Manoj Jarange patil : मंडल कमिशनला ओबीसींची जणगणना करा असे सांगण्यात आले होते. मात्र, मंडल कमिशनने नव्यानं जणगणना केली नसल्याचे वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलं. ओबीसींना 14 टक्के आरक्षण दिले. 4 वर्षात ते 30 टक्के झालं. चार वर्षांत 60 टक्के लोकसंख्या कशी वाढली असा सवाल जरांगे पाटलांनी केला. ते अकलूजमध्ये आज जाहीर सभेमध्ये बोलत होते. मराठ्यांनो भानावर या. तुमचे मतभेद बाजूला ठेवा आणि आरक्षणासाठी एकत्र या. 40 वर्ष एकमेकांशी पटत नसलेले एका रात्रीत एकत्र आले आणि त्यांना लाल दिवा मिळाला असेही जरांगे पाटील म्हणाले. 


1 जून 2004 मध्ये मराठा कुणबी एकच असल्याचा जीआर पारित झाला होता. त्या जीआरमध्ये दुरुस्ती करा अशी मागणी केली आहे. पारित केलेला खोटा कायदा आम्हाला मान्य नाही असे जरांगे पाटील म्हणाले.  ही सभा नाही ही लेकरांची वेदना आहे. त्यांना न्याय देण्यासाठी तुम्ही इथे एकत्र आला आहेत.  पश्चिम महाराष्ट्रात लोकं एकत्र येत नाही असं लोकं म्हणतात. तुम्ही मात्र रेकॉर्ड मोडल्याचे पाटील म्हणाले. 


कुणबी प्रमाणपत्र द्यायला अडचण काय? 


हा लढा शेवटचा समजून ताकतीने लढायचे आहे. सरकारने वेळ घेतला आहे. सावध राहा सरकारला कुणबी प्रमाणपत्र द्यायला अडचण काय? असा सवालही जरांगे पाटलांनी केला. कुणबीला सुधारित शब्द आला शेती म्हणून काय परिस्थिती बदलली का? असे जरांगे पाटील म्हणाले. ज्याला आरक्षण घ्यायचे त्यांनी घ्यावे, गोरगरिबांच्या अंनात माती कालवू नका असे जरांगे पाटील म्हणाले. 75 वर्षात सर्व पक्षांना मोठे केले. आता उपकार फेडण्याची वेळ आल्यावर विरोध नको. सर्व सामान्य मराठा आता एकत्र आला आहे. एक इंचही नियत ढळू दिली नाही. गद्दरीची पैदास माझी नाही. सामान्य मराठ्यांची झालेली एकी काही जण फोडू शकले नाहीत असेही जरांगे पाटील म्हणाले. 


आपल्यावर खूप अन्याय झालाय, अन्यायाची जाणीव राहू द्या, आरक्षणासाठी आपल्या मराठा बांधवानी बलिदान दिले, हे बलिदान विसरता येणार नाही. मराठा बांधवांच्या बायकांच्या कपाळावरचे कुंकू पुसलं, याची आपल्याला आठवण ठेवायला लागणार आहे. त्यामुळे हा पहिला आणि शेवटचा लढा समजून एवढ्या ताकदीनं उभं राहा की आरक्षण पदरात पडलंच पाहिजे, असं कळकळीच आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले. 


महत्त्वाच्या बातम्या:


खानदानी मराठ्याची औलाद कुणाला ऐकत नसतो, सरकारनं वेळ मागितलाय, पण आपण दिलेला नाही : मनोज जरांगे