लातूर : सरकारशी कोणतीही चर्चा होणार नाही. मागण्या सांगितलेल्या आहेत, त्या मान्य करा. मुंबईत चर्चा करणाऱ्या समन्वयकांशी समाजाचा संबध नाही, असा ठराव लातूरमध्ये एकमताने मंजूर करण्यात आला आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या लातूरमधील राज्यस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. लातूर जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बार्शी रोडवरील राहीचंद्र मंगल कार्यालयात सकाळी 11 वाजल्यापासून ही बैठक सरू झाली. विविध निर्णय यामध्ये घेण्यात आले. सरकारला मागण्यांचं निवेदन यापूर्वीच देण्यात आलेलं आहे. त्यामुळे आता निर्णय हवा आहे, चर्चा नको. मुंबईतील चर्चा करणाऱ्या समन्वयकांशी मराठा समाजाचा संबंध नाही, असं लातूरमध्ये स्पष्ट करण्यात आलं. लातूरमधील बैठकीतील निर्णय 1 ते 9 ऑगस्ट सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार. राज्यातील प्रत्येक गावाच्या वेशीवर समाज बांधव गुराढोरांसह ठिय्या देणार राज्यातील सर्व मराठा आमदार आणि खासदार यांच्या निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन होणार गुन्हे सरसकट तातडीने मागे घ्यावेत व्हिडीओ : संपूर्ण पत्रकार परिषद संबंधित बातम्या : मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार : मुख्यमंत्री घटनादुरुस्तीतून समाजाला खुश करण्याचा प्रश्नच नाही : पवार मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलावणार : मुख्यमंत्री