औरंगाबाद : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने गुरुवारी पुकारलेल्या बंददरम्यान जाळपोळ, रेल्वेरोको आणि दगडफेकीच्या घटना घडल्या होत्या. याप्रकरणी मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत जवळपास पाच हजार आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शुक्रवारपर्यंत एकूण 41 जणांना ताब्यात घेतलं आहे.


औरंगाबादेतील वाळूज एमआयडीसीतील तोडफोड आणि जाळपोळप्रकरणी एमआयडीसी वाळूज ठाण्यात सात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी 1500 संशयितांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून 41 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रेल्वे रोखल्याप्रकरणी जवळपास चार हजार आंदोलकांवर लोहमार्ग गुन्हा नोंद केला आहे.


उस्मानाबादेत 35 आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. लातुरात तीन ठिकाणी दगडफेक झाली असून येथे 27 जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परभणी जिल्ह्यात 44 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बीड जिल्ह्यात 32 जणांविरूद्ध दाखल करण्यात आला आहे. वाहनांवर दगडफेक करणे, ट्रक जाळणे व रस्त्यावर टायर जाळून वाहतुकीस अडथळा निर्माण करणे अशा स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.


नांदेड जिल्ह्यात झालेल्या जाळपोळ आणि दगडफेक घटनांच्या पार्श्वभूमीवर सात पोलीस ठाण्यात 300 हून अधिक जणांवर गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. जालन्यात दोन प्रकरणात 22 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.


संबधित बातम्या


महाराष्ट्र बंद : पुण्यात आंदोलकांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाची तोडफोड


मराठा मोर्चात वऱ्हाड, आंदोलनास्थळीच लग्न!


महाराष्ट्र बंद: विधानभवनाच्या गेटवर आमदार आबिटकरांचा ठिय्या


महाराष्ट्र बंद : आचारसंहितेचं उल्लंघन, पेटवा-पेटवी कोण करतंय?


महाराष्ट्र बंद : शरद पवारांच्या बारामतीमधील घराबाहेर ठिय्या