Manoj Jarange on Chhagan Bhujbal Sharad Pawar meet: ओबीसी नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या भेटीवर छगन भुजबळ गेला काय अन्  राहिला काय याच्याशी घेणं देणं नसल्याची भूमिका मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी घेतली आहे. यावेळी तो लई बेईमान आहे. खाणार तिथेच घाण करणार असं म्हणत जरांगेंनी भूजबळांविराेधात गरळ ओकली आहे.


मराठा ओबीसी आरक्षणप्रश्नी अंग काढता येणार नाही


अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी आज खासदार शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवार यांच्या निवासस्थानी सिल्वर ओक येथे ही भेट झाली. महाराष्ट्रातील मराठा ओबीसींना आरक्षण देण्याच्या प्रकरणी तुम्हाला लक्ष काढून घेता येणार नाही असं छगन भुजबळ यांनी पवारांना सांगितल्याचे सांगण्यात येत आहे.


दरम्यान, मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे यांनी या भेटीवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते लई बेइमान आहे, जिथे खाणार तिथेच घाण करणार असं म्हणत जरांगेंनी भूजबळांविषयी गरळ ओकली आहे.


जरांगेंचा भूजबळांवर निशाणा


तो कोणाचाच नाही, फक्त स्वतःचं घर कसं भरायचं हे बघतो असं म्हणत मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीका केली आहे. सरकार आणि विरोधक सारखेच आहेत. त्यांना सामान्य जनतेचे घेणेदेणे नाही. हे यांच्या यांच्यात ठरवणार, हे सांगणार जा.. हे सांगणार नको जाऊ..यांचा राजकारण यांनी सेटल करून घेतलंय, असं म्हणत मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा छगन भुजबळांवर निशाणा साधलाय.


गेले काय, राहिले काय आम्हाला घेणंदेणं नाही


छगन भुजबळ गेला काय आणि राहिला काय कुठे बसलाय याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही. ते लय बेईमान आहे, त्याच्या नरड्यात किती हात घाला कोरडाच निघणार असं म्हणत मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ व शरद पवार यांच्या भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे.


"त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला..." 


आजची परिस्थितीही काहीशी तशीच आहे. तुम्ही बैठकीला आले नाहीत. तर त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला माहिती नाही, जरांगेंना मंत्री आणि मुख्यमंत्री भेटले, त्यांनी काय चर्चा केली, काय आश्वासने दिली माहिती नाही. तुम्ही अखेर ओबीसी नेत्यांची उपोषण सोडायला गेला, त्यांना काय सांगितलं ते सुद्धा आम्हाला माहिती नाही, असं शरद पवारांनी सांगितलं. 


हेही वाचा:


दीड तासांची भेट, बिछान्यावर बसून चर्चा, शरद पवार नेमकं काय म्हणाले, छगन भुजबळांचा शब्द अन् शब्द जसाच्या तसा!