Ajit Pawar : दौंड नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे माजी शहराध्यक्ष स्वप्नील शहा यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात पक्षप्रवेश केला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित होते. दरम्यान, ज्यावेळी अजित पवार भाषण करण्यासाठी उभे राहिले तेव्हा भावी मुख्यमंत्री अजितदादांचा विजय असो, अशा प्रकारची जोरदार घोषणाबाजी झाली. यावेळी अजित पवार म्हणाले की, सकाळपासून कोणीच सापडलं नाही का? मी सापडलो असा टोला अजित पवारांना लगावला. 

Continues below advertisement


दौंड मधील शिवाजी चौकात भाजपचे माजी शहराध्यक्ष स्वप्नील शहा यांचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात पक्षप्रवेश केला. स्वप्निल शहा हे भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा व्यापारी आघाडीचे अध्यक्ष होते. दौंड नगरपरिषद निवडणूक पार्श्वभूमीवर भाजपला मोठा धक्का मनाला जात आहे. 


विकासाची कामं होतायेत की नाही? याकडं लक्ष दिलं पाहिजे


आपल्या भागातील शेतीच्या पाण्याचा, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटतोय का? मूलभूत गरजा पूर्ण होतायेत का? आपल्या इथं विकासाचे काम होतेय का? दर्जेदार इमारती उभे राहतात का? याचा आपण विचार करायला हवा असे अजित पवार म्हणाले. पिंपरी चिंचवडमध्ये काम करताना कुठेही भेदभावा केला नाही. तिथं आज मोठ्या प्रमाणावर विकास झाल्याचे अजित पवार म्हणाले. मोठी उद्योगनगरी, मेट्रो तिथं आली असल्याचे पवार म्हणाले. सगळ्या भागातील लोकं देखील तिथं आहेत. 


महत्वाच्या बातम्या:


शरद पवारांच्या राष्ट्रवादीला दे धक्का, दोन जिल्हाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा; अजित पवारांकडे जाणार?