Eknath Shinde : विरोधी पक्षांना एकच सांगणं आहे की, तुम्ही लोकांचा अजेंडा मांडा. आमचा अजेंडा खुर्चीसाठी नाही. आम्ही काम करणारे आहोत, ते स्पीडब्रेकरवाले आहेत, असा टोला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला. त्यांनी काही बोध घेतला पाहिजे. नुसती जळजळ मळमळ आहे. मी मुख्यमंत्री होतो तेव्हा घटनाबाह्य म्हणायचे, आता पण तेच सुरु आहे. किमान अभ्यास तरी करा असे म्हणत नाव न घेता एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला. महाविकास आघाडीतील मुख्यमंत्रीपद काय मग घटनाबाह्य होतं का? असा सवालही त्यांनी केला. जळीस्थळी काष्टीपाशाणी फक्त एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे दिसत असल्याचे ते म्हणाले. उद्यापासून नागरपूरमध्ये विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु होत आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीची पत्रकार पिषद पार पडली. यावेळी एकनाथ शिंदे बोलत होते.

Continues below advertisement

विदर्भातील प्रश्नांना न्याय मिळाला पाहिजे ही शासनाची भूमिका 

हे आपलं दुसरं हिवाळी अधिवेशन आहे . विदर्भातील प्रश्नांना न्याय मिळाला पाहिजे ही शासनाची भूमिका आहे. सत्ताधारी पक्ष देखील समस्यांना आणि विकासाला न्याय देईल. बहिष्कारावर मी काही बोलू इच्छित नाही असे एकनाथ शिंदे म्हणाले. महायुतीच्या पहिल्या टर्ममध्ये विरोधक जोरात होते. बाहेरच आंदोलनं करणं सुरु होतं. विरोधकांना पायऱ्यांवर स्टंट करण्यात धन्यता मानतात. विरोधी पक्ष निष्प्रभ दिसतोय.  त्यांची अवस्था आपण पाहातोय, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली. 

महायुतीला 70 ते 75 टक्के यश मिळेल

महाविकास आघाडी प्रचारात देखील दिसली नाही. त्यांचे नेते घरात होते, कार्यकर्त्यांची निवडणूक होती. आम्ही काही ठिकाणी एकत्र तर काही ठिकाणी वेगवेगळे लढलो. महायुतीला 70 ते 75 टक्के यश मिळेल अशी परिस्थिती असल्याचा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. 

Continues below advertisement

लोकांनी इतकं नाकारलं आहे की त्यासाठी संख्याबळ देखील नाही मिळालं 

विरोधी पक्ष या अधिवेशनात किती विदर्भातले प्रश्न उपस्थित करतो माहिती नाही. मात्र आमची तयारी आहे. आरोग्य, सिंचन शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर उत्तर देऊ असेही एकनाथ शिंदे म्हणाले. विरोधकांना गांभीर्याने घेऊ नका. लोकशाहीत मानसन्मान ठेवणारे आम्ही आहोत. विरोधी पक्ष नेता द्या असे विरोधक म्हणत आहेत. पण ते अधिकार अध्यक्ष सभापचींचे आहेत. लोकांनी इतकं नाकारलं आहे की त्यासाठी संख्याबळ देखील नाही मिळालं असे एकनाथ शिंदे म्हणाले. लोकसभेत मागील वेळेस देखील विरोधी पक्ष नेता नव्हता. अडीच वर्षात अनेक कामं आम्ही केली आणि त्यामुळे लॅंडस्लाईड विजय मिळाला असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. साडे तीन वर्षातलं काम जनतेसमोर आहे. 

महत्वाच्या बातम्या:

विरोधी पक्षनेतेपदावर देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य, विरोधकांवर निशाणा साधत नियमांवर बोट ठेवला