Manoj Jarange Patil : बीडमध्ये झालेली सभा ही ओबीसीची सभा नाही, त्या जिल्ह्यावर दबाव निर्माण करण्यासाठी घेतलेली सभा असल्याचे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील म्हणाले. मराठा समाज हा 50 ते 55 टक्के आहे. राजकीय अस्तित्वासाठी त्यांनी आज सभा घेतली. मराठ्यांच्या पोरांचं वाटोळ करण्यासाठी घेतलेली ही सभा आहे. मराठ्यांच्या कुणबी नोंदी आणि जीआर रद्द करण्यासासाठी हे काम करत आहेत. मराठ्यांना आपली ताकद दाखवावी लागेल,. आम्ही कोणालाही भीत नसल्याचे जरांगे पाटील म्हणाले. तोडीस तोड उत्तर द्यावं लागेल असे जरांगे पाटील म्हणाले. भुजबळांना वातावरण खराब करायचं आहे. भुजबळांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादांना बदनाम करायचंय असेही जरांगे म्हणाले.
भुजबळ वातावरण खराब करत आहेत
चांगल वातावरण दुषीत करण्यासाठी त्यांना काम करायचं आहे. हा खाटाटोप कशासाठी हे सरकारच्या लक्षात आले असेल. भुजबळ वातावरण खराब करत आहेत. भुजबळ काहीही बोललात, त्यांची अक्कल दाढ पडली आहे. ओबीसीतूनच आरक्षण घेणार मराठ्यांना देणार असे जरांगे म्हणाले. तुम्ही मराठ्यांना भाषणातून काय धमक्या देता असेही जरांगे म्हणाले. फडणवीसांना मराठ्यांचं मन जिकंलं आहे. पण भुजबळ सरकारला बदनाम करण्याचे काम करत आहेत. अजितदादांना बदनाम करण्याचं काम भुजबळ करत आहेत असेही जरांगे म्हणाले.
मराठ्यांचे नेते ओबीसीचे आरक्षण कमी करायला येत नाहीत
अधिकारी हुशार झाले कारण तुमच्या दबावातून ते मुक्त झाले. ज्याची नोंद सापडली त्याला कुणबी प्रमाणपत्र दिले पाहिजे असे अधिकाऱ्यांनाही वाटत आहे. मराठ्यांचे नेते ओबीसीचे आरक्षण कमी करायला येत नाहीत, ते गरिबीच्या लेकराच आरक्षण मिळावं म्हणून येत आहेत. तुमच्याकडे येतात ते आम्हाला आरक्षण देऊ नका म्हणून येत असल्याचे जरांगे म्हणाले. मराठ्याचे नेते ओबीसीला आरक्षण देऊ नका हे म्हणण्यासाठी कधीच बाहेर येणार नाहीत. मराठ्यांच्या लेकराला द्या हे सांगण्यासाठी बाहेर येतात असे जरांगे म्हणाले.
मला समाज महत्वाचा आहे. भुजबळ शनी आहे. भुरड आहे. कुठल्याही सरकारला साडेसाती आहे. ज्यांना त्यांना दिलं त्यांच्याशी भुजबळांनी गद्दारी केल्याचे जरांगे म्हणाले. तू पंतप्रधानाच्या आईला काय म्हणला होता? फडणवीसांना काय म्हणाला होता? तुझी सुद्धा एक क्लिप आहे. ते काढून बघा, असे म्हणत जरांगेनी त्यांच्यावर टीका केली.
महत्वाच्या बातम्या: