Ravikant Tupkar : नांदेडमध्ये रविकांत तुपकर यांच्या उपस्थित शेतकरी आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर गेल्यानंतर रविकांत तुपकर व पोलिसांमध्ये बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळालं. यावर बोलताना रविकांत तुपकर म्हणाले की, पोलिसांनी आमच्यावर दादागिरी करू नये. पोलिसांनी सरकारचे आणि लोकप्रतिनिधींचे नोकर होऊन नाचू नये अशी टीका तुपकरांनी केली. 

Continues below advertisement

पोलिसांकडून धक्काबुक्की झाली, हात धरले, महिला पोलिसांनी शिवीगाळ केली, तुपकरांचे आरोप

आज नांदेडमध्ये शेतकरी आक्रोश मोर्चाचे आयोजन केले होते. यावेळी रविकांत तुपकर आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है असे रविकांत तुपकर म्हणाले. आम्ही कोणत्याही दादागिरीला भीक घालत नाही. आमचं आंदोलन अतिशय शांततेच्या मार्गाने सुरू असताना, पोलिसांकडून धक्काबुक्की झाली. हात धरले, महिला पोलिसांनी शिवीगाळ केली असा आरोप क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी दिला आहे.

 प्रशासनाने शेतकऱ्यांना एक रुपयाची मदत केली नाही​

नांदेडमध्ये अतिवृष्टीमुळे शेती पीक बाधित झालेलं आहे. तरीही, प्रशासनाने शेतकऱ्यांना एक रुपयाची मदत केली नाही. याच प्रशासनाकडून आज 'दिवाळी पाडवा' नावाच्या कार्यक्रमावर लाखो रुपये खर्च केले जातात. प्रशासनाने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम करू नये असे रविकांत तुपकर म्हणाले.

Continues below advertisement

सप्टेंबर महिन्यात राज्याच्या विविध भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. अनेक भागात या पावसामुळं जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं होतं. नदी नाल्यांना पूर आल्यामुळं घरांचं, शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. तसेच पिके वाहून गेली होती. दुसऱ्या बाजूला पिकाबरोबर काही ठिकाणी जमिनी देखील वाहून गेल्या आहेत. त्यामुळं राज्याच्या अनेक भागातील शेतकरी संकटात सापडले आहेत. आता ज गावं कसं? असा प्रश्न त्या शेतकऱ्यांच्या समोर उभा राहिला आहे. सरकारकडून मिळणारी मदत ही तुटपुंजी असल्याची टीका देखील शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केली आहे. एका बाजूला आसमानी संकट असताना दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यावर सुलतानी संकट आलं आहे. शेतमालाला योग्य प्रकारचा दर मिळत नसल्यामुळं देखील रविकांत तुपकर आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. आज त्यांनी शेकडो शेतकऱ्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. 

महत्वाच्या बातम्या:

लाठीचार्ज केला, गोळ्या घातल्या तरी मुंबईत जाणाराच, रविकांत तुपकर आंदोलनावर ठाम, खालापूरमध्ये पोलिसांनी अडवला मोर्चा