Manoj Jarange on Chhagan Bhujbal : जालन्याच्या (Jalana News) आंतरवाली (Antarwali) सराटीममध्ये (Sarati) मराठा आरक्षणाचे (Maratha Aarakshan) उपोषकर्ते मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांची जाहीर सभा पार पडली. सभेला राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा समाजानं गर्दी केली होती. या विराट सभेतून मनोज जरांगेंनी सरकारला शेवटचं अल्टिमेटम दिलं. तसेच, जरांगेंच्या सभेवर टीका करणाऱ्या मंत्री छगन भुजबळ आणि गुणरत्न सदावर्ते यांना चांगलंच फैलावर घेतलं आहे. मराठा समाजाला उसकवा, असं उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्र्यांनी भुजबळ आणि सदावर्देंना सांगितल्याचा गंभीर आरोप जरांगेंनी केला आहे. याशिवाय सरकारनं आपलं फेसबुक अकाउंटही बंद केल्याचा आरोप जरांगेनी भर सभेत केला आहे. एवढंच नाहीतर सात कोटींची जमीन घेतल्याचा आरोप करणाऱ्या भुजबळांना जरांगेंनी थेट भर सभेत हिशोब देत त्यांच्यावर पलटवार केला आहे. 


घाम गाळून सभेसाठी पैसा उभा केला, ज्या मराठ्यांनी मोठं केलं त्यांचेच पैसे खाल्ले : मनोज जरांगे 


मराठा आरक्षणाचे उपोषणकर्ते मनोज जरांगे म्हणाले की, "सरकारनं सांगितलं होतं की, गुन्हे मागे घेतले जाणार मात्र अजुनही झालेलं नाही, ते तातडीनं मागे घ्यावेत. आता नवा एक फॉर्मुला आला आहे. तो एकदिवस म्हणाला, आपला काय मराठा आरक्षणाला विरोध नाही बुवा, आपल्या एकट्याच्याच मागे लागलेत. आरक्षणाला विरोध नाही म्हटल्यावर आपण बोलायला बंद केलं. पण कालपरवा तो परत फडफड करायला लागलाय. ते म्हणतंय, सात कोटी खर्च आलाय. अरे काय वावर घेतलंय का येडपटा... 100 एकर विकत नाही घेतलं, ते सभेसाठी घेतलं भाड्यानं. एका शेतकऱ्यानं फुकट दिलंय, येऊन विचार. तो म्हणतोय, लोक आता 10 रुपये देत नाहीत, अरे तुला देत नसतील. अरे तुला का देत नसतील तर, ज्या गोरगरिब मराठ्यानं तुला मोठं केलं, त्यांचंच रक्त पिऊन तू पैसा कमावला, त्यामुळे तुझ्याकडे धाड पडली, ज्यांचे पैसे खाल्ले आणि दोन वर्ष बेसन खाऊन आलास आत. आम्हाला शिकवतो पैसे कुठून आले? माझा मायबाप मराठा काबाडकष्ट शेतात करतो. आम्ही घाम गाळतो घाम. माझ्या मायबापानं घाम गाळून हजार, पाचशे रुपये जमा केले आहेत आणि महाराष्ट्रातून येणाऱ्या मराठ्यांची सेवा करण्याचं काम 123 गावकऱ्यांनी केलं आहे. तुझ्यासारखं नाही आमचं." , असं जरांगे म्हणाले. 


महाराष्ट्रतला मराठा समाज निधी देणार होता, जाहीर सांगतो. पण आम्ही सांगितलं, आम्हाला सेवा करायची आहे, एक रुपयाही नको. आम्ही 123 गावातून निधी गोळा केला आणि त्यातून 21 लाख जमा झाले. लगेच हिशोब घे म्हणावं त्याला सात कोटी वाल्याला. हे मराठ्यांना सांगणं गरजेचं आहे, त्याच्यासाठी नाही, ते सात-आठ वेळा जाऊन आलंय, आणखी जायची वेळ आली त्याची परत, असं म्हणत छगन भुजबळांना जरांगेंनी सणसणीत टोला लगावला. 


सात कोटींचा आरोप करणाऱ्या भुजबळांना जरांगेंकडून भर सभेत हिशोब 


टोटल 21 लाख जमा झाले, 123 गावांतून 22 गावातल्या लोकांनी पैसे दिले, तेच 21 लाख झालेत, आपल्याकडे आणखी 101 गावं शिल्लक आहेत, त्यांच्याकडे पैसे जमा आहेत, पण ते आपण घेतलेले नाही, कारण हे आंदोलन पैशांसाठी नाही जनतेसाठी आहे, असं म्हणत जरांगे पाटलांनी संपूर्ण हिशोब जाहीर केला आणि भुजबळांना प्रत्युत्तर दिलं. पुढे जरांगे म्हणाले की, त्याला वावर घ्यायचं लागलंय वेड, ते घेतंय वावरं, पैसे खातंय जनतेचं, त्याला वाटलं सभेसाठी आपण वावरंच विकत घेतलं. ते म्हणतंय सात कोटी खर्च आला, पण कोटीच पहिल्यांदा ऐकलंय आम्ही. काय म्हणावं एवढ्या मोठ्या नेत्याला कळालं पाहिजे, उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब तुमच्या पक्षाचा आहे, त्याला जरा समज द्या. नाहीतर मी असा मागं लागंल, माझ्या नादाला लागलं तर मी सोडतंच नाही.


पाहा व्हिडीओ : Manoj Jarange on Chhagan Bhujbal : 7 कोटी खर्च आला, अरे काय वावर घेतला काय येडपटा?



महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Manoj Jarange Patil Sabha LIVE : भुजबळ टार्गेट, मराठा आरक्षण आंदोलनाची पुढची दिशा 22 तारखेला, मनोज जरांगेंचा शब्द अन् शब्द जसाच्या तसा