पुणे: आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजातर्फे आजही विविध ठिकाणी आंदोलन करण्यात येणार आहे. धनगर समाजाचा समावेश अनुसूचित जमातींमध्ये करण्याची मागणी आंदोलकांची आहे. पुण्यात तहसील कार्यालयावर सकाळी 11 वाजता आंदोलन करण्यात येणार आहे. तर बारामतीच्या प्रशासकीय भवनावरही धनगर बांधवांनी ठिय्या आंदोलनाचं आयोजन केलं आहे.
औरंगाबाद, नागपूर, जळगाव, जालना, कोल्हापूरसह अनेक शहर आणि गावांमध्ये काल धनगर समाजाने आंदोलन केलं. शेळ्या मेंढ्या घेऊन काल ठिकठिकाणी रस्तारोको करण्यात आला. तर काही ठिकाणी धनगर बांधवांनी आपल्या पारंपरिक वाद्यांसह जागरण गोंधळही घातला.
धनगर आणि धनगड अशा दोन वेगळ्या जाती असल्याचा सरकारचा दावा आहे. तसं प्रतिज्ञापत्र आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी हायकोर्टात दिलं. मात्र धनगर आणि धनगड ही फक्त प्रशासकीय चूक आहे. राज्यात एकही धनगड अस्तित्वात नाही. त्यामुळे 1 सप्टेंबरच्या आत ही चूक दुरुस्त केली नाही तर 5 लाख धनगर मिळून औरंगाबादेत एल्गार पुकारतील असा इशारा धनगर समाजाने यापूर्वीच दिला होता.
माझा हस्तक्षेप | धनगरांच्या आरक्षणाचा प्रश्न का सुटत नाही?
आघाडी सरकारच्या काळात हा प्रश्न पेटला तेव्हा देवेंद्र फडणवीस स्वत: धनगरांच्या व्यासपीठावर गेले. त्यांनी सत्तेवर आल्यानंतर पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा प्रश्न सोडवू असं आश्वासन त्यांनी दिलं. मात्र 4 वर्ष झाली तरी फडणवीसांनी धनगर आरक्षणाचं घोंगडं भिजत ठेवल्याचा आरोप आहे.
सरकारचं दुर्लक्ष
दरम्यान धनगर समाजाच्या मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप राज्यसभा खासदार विकास महात्मे यांनी केला. धनगर आणि धनगड अशा दोन वेगळ्या जाती असल्याचा सरकारचा दावा आहे. मात्र, राज्यात एकही धनगड अस्तित्वात नाही असं ते म्हणाले. खासदार विकास महात्मे काल धनगर समाजानं आयोजित केलेल्या नागपुरातील मोर्चात सहभागी झाले होते.
आदिवासींमध्ये अस्वस्थता
दरम्यान आदिवासी कोट्यातून धनगरांना आरक्षण देण्याची मागणी होत असल्यानं आदिवासी समाजामध्ये अस्वस्थता आहे. यासाठी आदिवासी आमदार माजी मंत्री आणि अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे अध्यक्ष मधुकर पिचड यांची भेट घेणार आहेत. आदिवासींच्या आरक्षणाला धक्का न लावता धनगर समाजाला आरक्षण देण्याची मागणी आमदारांकडून केली जात आहे.
कोणत्या मुद्द्यांआधारे आरक्षणाची मागणी?
- बॉम्बे रजिस्ट्रेशन अक्टमध्ये ‘धनगर’ ऐवजी ‘धनगड’ असा उल्लेख
- प्रत्येक राज्यात उच्चार धनगर असो किंवा धनगड, अर्थ समान असल्याचा दावा
- वर्षानुवर्षे धनगरांचा मेंढीपालनाचा व्यवसाय
- नृत्य, गायन, देव-देवतांसंदर्भात धनगरांची खास संस्कृती
- मानववंश शास्त्र आणि सामाजिक दृष्ट्या धनगर भटकी जमात असल्याचा उल्लेख
- समाजाचा समावेश आदिवासी जमातीत का नाही, असा प्रश्न भटक्या विमुक्तांच्या अभ्यासकांनी केला
- बिहार आणि झारखंडमध्ये धनगरांचा समावेश आदिवासी जमातीत
संबंधित बातम्या
धनगर आरक्षण: फडणवीससाहेब, त्या आश्वासनाचं काय झालं?
अनुसूचित जमातींमध्ये समावेशासाठी धनगर समाजाचा एल्गार
धनगर आरक्षणावर वेळीच लक्ष द्या, नाहीतर तेही रस्त्यावर उतरतील : विकास महात्मे
स्पेशल रिपोर्ट: मराठ्यांनंतर धनगर आक्रमक
धनगर की धनगड, शब्दातील घोळामुळे आरक्षण रखडलं
धनगर समाजाचं आजही विविध ठिकाणी आंदोलन
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
14 Aug 2018 07:37 AM (IST)
पुण्यात तहसील कार्यालयावर सकाळी 11 वाजता आंदोलन करण्यात येणार आहे. तर बारामतीच्या प्रशासकीय भवनावरही धनगर बांधवांनी ठिय्या आंदोलनाचं आयोजन केलं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -