Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे हे इंडिगो विमानाने येत नाही हे तुम्हाला आणि आम्हाला चांगलं माहिती आहे. ते ज्या विमानाने फिरतात त्याला यायला काही अडचणी नाहीत.  आणि जर ते ही नाही वाटलं तर, शिंदे साहेब आणि मी समृद्धी महामार्ग बनवला आहे. वाटलं तर गाडी पाठवून देतो असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. समृद्धी महामार्गाने 7 ते 8 तासात नागपुरात येता येतं असेही मुख्यमंत्री म्हणाले.  

Continues below advertisement

विरोधक मात्र आपल्या उमेदवारांच्या पाठीशी उभे राहिले नाहीत

उद्यापासून विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये होत आहे. या पार्श्वभूमीवर आज महायुतीची पत्रकार परिषद पार पडली, यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. आम्ही गांभीर्याने निवडणूक लढलो. कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहिलो. विरोधक मात्र आपल्या उमेदवारांच्या पाठीशी उभे राहिले नाहीत. कारण आत्ता पराभव झाला तर महापालिका निवडणुकीत जो ब्रॅण्ड ठाकरे दाखवयाचा आहे तो फुगा फुटू नये म्हणून त्यांनी हे केल्याचा टोला देखील मुख्यमंत्री फडणवीसांनी ठाकरेंना लगावला. 

विरोधकांना लोकशाहीवर बोलण्याचा अधिकार नाही

विरोधकांना लोकशाहीवर बोलण्याचा अधिकार नाही, अशी टीका मुख्यमंत्री फडणवीसांनी केली. त्यांना न्यायालय, आरबीआय, विधानमंडळ मान्य नाही त्यामुळे त्यांनी संविधानावर बोलणं योग्य नाही असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. शक्ती विधेयक केंद्र सरकारने पारीत केलं आहे. काही सुधारणा त्यांच्या कायद्यात केल्या आहेत. लोकपाल विधेयक आपलं मंजूर केलं आहे. एक सुधारणा सांगितली आहे. केंद्रीय अधिकाऱ्यांना वगळायचं, कारण ते केंद्राच्या कायद्यात आहे. जनसुरक्षा विधेयक लवकरच येईल असेही मुख्यमंत्री म्हणाले. 

Continues below advertisement

विरोधी पक्षनेतेपद देणं हा आमचा निर्णय नाही

विरोधकांना फक्त आम्हीच दिसतो, विरोधी पक्षनेतेपद देणं हा आमचा निर्णय नाही असे मुख्यमंत्री म्हणाले. वन्यप्राण्यांसंदर्भात प्रश्न सोडवू असेही ते म्हणाले. मागास भागातले प्रश्न सुटले पाहिजे असा आमचा प्रयत्न  असणार आहे. कार्यकर्त्यांची अपेक्षा मोठी होती. सगळीकडे युती होणं शक्य नव्हतं असेही ते म्हणाले. सिरीअसली आम्ही सगळीकडे उतरलो आणि प्रचारात उतरलो. आमची जबाबदारी होती. विरोधी पक्षातले नेते कार्यकर्त्यांना विसरले आहेत. त्यांना वाऱ्यावर सोडल्याची टीका देखील मुख्यमंत्र्यांनी केली. विरोधकांना हारण्याची भीती होती त्यांना असेही ते म्हणाले. 

महत्वाच्या बातम्या:

विरोधकांची नुसती जळजळ मळमळ! महाविकास आघाडीतील मुख्यमंत्रीपद घटनाबाह्य होतं का? एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला