Maratha Reservation Nagpur News : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील ( Manoj Jarange Patil) यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर 5 दिवस आमरण उपोषण केले. त्यांच्या या लढ्याला यश आलं आहे. मराठा समाजाला ओबीसीतून (OBC) आरक्षण देण्याची प्रमुख मागणीसह  हैदराबाद आणि सातारा गॅझेटचीही मागणी त्यांनी केली होती. शासनाने हैदराबाद गॅझेट अंमलबजावणी करण्याचे मान्य केलं आहे. आता यावर नागपूरचे राजे मुधोजी भोसले (Raje Mudhoji Bhosale) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण न देता मराठा म्हणून सरसकट स्वतंत्र आरक्षण द्या अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे केली आहे.

Continues below advertisement


नागपूरचे राजे मुधोजी भोसले यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण न देता मराठा म्हणून सरसकट स्वतंत्र आरक्षण द्या अशी मागणी त्यांनी केली आहे. याबाबतच्या मागणीचे पत्र देखील त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलं आहे. 


पत्रात नेमकं काय म्हटलंय?


मराठा आरक्षणाच्या संदर्भात मुंबईच्या आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांनी नुकतेच आंदोलन केलं. यामध्ये मराठ्यांना काय मिळालं? असा सवाल राजे मुधोजी भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहलेल्या पत्रात करण्यात आला आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला माझा पाठिंबा आहे, पणत्यांनी जी मागणी केली की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या, या मागणीतून मराठ्यांना काय साध्य झालं? असा सवाल राजे मुधोजी भोसले यांनी केला आहे. 


मराठवाड्याच्या काही जिल्ह्यात 58 लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत. त्यात अर्थाच काही त्रुटी आहेत. परंतू ज्यांच्या नोंदी आहेत, त्यांन नक्कीच लाभ मिळावा. कागदपत्रांची पूर्रता करण्यात या लाभाचा टक्का निश्चितच घसरणार आहे यात शंका नाही. अशात उर्वरीत अंदाजे 2.50 कोटी मराठ्याचं काय आहे? असा सवाल देखील राजे मुधोजी भोसले यांनी केला आहे. 




मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने माझं व्यक्तिगत मत आहे की, मराठ्यांना मराठा म्हणूनच सरसकट आरक्षण मिळावे, जेणेकरुन हा पेच निर्माण होणार नाही. संपूर्ण महाराष्ट्रातील मराठ्यांना मराठा म्हणूनचं मराठा आरक्षणाचा फायदा होईल असे राजे मुधोजी भोसले यांनीपत्रात म्हटलं आहे. मराठ्यांना मराठा म्हणूनच सरसकट आरक्षण द्यावे, जेणेकरुन 58 लाख कुणबी नोंदीवाले मराठे +उर्वरीत 2.50 कोटी मराठ्यांना मराठा आरक्षणाचा फायदा होईल असे भोसले म्हणाले.


महत्वाच्या बातम्या:


लक्ष्मण हाकेंचं बारामतीत आक्रमक भाषण; म्हणाले, मंडल आयोग शरद पवार यांनी लागू केला असं कोणी म्हणलं तर त्याचं कानफाड फोडा