Beed Lok Sabha Constituency: राज्याच्या राजकारणात बीड लोकसभा (Beed Loksabha) मतदारसंघातील राजकीय सामन्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. अशातच आता या मतदारसंघात नवा ट्विस्ट आल्याचे बघायला मिळत आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्या आंदोलनातील सहकारी असलेले गंगाधर काळकुटे यांनी बीड लोकसभेसाठी दोन दिवसांपूर्वी अर्ज दाखल केला होता. मात्र, मराठा समाजातील मतदानाचे  ध्रुवीकरण टाळण्यासाठी त्यांनी आपला अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला असून त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाची जी भूमिका आहे, त्या भूमिकेच्या मागे मी असून मराठा आंदोलनात सक्रिय काम करणार असल्याचं गंगाधर काळकुटे यांनी यावेळी सांगितलं.


गंगाधर काळकुटेंचा मोठा निर्णय


बीड लोकसभा (Beed Loksabha) मतदारसंघात मी कोणाच्याही सांगण्यावरून उमेदवारी अर्ज दाखल केला नव्हता. बीड मधील भाजप आणि राष्ट्रवादी गटाचे जे उमेदवार आहेत. त्यांनी आपली आरक्षणाची भूमिका जाहीर केली नव्हती, म्हणून मी हा उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र, काल या दोन्ही उमेदवार आणि मनोज जरांगे पाटील यांची भेट झाली. या भेटीमध्ये त्यांच्यात काही सकारात्मक चर्चा झाली. म्हणून मी माझा उमेदवारी अर्ज मागे घेत असून इथून पुढेही जरांगे पाटील यांच्या सोबत काम करणार असल्याची प्रतिक्रिया गंगाधर काळकुटे यांनी दिली. त्यामुळे आता बीडच्या राजकारणाला एक वेगळे वळण लागले असून या मतदारसंघात भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे विरुद्ध  महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे (Bajrang Sonavane) यांच्यात थेट लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. 


बीडच्या रणांगणात मराठा आरक्षणाचा मुद्दा


मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील  यांच्या मराठा आरक्षण आंदोलनात सहभागी असलेले सहकारी आणि बीडचे रहिवासी गंगाधर काळकुटे यांनी बीड लोकसभेच्या निवडणुकीसाठी उशिरा अर्ज भरला होता. त्यामुळे स्थानिक राजकारणाला वेगळे वळण लागले होते. तर दुसरीकडे बीडमध्ये प्रचाराच्या मुद्द्यात  मराठा आरक्षणाचाच मुद्दा गाजत होता. त्यामुळे, पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे हे दोन्ही उमेदवार मराठा आरक्षणा संदर्भातील भूमिका मांडताना सावध पवित्रा घेताना दिसून आले. त्यामुळेच, आपण मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आणि समाजाच्या हितासाठी निवडणूक लढत असल्याचं गंगाधर काळकुटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर सांगितले होते.  तसेच, या संदर्भात मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन, चर्चा केल्यानंतरच अर्ज ठेवायचा की मागे घ्यायचा याचा निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. परिणामी आज त्यांनी आपला उमेदवारी अर्ज घेऊन निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या