Manoj Jarange Patil : धनंजय मुंडे यांनी माझी 2.5 कोटींची सुपारी दिली होती. याबाबत तीन आरोपींनी कबुली दिली आहे. धनंजय मुंडे यांना चौकशीला बोलवा. नाही बोलवले तर भारी पडेल तुम्हाला असे जरांगे म्हणाले. सत्तेचा माज आहे तुम्हाला. त्यामुळे चौकशी करत नाहीत. सत्ता गेल्यावर सोडणार नाही. तुमची सत्ता मराठा घालवणार असल्याची टीका जरांगे यांनी केली. प्रत्येक गावातील मराठा माझ्या मागे आहेत. जिथं तू मला मारायला येशील तिथे मराठ्यांची पोरं दगड घेवून येतील.
आपण बेसावध राहिल्यामुळे आपला कार्यक्रम झाला
गरिबात लय ताकद आहे. आपल्याला आपली ताकद कळली नाही. आपण बेसावध राहिल्यामुळे आपला कार्यक्रम झाला असे वक्तव्य मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केलं. बाकीचे सावध राहिल्याने पुढे गेले. आता आपण सावध राहिलो तरच टिकून राहू. श्रीमंत मराठा गरीब मराठ्याला दाद देत नसल्याने मी गरीब मराठ्यांसाठी आंदोलनात उतरलो आहे. मला अनेक प्रलोभने आली पण भुललो नाही असेही जरांगे म्हणाले. 70 वर्षात मुंबई बंद पाडण्याची ताकद मराठ्यांमध्ये आहे. सत्ता, पक्ष येत जात राहतील, पण आपल्याला एकजुटीने लढायचे आहे. एकजूट तुटून द्यायची नाही. एकमेकांसाठी धावून गेलो तरच वाचू, बाकी सगळे आपल्या विरोधात आहेत असे जरांगे म्हणाले.
दारु पिणारांची भाकरी बायकांनी बंद करावी
मुंबईत सरकार आपल्याला नाही घाबरले तर आपल्या भाकरीला घाबरले. मराठे मुंबईचे जीवन जीवंत करुन गेले. आपलं अस्तित्व दाखविण्यासाठी बाहेर पडावे लागलं. काही भाळके आमच्यावर आरोप करीत आहेत. त्यांची दुकाने बंद केली. मराठ्यांनो दारु पिवू नका. दारु पित असाल तर सोडा. दारु पिणारांची भाकरी बायकांनी बंद करावी असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले. मराठ्यांनी एकमेकांवर केसेस करू नका. शिक्षण महाग झाले आहे. आरक्षणामुळे फी कमी होणार आहे. सरकारी नोकरीत तरुणांना नोकरी मिळणार आहे. केंद्राच्या सर्व योजना लागू होणार आहेत. आपला समाज व्यावसायिक झाला पाहिजे. याकडे मी आता लक्ष दिले आहे. मराठवाड्यातील सर्व मराठा ओबीसी आरक्षणात जाणार. पश्चिम महाराष्ट्रातील चारही गॅजेट लागू होणार. यामुळे कोकणाला फायदा होणार असल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
1500 रुपये लाडक्या बहिणींनो घेवून आंधळे होवू नका
1500 रुपये लाडक्या बहिणींनो घेवून आंधळे होवू नका. लक्ष द्या आयुष्यभराचे उभा करायचे आहे. पुढील पिढी उभी राहिली पाहिजे. सरकारच्या लाडक्या बहिणीच्या फसव्या योजनेत आडकू नका. मुंबईत लाखो मराठे आले. मुंबई महाराष्ट्राचे आंगण आहे. खेळलो बागडलो, पण एकाही महिलेला त्रास दिला नाही असे जरांगे म्हणाले. आता आपण दिल्ली गाठायची आहे. दिल्लीत मराठा जाणार आहेत.
धनंजय मुंडे यांनी माझी 2.5 कोटींची सुपारी दिली होती
माझ्या घातपातामध्ये त्याला क्लीन चिट अजित दादा आणि फडणवीस यांच्या पायावर पडल्याने मिळाल्याचे जरांगे म्हणाले. त्यांच्या गोठात घुसून माझ्या घातपाताचा बेत बाहेर काढला. नार्को टेस्ट साठी मी तयार. मी सगळ्यात आधी अर्ज केला आहे. मी पोलीस संरक्षण सुध्दा घेतले नाही. मला पोलीस नको असे जरांगे म्हणाले. धनंजय मुंडे यांनी माझी 2.5 कोटींची सुपारी दिली होती. याबाबत तीन आरोपींनी कबुली दिली आहे. धनंजय मुंडे यांना चौकशीला बोलवा. नाही बोलवले तर भारी पडेल तुम्हाला असे जरांगे म्हणाले. सत्तेचा माज आहे तुम्हाला. त्यामुळे चौकशी करत नाहीत. सत्ता गेल्यावर सोडणार नाही. तुमची सत्ता मराठा घालवणार असल्याची टीका जरांगे यांनी केली. प्रत्येक गावातील मराठा माझ्या मागे आहेत. जिथं तू मला मारायला येशील तिथे मराठ्यांची पोरं दगड घेवून येतील. तीन आरोपींनी धनंजय मुंडेंचे नाव घेतले असेल तर त्याला अटक करा. आमच्या दोघांची नार्को टेस्ट करा असे जरांगे म्हणाले.