Manoj Jarange Patil on Chhagan Bhujbal : छगन भुजबळ हा सरकारमध्ये राहून वाद लावत आहे. तो जातीय दंगली घडवणार आहे. तो बीड मध्ये दहशत निर्माण करणार आहे, भय निर्णय होईल अशी परिस्थिती त्याने निर्माण केली आहे, असे म्हणत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीका केली. गृहमंत्रालयानं त्याचा जमीन रद्द करावा, कारण तो जमिनीवर बाहेर आला अशी विनंती जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली.
बीड जिल्ह्यात जे दूषित वातावरण निर्माण झालं आहे, ते आता आम्ही मोडीत काढणार
बीड जिल्ह्यात जे दूषित वातावरण निर्माण झालं आहे, ते आता आम्ही मोडीत काढणार असल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले. विखे पाटील अंतरवालीमध्ये भेटायला जरी आले तरी समाजाला काही द्यायला येतो. ओबीसींचं आरक्षण रद्द करा, यासाठी एकही नेता येत नाही. तुम्ही गरीब लोकांच्या हितासाठी नेणाऱ्या मराठा नेत्यांची तुलना करू शकत नाही. गृह मंत्रालयाने त्याची जमीन रद्द करावा, तो जमिनीवर बाहेर आला आहे, त्याची जमीन रद्द करा असे जरांगे म्हणाले.
फडणवीस यांनी मराठ्यांचं मन जिंकलं आहे
फडणवीस यांनी मराठ्यांचं मन जिंकलं आहे. फडणवीस यांच्या लक्षात आलं आहे त्याची अवकाद किती आहे. त्या ग्राउंडवर आमची घोंगडी बैठक झाली आहे. फडणवीस आणि विखे, शिंदे अजितदादा यांना बदनाम करण्याचं काम भुजबळ करत आहे. त्याने अजितदादांना बदनाम करण्याचा विडा उचलला आहे. याच्या सभेतून लक्षात आले आहे त्यामुळे पवार यांनी याला बाजूला करावे. अजित पवारांनी बीड जिल्हा दुसऱ्याच्या हातात द्यावा असेही जरांगे म्हणाले.
तुमच्या दाबावातून अधिकारी मुक्त झाले म्हणूंन ते प्रमाणपत्र वाटप करत आहेत.आमचं रेकोर्ड असूनसुध्दा आम्हाला मिळत नाही. आमच्या नेत्यांना तुम्ही बोलता. तुम्ही विखेंना बोलता ते काही तुमचं आरक्षण रद्द करा यासाठी येत नाहीत. मराठ्यांच्या गरिबांच्या लेकरांना आरक्षण द्या म्हणून ते येतात. मराठ्यांना आरक्षण द्या म्हणायला विखे बाहेर येणार. असे जरांगे म्हणाले. माझ्यासाठी माझा समाज महत्वाचा आहे. तो काहीही म्हणो. राज्याला साडेसाती लावली आहे. हे भुरट भुजबळ राज्याला साडेसाती असल्याची टीकादेखीलजरांगे पाटीलयांनी केली.
महत्वाच्या बातम्या: