Gopichand Padalkar : ओबीसींचा एकच नेता आहे तो म्हणजे छगन भुजबळ ते ठरवतील तीच आपली दिशा असणार आहे असं वक्तव्य भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं. तुम्ही ठरवाल ती दिशा आहे, त्यासोबत आम्ही सर्वजण असल्याचे पडळकर म्हणाले. बीडमध्ये आयोजीत केलेल्या ओबीसी मेळाव्यात पडळकर बोलत होते. पुढच्या काळात समाजाला शिव्या दिलेलं खपवून घेतलं जाणार नाही. आपल्यात काही घाईगडबड करायची नाही असेही पडळकर म्हणाले.
भुजबळ साहेबांच्या मागे राहण्याची नितांत गरज
बीड जिल्हा क्रांतिकारी जिल्हा आहे. भगवान बाबा, आद्य कवी मुकुंदराज यांची पावन भूमी आहे. ज्यांचे नाव घेतले तर 12 हत्तींचे बळ येते ते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे आहेत. आज एक दिलाने भुजबळ साहेबांच्या मागे राहण्याची नितांत गरज आहे. काहीजण आमच्या आमच्यामध्ये भांडण लावू पाहत आहेत. आमच सगळ्यांचे ठरले आमचा नेता एकच छगन भुजबळ असल्याचे पडळकर म्हणाले. माधव म्हणजे कृष्ण आता आपण कृष्णनीती अवलंबली पाहिजे. सर्वांनी लढताना सुदर्शन चक्र घ्यायची गरज नाही असेही पडळकर म्हणाले.
धनगरांना ST आरक्षण देण्याची आमची प्राथमिक मागणी
धनगरांना ST आरक्षण द्यायला तुमचा पाठिंबा आहे, तुमचा बापच तिकडे बसलाय तो विरोध करायला लावतोय असेही पडळकर म्हणाले. धनगर समाजाच्या नादी लागू नका. धनगरांना दोन्ही भूमिकेत जावे लागेल. धनगरांना ST आरक्षण देण्याची आमची प्राथमिक मागणी आहे. परंतु 346 जातींचे संरक्षण घ्यायची जबाबदारी धनगरांची आहे. धनगरांना दोन्ही भूमिकेत जावे लागेल असे पडळकर म्हणाले. लढायचे कसे कुठे उभे राहायचे, अधिकारी व्हायचे हे वंजारी समाजाकडून शिकले पाहिजे. माधव आता आपल्याला माधवराव करावा लागेल..रामोशी आणि वडार जोडावा लागेल असेही पडळकर म्हणाले.
ओबीसी चळवळीचा एकच नेता छगन भुजबळ
आपल्यात फूट पाडली जात आहे. आपल्या ओबीसी चळवळीचा एकच नेता छगन भुजबळ आहे. आमच्या बरोबर बसायला आता तुम्हाला कमीपणा वाटतो का? गरीब मराठा समाजाला विरोध नाही, पण त्याचे भांडवल करुन प्रस्थापित समाज गरीब गावगड्यातील समाजाचे सरपंच पद हिसकावून घेत आहेत. आपल्या हातात आहे ते फेकून मारले पाहिजे मी ओबीसी आहे म्हणून. चार दिवसापूर्वी मी बीड मध्ये आलो होतो. धर्म से बडकर जाती नहीं होती, त्यावेळी धर्माचा विषय होता म्हणून आलो आणि आता जाती साठी आलोय असे पडळकर म्हणाले. जो प्रांत खोटा जात दाखला देईल त्याला बीडच्या तुरुंगात टाका असे पडळकर म्हणाले.
जात निहाय जनगणना होईल तेव्हा तुमचा बाजार उठेल
एकजण आमची संख्या 5 कोटी आहे म्हणतो. 17 जिल्ह्यात 5 कोटी असतात का रे? असा सवाल पडळकरांनी केला. जात निहाय जनगणना होईल तेव्हा तुमचा बाजार उठेल. भुजबळांना उभे राहून वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या असेही पडळकर म्हणाले. तुम्ही दोन दिल्या तर आमच पोरग एक तरी देईल. कोणी कितीही अन्याय करायचा प्रयत्न केला तरी धक्का लागू शकत नाही असे पडळकर म्हणाले.