Manoj Jarange Patil : कुणबी नोंदी असूनही प्रमाणपत्र दिले जात नाही, याबाबत सरकारशी बोलणं झालं आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, मराठ्यांची अडवणूक करु नका. आमचं नुकसान झालं तर आता सहन करणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी दिली आहे. ECBC च्या विद्यार्थ्यांना त्रास दिला जातोय, अधिकारी देखील जातीयवादी आहेत असंही जरांगे पाटील म्हणाले. सरकारचे डोळे दोन बोट घालून उघडीन, मग त्यांना दिसेल असंही जरांगे पाटील म्हणाले. 


आम्ही शंभुराज देसाई यांच्यावर विश्वास ठेवलाय


हैदराबादवरुन गॅझेट आणलं अशी माहिती शंभुराज देसाई यांनी दिली आहे. आम्ही शंभुराज यांच्यावर विश्वास ठेवला आहे. सरकारवर विश्वास ठेवत नाही असे जरांगे पाटील म्हणाले. मागेल त्या मराठ्याला कुणबी नोंदीच्या आधारे आरक्षण देता येणार असल्याचे जरांगे म्हणाले. 288 पाडायचे किंवा निवडून द्यायचे, हे महाराष्ट्राची बैठक घेऊन निर्णय जाहीर करु असे जरांगे पाटील म्हणाले. सगळीकडे रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे जरांगे म्हणाले. 


सगळे आमदार एकाच माळेचे मनी 


विधिमंडळ कामकाज आणि राड्यावर देखील जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. आम्ही लहानपानापासून या आमदारांचा राडा बघत आहोत. हे सगळे एकाच माळेचे मनी आहेत. विरोधक आले नाही म्हणून एकमेकांना कोलवू नका, आमही कसं आरक्षण मिळवायचं ते बघू असेही जरांगे पाटील म्हणाले. 


जरांगे पाटलांची आज जालना शहरात शांतता रॅली 


मनोज जरांगे यांची शांतता रॅली आज जालना येथे दाखल होणार आहे. काल बीडच्या रॅलीनंतर अंतरवाली सराटी येथे मुक्कामी असलेले मनोज जरांगे हे  जालना शहरांमध्ये दाखल झाले आहेत. जालना शहरातील छत्रपती संभाजी महाराज पुतळा चौकातून या रॅलीला सुरुवात होणार आहे. यासाठी आयोजकांकडून तयारी करण्यात आली असून, रॅली दरम्यान तीन ठिकाणी मनोज जरांगे यांचे जेसीबी आणि मोठ्या फुलांचे हार घालून स्वागत होणार आहे. थोड्याच वेळात जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीला सुरुवात होणार आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या संदर्भात मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला 13 जुलैपर्यंत वेळ दिली होता. आता दिलेला विळ संपायला आणखी एक दिवस बाकी आहे. उद्या 13 जुलै आहे. त्यामुळं आता निर्णय झाला नाही तर पुढं जरांगे पाटील काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 


महत्वाच्या बातम्या:


मनोज जरांगे आज होम ग्राउंडवर, 11 वाजता शांतता रॅलीला सुरुवात होणार, जालनाकरांकडून स्वागताची जय्यत तयारी