Chandrashekhar Bawankule on Maha Vikas Aghadi: मुंबई : कंत्राटी भरतीवरुन महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) राज्य सरकारवर (Maharashtra Government) आरोप करतंय, त्यामुळे मविआनं नाक घासून जनतेची माफी मागावी, आज (शनिवारी) 10 वाजेपर्यंत माफी मागितली नाही तर राज्यभर आंदोलन करु, अशा इशारा भाज प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी महाविकास आघाडीला दिला आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी नाक घासून माफी मागावी, अशी मागणी भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केली. कंत्राटी भरतीवरून महाराष्ट्रातील लाखो बेरोजगार तरुणांची दिशाभूल करण्याचे काम उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलंय. कंत्राटी भरतीचे महापाप करणारे उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले, मविआनं महाराष्ट्राची नाक घासून माफी मागावी, असं बावनकुळे म्हणाले आहेत. उद्धव ठाकरे यांचा खोटारडेपणा देवेंद्र फडणवीस यांनी उघड केला आहे, असा दावा बावनकुळेंनी केला आहे.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि शरद पवार गटाचे नेते कंत्राटी भरतीला घेऊन राज्य सरकार आरोप करत होते. खरंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), शरद पवार (Sharad Pawar) आणि नाना पटोले (Nana Patole) हे पिसाळयासारखे राज्य सरकारवर खोटे आरोप करत होते. त्यामुळे त्यांनी नाक घासून जनतेची माफी मागावी. शनिवारी सकाळी 10 पर्यंत माफी मागायला वेळ देत आहे, नाही तर भारतीय जनता पक्ष राज्यभर मोठं आंदोलन उभं करेल."
कंत्राटी भरती हे कॉंग्रेसनं केलेलं पाप : चंद्रशेखर बावनकुळे
बावनकुळे नागपूर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. कंत्राटी भरतीचा निर्णय रद्द केल्याबद्दल महायुती सरकारचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे अभिनंदन करून बावनकुळे म्हणाले, मविआ सरकारच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कंत्राटी भरतीच्या शासन निर्णयावर सही केली. आता तेच कंत्राटी पद्धती देवेंद्र फडणवीस यांनी आणली असं म्हणून दोष देत नौटंकी करत आहेत. त्यांच्यासारखा खोटारडा माणूस मी पाहिला नाही. कॉंग्रेसचं सुशील कुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आणि मविआचे उद्धव ठाकरे यांनी कंत्राटी पद्धतीनं भरती केली. त्याचा पुरावा समोर आला आहे. कंत्राटी भरती हे कॉंग्रेसनं केलेलं पाप आहे, असं म्हणत बावनकुळेंनी इशारा साधला आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावं हिच भाजपची भूमिका : चंद्रशेखर बावनकुळे
"मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही भाजपची भूमिका आहे. आम्ही मराठा आरक्षणाचा कायदा केला होता, मात्र महाविकास आघाडी सरकारला तो टिकवता आला नाही. मराठा आरक्षणाचा कायदा करून त्यांना न्याय मिळाला पाहिजे हिच भाजपाची भूमिका आहे.", असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत. सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र हा विषय तांत्रिकदृष्ट्या मला माहीत नसल्याचंही यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.