मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा वाद चांगलाच रंगताना दिसत आहे. मनोज जरांगेंनी त्यांच्या एका भाषणावेळी 'लायकी' शब्द वापरला आणि ओबीसी नेत्यांनी त्यावरुन जरांगेंना (Manoj Jarange) चांगलच टार्गेट केलं होतं. मात्र आता मनोज जरांगेंनी लायकी शब्द मागे घेत असल्याचं स्पष्ट सांगितलं. यावेळी भुजबळांसाठी (Chhagan Bhujbal) नाही तर प्रकाश आंबेडकरांच्या (Prakash Ambedkar) सल्ल्याने हा शब्द मागे घेतो असं मनोज जरांगेंनी सांगितलं. 

Continues below advertisement

मनोज जरांगे यांनी त्यांच्या एका भाषणात बोलताना 'ज्यांची लायकी नाही त्यांच्या हाताखाली काम करावं लागतंय' असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर वंचितचे प्रकाश आंबेडकरांनी त्यावर प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर आता मनोज जरांगे यांनी आपण लायकी हा शब्द मागे घेत असल्याचं जाहीर केलं. तसेच मराठ्यांना न्याय मिळावा हाच हेतू असल्याचं मनोज जरांगे यांनी सांगितलं. 

भुजबळांमुळे नाही तर प्रकाश आंबेडकरांमुळे शब्द मागे

लायकी हा शब्द मागे घेताना तो छगन भुजबळांमुळे नाही तर प्रकाश आंबेडकरांमुळे मागे घेत असल्याचं मनोज जरांगे म्हणाले. ते म्हणाले की, प्रकाश आंबेडकरांचा सल्ला आपण ऐकला आहे. प्रकाश आंबेडकर हे एका उंचीचे नेते आहेत. त्यांनी जे बोललं ते पटलं आहे. पण प्रकाश आंबेडकरांमुळे हा शब्द मागे घेतो, त्या भुजबळांमुळे नाही. भुजबळ हे सवैंधानिक पदावर असले तरीही काहीही बरळतात. त्यांना काय म्हणायचं ते म्हणू ते. 

Continues below advertisement

काय म्हणाले होते प्रकाश आंबेडकर? 

ते म्हणाले होते की, जरांगेंनी कोणत्या अँगलने तो शब्द वापरला ते माहिती नाही. पण त्यांनी मराठा समाजाच्या नेत्यांबद्दलच तो शब्द वापरला असावा. कारण मराठा समाजाचे एवढे नेते मुख्यमंत्री झाले, मंत्री झाले, पण त्यांनी समाजासाठी काहीही केलं नाही. 

धुळे आणि नांदेडमध्ये सभा

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यासह विविध मागण्यासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांची येथे 3 डिसेंबरला धुळ्यात जाहीर सभा होणार आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर मराठा सेवा संघाकडून तयारीला वेग आला आहे. तर 8 डिसेंबरला मनोज जरांगे पाटलांची नांदेड जिल्ह्यात चार ठिकाणी सभा होणार आहे.

ही बातमी वाचा: