंदोलक रसत्यावर बसले

Maratha reservation march : मराठ्यांनी सीएसएमटीसमोर चक्काजाम केले आहे. आंदोलक रसत्यावर बसले आहेत. परिस्थिती पोलिसांच्या नियंत्रणाबाहेर गेली आहे. शेकडोंच्या संख्येनं आंदोलक मुख्य रस्त्यावर बसले आहेत.

Dada Buse on Manoj Jarange : शिंदे समितीच्या माध्यमातून दिवसरात्र काम सुरू

Maratha reservation march : मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे याबद्दल दुमत नाही. इतर आरक्षणाला धक्का न लागता कायद्याच्या चौकटीत असणारे आरक्षण देण्याचा प्रयत्न आहे.  
सर्वोच्च न्यायालयात हा प्रश्न प्रलंबित आहे. शिंदे समितीच्या माध्यमातून दिवसरात्र काम सुरू आहे. सर्वच जण प्रयत्न करत आहे, काय काय केलं हे सर्व त्यांच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे, असे दादा भुसे म्हणाले. 


मुख्यमंत्रीनी शिवाजी महाराजांची शपथ घेतली आहे. मागासवर्गीय समितीच्या माध्यमातून डेटा कलेक्ट करत आहेत. दीड लाख कर्मचारी काम करत आहेत.  मुख्यमंत्री चर्चेसाठी अंतरवलीला सुद्धा गेले होते, असे दादा भुसे म्हणाले. 

Manoj Jarange Live : मराठा समाजासाठी धाराशीवमधून 3 टन पेढा

Maratha reservation march :  धाराशिवच्या भूम तालुक्यातील पाथरूड गावाच्या पेढा व्यवसायिक व सकल मराठा बांधवांच्या वतीने मुंबईला गेलेल्या मराठा बांधवांसाठी तीन टन पेढा पाठवला आहे


मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मुंबई येथे लाखो मराठा बांधवांच्या वतीने निघालेल्या पायी दिंडी मोर्चामधील मराठा बांधवांसाठी प्रसिद्ध असलेला पाथरूड पेढा पाठवण्यात आला आहे.   

Babanrao Taywade on Manoj Jarange : मनोज जरांगे यांची मागणी असैवधानिक - बबनराव तायवाडे

Maratha reservation march :  आईकडच्या सग्या सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावे ही मनोज जरांगे यांची मागणी असैवधानिक आहे. असे करता येत नाही व हे करण्याचा अधिकार हा राज्य सरकारला नाही, तो केंद्राच्या अखत्यारीतील विषय आहे. केंद्र सरकारला करायचेही असेल तर मग फक्त मराठा जात नाही तर सर्व जातीसाठी करावे लागेल, असे मत राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या बबनराव तायवाडे यांनी व्यक्त केले.


आईकडच्या सोयऱ्याची जात ग्राह्य पकडली तर घरातच दोन जाती निर्माण होईल, आंतरजातीय विवाहातही समस्या पाहायला मिळेल. आईची जात वेगळी व वडिलांची  जात वेगळी. त्यामुळे आरक्षणाच्या लाभासाठी घरातच विभाजन पाहायला मिळेल असेही बबनराव तायवाडे म्हणाले.त्यामुळे असैवधानिक मागण्या पुढे करून मनोज जरांगे यांना काय साध्य करायचे आहे. हा प्रश्न राष्ट्रीय ओबीसी महासंघाने उपस्थित केला आहे. 
 

Manoj Jarange Live : मी एकटा निर्णय घेऊ शकत नाही - मनोज जरांगे

Maratha reservation march : छत्रपती शिवाजी महाराज चौकात पुढची चर्चा आपण करूयात. राज्य सरकारच्या शिष्टमंडळांना जीआर साठी जी काय कागदपत्रे समोर ठेवली आहे.  त्यात काय दुरुस्ती आहे, त्यात नेमक्या कोणत्या मागण्या मान्य होत आहेत, ते सगळं आपण  चर्चा करून ठरवूयात.  कुठलाही निर्णय मी एकटा घेऊ शकत नाही, सगळ्यांसमोर चर्चा करून निर्णय घेईल, असे मनोज जरांगे म्हणाले.

Manoj Jarange Live : सीएसएमटीसमोर तुफान गर्दी  

Maratha reservation march : महापालिकेसमोर मराठा मोर्चेकरी गाड्यांसह दाखल झाले आहेत. मुंबई पोलिसांनी सर्वांना अडवलं आहे. सीएसएमटीसमोर तुफान गर्दी  झाली आहे. वाहतूककोंडीमुळे नागरिकांना त्रास होत आहे. डिजे लावून रस्त्यावरच मोर्चाचा जल्लोष सुरू आहे. 

Shambhuraj Desai on Manoj Jarange : शासन पूर्णपणे सकारात्मक, मनोज जरांगेंनी सहकार्य करावे - शंभूराज देसाई

Maratha reservation march : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांना कालच (गुरुवारी) विनंती केली आहे. मुंबईमध्ये येणाऱ्या लोकांची गैरसोय टाळली पाहिजे. शासन पूर्णपणे सकारात्मक आहे. शिंदे सरकार आल्यापासून मराठा आरक्षणाला याआधी एवढी कधीच गती मिळाली नव्हती. फेब्रुवारी महिन्यात याविषयी विशेष अधिवेशन बोलावले जाणार आहे. मराठा आरक्षणावरून एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक मुंबईत येणे आणि मुंबईकरांची गैरसोय होणे वेठीस सर्वाना धरणे हे योग्य नाही. सरकार आरक्षणाबाबत काहीच करत नसते तर त्यांची भूमिका योग्य होती. मात्र सरकार सकारात्मक आहे. वेळोवेळी सरकारच्या वतीने मंत्री जरांगे पाटील यांना भेटलेले आहेत. काल देखील वरिष्ठ विभागीय आयुक्त जरांगे पाटील यांना भेटलेले आहेत. या चर्चेदरम्यान जे काही धोरणात्मक शासकीय निर्णय घेण्यात आले त्याबाबत आमच्यातील काही अधिकारी जरांगे पाटील यांना देणार आहेत. यामुळे सरकारला सहकार्य करावे हीच विनंती, शंभूराज देसाई यांनी केली.


आंदोलनकर्ते असो कोणीही असो शेवटी पाण्याची, शौचालयाची व्यवस्था सरकारच्या वतीने केली जात आहे. ज्या काही उपायोजना शक्य आहे, त्या सरकार करत आहे. आमचे पूर्ण प्रयत्न सुरू आहेत. जरांगे पाटील यांनी हे आंदोलन स्थगित करावे, असे शंभूराज देसाई  म्हणाले.


आमची जरांगे यांच्या सोबत चर्चा सुरू आहे. सरकारने केलेले प्रयत्न आम्ही त्यांना वारंवार सांगत आहोत. सुदैवाने क्युरीटी पिटीशन आर्ग्युमेंट झाले. त्याची ऑर्डर पेंटिंग आहे. निकाल आपल्या बाजूने लागेल अशी अपेक्षा धरू या. त्यामुळे सरकारला सहकार्य करावे, असे शंभूराज देसाई म्हणाले.

Manoj Jarange Live : शिष्टमंडळासोबत चर्चा झाल्यानंतर मनोज जरांगे काय म्हणाले ?

Maratha reservation march :  शिष्टमंडळासोबत चर्चा झाली. तुमच्यासोबत चर्चा झाल्यानंतरच अंतिम निर्णय घेणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकात मध्ये जाऊयात, असे मनोज जरांगे म्हणाले. वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मनोज जरांगे यांची सभा होणार आहे.यामध्ये मनोज जरांगे आपली भूमिका स्पष्ट करतील. 

Devendra Fadnavis on Manoj Jarange: मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? 



 

Sanjay raut on Maratha reservation : संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला, मराठा आरक्षणावर तोडगा काढला नाही तर...

Maratha reservation march : मराठा आरक्षणावर तोडगा काढला नाही तर महाराष्ट्राच्या राजधानीत हाहाकार घडेल. मुख्यमंत्र्यांनी जरांगे जिथे आहेत तिथे जाऊन त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे. सर्वपक्षीय शिष्टमंडळ घेऊन मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली पाहिजे. हा प्रश्न श्रेय घेण्याचा नसून हा प्रश्न महाराष्ट्राची सामाजिक कायदा सुव्यवस्थेची स्थिती यावर नियंत्रण ठेवण्याचा आहे. राज्याचे मुख्यमंत्री शेतावर काहीतरी उपटत होते. काय उपटत होते माहित नाही त्यांनीही उपटा उपटी थांबवावी आणि राज्यात लक्ष घालावे, असा टोला संजय राऊतांनी लगावला आहे.

vinod pawar on Maratha reservation : मनोज जरांगे आणि शिष्टमंडळाची चर्चा सकारात्मक - विनोद पवार

Maratha reservation march : आज आझाद मैदानात गुलाल उधळला जाणार- फटाके फुटणार. चर्चा सकारात्मक झाली असल्याचे  संकेत मिळाले आहे. मनोज जरांगे पाटील जो निर्णय घेतील तो मान्य, असे विनोद पवार म्हणाले.  दरम्यान, थोड्याच वेळात मनोज जरांगे पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. 

Vinod Pawar on Manoj Jarange : आझाद मैदानात गुलाल उधळणार, शिष्टमंडळासोबत चर्चा सकारात्मक झाल्याचे संकेत

 आज आझाद मैदानात गुलाल उधळला जाणार- फटाके फुटणार, चर्चा सकारात्मक झाली असल्याचे  संकेत,  मनोज जरांगे पाटील जो निर्णय घेतील तो मान्य, असं मराठा आंदोलक विनोद पवार यांनी एबीपी माझाला सांगितलं

Eknath Shinde : शिवसेनेचं महाअधिवेशन लांबणीवर

Maratha reservation march : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे शिवसेनेचं महाअधिवेशन लांबणीवर टाकण्यात आले आहे., शिवसेनेचं महाअधिवेशन पुढे ढकललं, येत्या 29/30 जानेवारीला कोल्हापूर येथे होणार होतं अधिवेशन. उद्धव ठाकरेचं नाशिक येथे झालं होतं महाअधिवेशेन, त्यानंतर शिंदेंच्या अधिवेशनाकडे होतं सर्वाचं लक्ष आहे. 

Manoj Jarange Live : अजित पवार काय म्हणाले ?

Maratha reservation march : पुण्यात ध्वजारोहण झाल्यानंतर उप मुख्यमंत्री अजित पवार यांनीही मनोज जरांगे यांच्या आंदोलनाबाबत प्रतिक्रिया दिली. मराठी आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे, असे ते म्हणाले. नवी मुंबईत शिष्टमंडळ आहे . मार्ग काढायचा प्रयत्न सुरू आहे. कुणी काय म्हटले ते मला सांगू नका? राज्य प्रमुखांनी त्यात लक्ष घातलं आहे, असे अजित पवार म्हणाले. 

Manoj Jarange Live : कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घ्या

Maratha reservation march : न्यायालयाने सर्वांना आंदोलन करण्याचा अधिकार दिला आहे. मात्र कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घ्यायला हवी, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते नागपुरात बोलत होते. 


उच्च न्यायालयाने आम्हाला जे निर्देश दिले आहेत, कोणालाही आंदोलन करण्याचा अधिकार आहे, ते शांततेने नियमाने झाला पाहिजे असे उच्च न्यायालयाने सांगितले. त्याचं तंतोतंत पालन करू, त्यासोबत जे प्रश्न आहेत ते प्रश्न कसे सोडवता येतील. याकरिता माननीय मुख्यमंत्र्यांचे नेतृत्वात प्रयत्न सुरू आहेत, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Manoj Jarange Live : शिष्टमंडळसोबतची बैठक संपली

Maratha reservation march :  शिष्टमंडळसोबतची बैठक संपली आहे. थोड्याच वेळात मनोज जरांगे पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.

Manoj Jarange Live : एकनाथ शिंदेंचा मनोज जरांगेंशी संवाद, योग्य ते समाधान येईल - चंद्रकांत पाटील

Maratha reservation march :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मनोज जारांगे यांच्याशी संवाद ठेवून आहेत, त्यातून त्यांचे योग्य ते समाधान होईल, असे विधान सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. सोलापुरात प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते ध्वजारोहण झाले. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी माध्यमाशी संवाद साधला, यावेळी मनोज जरांगे यांच्याविषयी प्रश्न विचारला असता चंद्रकांत पाटलांनी आपली प्रतिक्रिया दिली. 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मनोज जारांगे यांच्याशी संवाद ठेवून आहेत, त्यातून त्यांचे योग्य ते समाधान होईल. जरांगे यांना कोर्ट, पोलीस यांनी ज्या सूचना करायचे आहेत, त्यांनी ते केल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी देखील त्यांना आवाहन केलंय, ते योग्य निर्णय करतील असे मला वाटते, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. 

