Beed : बीडमध्ये आयोजीत केलेल्या ओबीसी मेळाव्यात आज मंत्री छगन भुजबळ आणि लक्ष्मण हाके यांनी मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांना वर्णभेदावरून डिवचल्याचं पाहायला मिळाला. यानंतर काळकुटे यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. भुजबळ यांच्या बुद्धीची कीव येते. अतिशय खालच्या पातळीत माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला वर्णभेदावरून बोलणं शोभत नसल्याचे काळकुटे म्हणाले. वयाप्रमाणे त्यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे, त्यामुलं त्यांचे वर्तन असे होत आहे.
आज केवळ मनोज जरांगे पाटील आणि मला शिव्या देण्याचा कार्यक्रम होता असे गंगाधर काळकुटे म्हणाले. हा ओबीसी समाजाचा मेळावा नव्हता. फक्त शिव्या देण्याचा कार्यक्रम होता त्यात ते यशस्वी झाले. त्यांची संस्कृती आज सर्वांनी पाहिली. मंत्री पदाचे लाभ घ्यायचे. पण मराठा ओबीसी असा वाद लावायचा. तुम्ही विरोध केला आम्ही देखील विरोध करणार मात्र लोकशाही मार्गाने असेल असेही काळकुटे म्हणाले.
मराठा समाजाने कधीही ओबीसी समाजाच्या मोर्चाला प्रति मोर्चा काढले नाही
इथून पुढे आता कोर्टातील लढाई आणि रस्त्यावरची लढाई लढण्यासाठी आम्ही ठाम आहोत.धनंजय मुंडे बोलले त्यात काही अंशी तथ्य आहे. मराठा समाजाने कधीही ओबीसी समाजाच्या मोर्चाला प्रति मोर्चा काढले नाहीत. भुजबळांच्या भूमिकेमुळे आज मराठा ओबीसी वाद निर्माण झाला आहे. याला सर्वस्वी भुजबळ आणि त्यांची समता परिषद जबाबदार असल्याचे गंगाधर काळकुटे म्हणाले.
फडणवीसांनीमराठा समाजाला दिलेलं 16 टक्के आरक्षण भुजबळांनी घालवलं
2014 ते 19 दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण दिले होते. ते आरक्षण भुजबळांनी सुप्रीम कोर्टात घालवले. आता बीड जिल्ह्यात महाएल्गार सभेला लवकरच उत्तर सभा होईल. याचा निर्णय मनोज जरांगे पाटील घेतील असे काळकुटे म्हणाले.
मराठा आणि कुणबी या दोन वेगळ्या जाती : छगन भुजबळ
मराठा आणि कुणबी या दोन वेगळ्या जाती आहेत, हा निर्णय उच्च न्यायालयानं दिला आहे, सर्वोच्च न्यायालयाने देखील सांगितलं आहे की, मराठा समाज हा सामाजिकदृष्टया मागास नाही असे भुजबळ म्हणाले. भाजपच्या सगळ्या नेत्यांना सांगतोय, ओबीसीच्या ताकतीवर तुम्हाला 145 आमदार मिळाले आहेत. त्यामुळं यावर मार्ग काढा असे भुजबळ म्हणाले. मराठा समाज आणि आमच्या अंतर पडले ते अंतर अंतरवलीच्या दरीद्री पाटलामुळे पडले आहे, असे म्हणत मंत्री छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यावर टीका केली. आरक्षण सामाजिक दृष्ट्या मागासलेल्यांसाठी आहे. तो गरिबी हटावचा कार्यक्रम नाही असे भुजबळ म्हणाले
महत्वाच्या बातम्या: