औरंगाबाद: वाळूज एमआयडीसी तोडफोडप्रकरणात गुंतलेले 18 तरुण हे मराठेत्तर समाजाचे असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. म्हणजे आंदोलकांमध्ये काही समाजकंटक घुसले असल्याच्या शक्यतेला बळ मिळाले आहे.

आतापर्यंत या प्रकरणी एकूण 47 जणांना ताब्यात घेतलं असून, त्यातल्या 37 जणांवर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे या 37 जणांवर कट रचल्याचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. महत्वाची बाब म्हणजे अटकेतील 18 जण हे मराठेतर समाजातील आहेत.

मराठा आंदोलनादरम्यान  9 ऑगस्ट रोजी ओरंगाबादमधील वाळूज एमआयडीसीत आंदोलनाला हिंसक वळण लागलं होतं. त्यात अनेक कंपन्यांचं मोठं नुकसान झालं.

नवा व्हिडीओ

वाळूजमध्ये झालेल्या विध्वंसाचा नवा व्हिडीओ माझाच्या हाती लागला आहे. वाळूजमधल्या एमआयडीसीमध्ये घुसलेल्या आंदोलकांनी अनेक मोठमोठ्या कंपन्यांमध्ये कसा धुडगूस घातला याचा पुरावा देणारा हा व्हीडिओ पोलिसांकडेही देण्यात आलेला आहे.  त्यामुळे त्यातल्या चेहऱ्यांना हेरून त्यांची धरपकड सुरु झालेली आहे.

VIDEO: 


आमदार हर्षवर्धन जाधवांचा आरोप

औरंगाबादमधील वाळूज औद्योगिक वसाहतीमधील तोडफोड लेबर कॉन्ट्रॅक्टर, सप्लाय चेनमधील लोक आणि परप्रांतियांनी केली असून, त्याचं बिल मराठा आंदोलकांवर फाडलं जातंय, असा आरोप आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केला. तसेच, तोडफोड करणाऱ्या समाजकंटकांनी स्वतःचे प्रायव्हेट इश्यूज सेटल करण्याच्या उद्देशाने हे कृत्य केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आमदार हर्षवर्धन जाधव काल जालना येथील पत्रकार परिषदेत बोलत होते.

वाळूज तोडफोड प्रकरण

वाळूज एमआयडीसीतील 50 कंपन्यांचे पंचनामे पूर्ण झाले असून, 60 कोटींपेक्षा अधिकचे नुकसान झाले आहे. अनेक कंपन्यांचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. या तोडफोड प्रकरणी आतापर्यंत 47 जणांना ताब्यात घेतलं असून, 37 जणांवर अटकेची कारवाई केली आहे.

तोडफोडीची सीआयडी चौकशी करा, मराठा मोर्चाची मागणी 

वाळूज एमआयडीसीत ज्या कंपन्यांची तोडफोड झाली आहे, त्या कंपन्यांतील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी घ्यावं, आंदोलनात तोंड बांधून तोडफोड करण्यात आली. यापूर्वी कोणीही तोडफोड केली नाही, मग आताच का झाली? या तोडफोडीची सीआयडी चौकशी करा, अशी मागणी मराठा मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांनी केली. मराठा मोर्चा आयोजकांनी औरंगाबादमध्ये पत्रकार परिषद घेत, तोडफोडीच्या घटनेचा निषेध करत, सीआयडी चौकशीची मागणी केली.

संबंधित बातम्या

बंद कंपन्यांमध्ये तोडफोड केल्याप्रकरणी औरंगाबादेत 41 जण अटकेत  

वाळूज एमआयडीसी तोडफोडीचे पंचनामे, 60 कोटीचं नुकसान, धरपकड सुरुच