Manoj Jarange Live : मनोज जरांगे आणि शिष्टमंडळामध्ये चर्चा सुरु, तोडगा निघणार का?

Maratha reservation march :  शिष्टमंडळासोबत चर्चा करण्याआधी जरांगे पाटील यांनी आधी आपल्या वकिलांसोबत चर्चा केली. त्यानंतर आता शिष्टमंडळांसोबत जरांगे पाटील चर्चा करत आहेत. जीआर चा मसुदा घेऊन शिष्टमंडळ जरांगे पाटील यांच्याकडे आलं आहे त्यावर चर्चा केली जाणार आहे. 

Manoj Jarange Meeting With Government Delegation : राज्य सरकारचं शिष्टमंडळ आणि मनोज जरांगे यांच्यात बैठक सुरु

Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या नेतृत्वाखालील मराठा मोर्चा मुंबईच्या वेशीवर येऊन धडकलाय. मनोज जरांगेच्या आंदोलनाचा आजचा निर्णायक दिवस मानला जातोय.  कारण जरांगेंनी आंदोलन मागे घ्यावे यासाठी सरकारकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान राज्य सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीला पोहचलंय. त्यांच्यात चर्चा सुरू आहे... 

Balasaheb Thorat on Manoj Jarange : राज्यात आणि केंद्रात एकाच पक्षाची सत्ता, इच्छाशक्ती दाखवली तर मराठा आरक्षण लवकर मिळेल : बाळासाहेब थोरात

कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही आमची भूमिका. लाखो लोकांचा समुदाय एकत्र येऊन आंदोलन करतोय. मात्र कुठेही त्याला गालबोट लागलेल नाही.ही कौतुकास्पद आणि अभिमानास्पद गोष्ट. आज राज्यात व केंद्रात एकच पक्षाची सत्ता.केंद्र सरकार जे ठरवतं ते करते हे दाखवून दिलं आहे. राज्याला केंद्राचा मोठा आधार.त्यांनी इच्छाशक्ती दाखवली तर मराठा आरक्षण लवकर मिळेल, असं काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात म्हणाले.

Manoj Jarange rally Live : आधी वकिलांशी चर्चा, मग शिष्टमंडळासोबत वाटाघाटी, मनोज जरांगे काय निर्णय घेणार?

मनोज जरांगे पाटील यांनी आधी आपल्या वकिलांसोबत चर्चा केली. त्यानंतर आता शिष्टमंडळांसोबत जरांगे पाटील चर्चा करत आहेत.  जीआरचा मसुदा घेऊन शिष्टमंडळ जरांगे पाटील यांच्याकडे आला आहे त्यावर चर्चा केली जाणार

Manoj Jarange Live : 2 जणांचे शिष्टमंडळाची मनोज जरांगेंशी चर्चा

Maratha reservation march : सुमंत भांगे (सामान्य प्रशासन विभाग सचीव) आणि मंगेश चिवटे (ओएसडी) दोन जणांचं शिष्टमंडळ मनोज जरांगेंशी चर्चा करण्यास वाशीमध्ये दाखल झाले आहे. सध्या चर्चा सुरु आहे. मंत्रिमंडळाने मनोज जरांगे यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी पाठ फिरवली आहे. जरांगेंना भेटीसाठी येणाऱ्या शिष्टमंडळात देखील मंत्र्यांचा सहभाग दिसत नाही. मागील तीन शिष्टमंडळाच्या बैठकीत छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त उपस्थित होते, आज येणाऱ्या शिष्टमंडळात देखील एकही मंत्री नाही.


 

Manoj Jarange Live : सरकारचे शिष्टमंडळ वाशीमध्ये दाखल

Maratha reservation march : सरकारचे शिष्टमंडळ वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीत चर्चेसाठी पोहचले.  समर्थकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे. शिष्टमंडळासोबतच्या चर्चेनंतर मनोज जरांगे काय निर्णय घेणार? याकडे लक्ष लागलेय. 

Maratha reservation march : छत्रपती शिवाजी महाराज चौकात वाहतूक बंद होण्याच्या मार्गावर

Maratha reservation march :  वाशीमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात वाहतूक बंद होण्याच्या मार्गावर आहे. कारण मराठा समाजाच्या आंदोलकांनी चौकात बसायला सुरुवात केली आहे. त्यामुळे चारही दिशेची वाहतूक बंद करावी लागणार आहे. बेस्ट कडून आधीच या मार्गावरील सर्व बसेस बंद ठेवण्यात आल्या आहेत. 

Manoj Jarange Live : मनोज जरांगे यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी मंत्र्यांनी पाठ फिरवली

Maratha reservation march : मनोज जरांगे यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी मंत्र्यांनी पाठ फिरवली आहे. जरांगेंना भेटीसाठी येणाऱ्या शिष्टमंडळात देखील मंत्र्यांचा सहभाग दिसत नाही. मागील तीन शिष्टमंडळाच्या बैठकीत छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त उपस्थित होते, आज येणाऱ्या शिष्टमंडळात देखील एकही मंत्री नाही.

Manoj Jarange Live : आझाद मैदानावर जाणारच, मनोज जरांगे ठाम

Maratha reservation march : सरकारच्या शिष्टमंडळाशी चर्चा अद्याप झालेली नाही. थोड्या वेळात चर्चा होईल. सरकारसोबत चर्चा झाल्यानंतर प्रसारमाध्यमाला माहिती दिली जाईल. बैठकीत तोडगा निघाला नाही तर आझाद मैदानावर जाणार आहे, असे मनोज जरांगे यांनी सांगितलं. 

Manoj Jarange Live : नवी मुंबईतील वाहतूकीत बदल - 

Maratha reservation march : वाशी एपीएमसी सेक्टर 19 चौकी बंद केल्यामुळे बस मार्ग क्रमांक ५०७,५१७,५३३ चे प्रवर्तन वाशी बस स्थानक येथे पहिल्या बस पासून खंडित करण्यात आले आहे.त्याचप्रमाणे वाशी बस स्थानकांकडून नेरूळकडे जाणारा आनंद ऋषी मार्ग हा शिवाजी चौकापासून बंद केल्यामुळे बस मार्ग क्रमांक ५०४,५०२,५०५ इत्यादीचे अप दिशेचे प्रवर्तन सायन पनवेल मार्ग, शिवाजी चौक येथे यु  वळसा घेऊन पुन्हा सायन पनवेल मार्गाने सकाळी ६.०० वाजल्यापासून परावर्तित करण्यात आले आहे. बस मार्ग क्रमांक 533,517 व 507 वाशी बस स्थानक येथे पहिल्या बस गाडी पासून खंडित केले आहेत.

Manoj Jarange Live : मनोज जरांगेंच्या हस्ते थोड्याच वेळात ध्वजारोहण

Maratha reservation march :  वाशी येथे थोड्याच वेळात मनोज जरांगेंची सभा होणार आहे. त्याआधी त्यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. ते उपस्थित मराठा बांधवांना संबोधित करणार आहेत. 


 


 

Manoj Jarange Live : रात्रीत काय घडले ?

Maratha reservation march : कुणबी प्रमाणपत्र हे वडिलांच्या बाजूच्या नातेवाईकांबरोबर आईच्या बाजूच्या नातेवाईकांना देखील मिळवीत ही मनोज जरांगेंची मागणीय.  या मागणीबाबत सरकारचे शिष्टमंडळ आणि जरांगे यांच्यात काल पुन्हा चर्चा झाली. कुणबी प्रमाणपत्रे ही वडीलांच्या बाजूच्याच नातेवाईकांना देता येतील अशी सरकारची आतापर्यंतची भुमिका राहिलीय. मात्र मनोज जरांगेंच्या नेतृत्वात प्रचंड मोठा मोर्चा मुंबईच्या वेशीवर येऊन पोहचल्यावर सरकार आधीच्या भुमिकेत बदल करु शकते आणि वडिलांबरोबर आईच्या बाजुच्या नातेवाईकांना देखील कुणबी प्रमाणपत्र देण्याचा जी आर काढला जाऊ शकतो.  तसे झाल्यास जरांगे त्यांच आंदोलन मागे घेऊ शकतात.  मात्र त्यानंतर अनेक प्रश्न अनुत्तरित राहतील. पहिला प्रश्न हा की जी आर काढून जाहीर केलेले आरक्षण पुढे कायद्याच्या कसोटीवर टिकेल का आणि दुसरा प्रश्न जरांगेंच्या सरसकट आरक्षणाच्या मागणीचे काय होणार..

Manoj Jarange Live : मनोज जरांगे 9 वाजता मुंबईच्या दिशेने रवाना होणार

Maratha reservation march : सकाळी 5 वाजता मनोज जरांगे पाटील हे वाशी, भुसार मार्केट आलेले आहेत.  येथे दोन तास ते आराम करणार आहेत. त्यानंतर वाशी येथे संबोधित करणार आहेत. त्यानंतर तिथून ते 9 वाजता चेंबूर साठी निघतील..

Manoj Jarange Live : मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा निर्णायक दिवस
Manoj Jarange Live : शिष्टमंडळाकडून मनोज जरांगेंची मनधरणी करण्याचे प्रयत्न होणार

Maratha reservation march : मनोज जरांगेंनी मुंबईत न येता त्यांच आंदोलन मागे घ्यावे यासाठी सरकारकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत.  त्याचबरोबर सरकारकडून मराठा आरक्षणासाठी एक जी आर काढण्यात येणार असून त्यानंतर जरांगे त्यांच आंदोलन मागे घेतील अशीही चर्चाय. आज दिवसभरात सरकारच्या शिष्टमंडळाकडून जरांगेंची मनधरणी करण्याचे प्रयत्न होणार आहेत.  या पार्श्‍वभूमीवर जरांगेंसोबत शेकडो किलोमीटरचा प्रवास करून आलेल्या पाठीराख्यांना काय वाटत हे महत्वाचय. ते  आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

पार्श्वभूमी

 Manoj Jarange Mumbai March Live Update : राज्य सरकारच्या शिष्टमंडळानं रात्री उशिरा मनोज जरांगे यांची भेट घेतली. जवळपास तीन तास शिष्टमंडळ आणि मनोज जरांगेंमध्ये चर्चा झाली. यावेळी सुधारित अध्यादेश मनोज जरांगेंना सुपूर्द करण्यात आला आहे. दरम्यान, अध्यादेशामध्ये सग्यासोयऱ्यांच्या मुद्द्याचा समावेश करण्यात आलेला आहे. तसेच, मनोज जरागेंच्या मागण्याही मान्य करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता मनोज जरांगे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस पिऊन थोड्याच वेळात उपोषण सोडणार असल्याची माहिती मिळत आहे.


मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस पिऊन उपोषण सोडणार : मनोज जरांगे 


"समाज म्हणून आमचा आता एकनाथ शिंदे यांचा विरोध संपला आहे. उद्या सकाळी 8 वाजता वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मुख्यमंत्री पत्र घेऊन येणार आहेत.", असं मनोज जरांगेंनी सांगितलं. तसेच, मी सगळ्यांना विचारून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बोलावलं आहे. उद्या आम्ही येथे सभा घेणार असून मुंबईत जाणार नसल्याचं मनोज जरांगेंनी स्पष्ट केलं. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस पिऊन उपोषण सोडणार असल्याचंही मनोज जरांगेंनी यावेळी जाहीर केलं. 


रात्री उशीरा राज्य सरकारच्या शिष्टमंडळानं मनोज जरांगेंची भेट घेतली आणि त्यांच्याकडे सुधारित अध्यादेश सुपूर्द करण्यात आला. मागण्या मान्य झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी रात्री दोन वाजता पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी सर्व मागण्या मान्य झाल्याचं मराठा बांधवांना सांगितलं. तसेच, सर्व मागण्यांचे अध्यादेशही निघाल्याचं सांगितलं. कुणबी प्रमाणपत्राच्या ज्या नोंदी सापडल्या आहेत, त्यांना प्रमाण पत्र द्यावं, तसेच त्यांच्या कुटुंबानासुद्धा प्रमाणपत्र द्यावं, ही मागणी मान्य झाली आहे. तसेच, सरकारनं सगे सोयऱ्यांबद्दल अध्यादेश काढले आहेत. सुधारित अध्यादेश मला देण्यात आल्याचंही मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं. त्याचप्रमाणे आंतरवली सराटीत मराठा बांधवांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते, तेसुद्धा मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. 


"वंशावळीसाठी तालुका पातळीवर समिती नेमली जाणार आहे. मराठवाड्यात कमी प्रमाण पत्र सापडले त्या बाबत आता शिंदे समिती गॅझेट काढून त्यावर काम करणार आहे. तसेच विधानसभेत यावर कायदा करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमचे आरक्षणचे काम केले आहे.", असंही मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.