छत्रपती संभाजीनगर राज्यात ओबीसी (OBC Reservation) आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा (Maratha Reservation) अत्यंत कळीचा होऊन गेला आहे. ओबीसी आंदोलक  लक्ष्मण  हाकेंनी (Laxman Hake)  केलेल्या टीकेला मनोज जरांगेंनी (Manoj Jarange)  प्रत्युत्तर दिलंय. तुम्ही सतराशे उमेदवार उभे करा.  लोकशाहीनं अधिकार दिल्याचं जरांगेंनी सांगितलंय. दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी भुजबळांवरही निशाणा साधला आहे.  


मराठा आरक्षणासाठी आंदोलनाचं शस्त्र हाती घेऊन उभे ठाकलेल्या मनोज जरांगेंच्या फॅक्टरचा लोकसभेच्या निकालावर मोठा परिणाम झाल्याचं दिसून आलंय. जरांगेंमुळे महायुतीला जबरी फटका सहन करावा लागला. अशातच, आता येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत उमेदवार देण्याबाबतही जरांगे चाचपणी करत आहेत.  आज पुन्हा एकदा जरांगेंनी इशारा दिला आहे.   जरांगे म्हणाले,   तुम्ही 1700  उमेदवार  उभे करा.तुम्हाला लोकशाहीने अधिकार दिला आहे.आम्ही विरोधक मानत नाही. मी राज्यातील एका ही ओबीसी बांधवांना दुखवले नाही. मफलर आडवी टाकून तो तिकडे बसतो आणि वाद लावून देतो. आरक्षण दिले नाही तर  मराठा सुपडा साफ केल्याशिवाय राहणार नाही. कितीही गोड बोलले तरी लोकसभेनंतर आता विधानसभेत दाखवू. आम्ही उमेदवार उभा नाही करणार मात्र त्यांचे उमेदवार पाडू, असा इशारा जरांगेंनी दिला आहे. 


मराठ्यांना गोड बोलून डाव साधण्याचा हा डाव : मनोज जरांगे


मनोज जरांगे म्हणाले,  मराठा आणि कुणबी एकच आहे.आमचं हक्काचे आरक्षण द्या. सगे सोयरे आरक्षण देऊन ते उडवण्याचा सरकारचा डाव आहे आणि ते उडवणार आहे.  सरकार आरक्षण देणार आणि तेच आरक्षण देणार आहे. आरक्षण देण्याच्या आधीच याचिका दाखल झाली होती. पुन्हा मराठ्यांना गोड बोलून डाव साधण्याचा हा डाव आहे. आरक्षण ओबीसीतून घेणार अन्यथा 288 उभे करू नाहीतर 288 पाडू.   आरक्षण टिकू न देण्याची तयारी गिरीश महाजन यांनी केली आहे.


राजकीय स्टंट करून उपयोग नाही: मनोज जरांगे


वेगळा प्रवर्ग कोणता ? कोणता वेगळा प्रवर्ग आहे हे महत्वाचे आहे. आमचे जे हक्काचे आहे ते आम्हाला मिळावे. कायदेशीर बाजू मराठा आणि कुणबी एक असताना आरक्षण मिळत नाही.  रेकॉर्डला असणारे आरक्षण आम्ही घेणार आहे. त्यांनी कितीही सांगितले तर आम्ही तुमच्या आधी आरक्षणात आम्ही ते घेणार आहे. राजकीय स्टंट करून उपयोग नाही.  आपण प्रकाश आंबेडकर यांचां सन्मान करतो ,त्यांचं चुकल तरी बोलायचं नसते, असे  जरांगे म्हणाले.