Manoj Jarange: बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत (MLA Rajendra Raut) यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. आमदारांना काहीही बोलता, मी तब्येतीची विचारपूस करायला गेलो तर माझ्याबद्दल ही काहीही बोललात हाच का तुमचा सुसंस्कृतपणा आहे का असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. तर आपल्याला शिवरायांनी हीच शिकवण दिली का? असा रोखठोक सवाल आमदार राजेंद्र राऊत  (MLA Rajendra Raut) यांनी मनोज जरांगेंना (Manoj Jarange) केला त्यावर आज मनोज जरांगे यांनी उत्तर देताना त्यांचा बोलवता धनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्याचं म्हटलं आहे. 


राजेंद्र राऊत यांनी चूक केली....


त्याचबरोबर राजेंद्र राऊत यांनी चूक केली त्यांनी मला छेडलं. त्यांनी सर्वात मोठी चूक केली आहे. आता त्यांनी फितुरीचे संस्कार दाखवू नयेत. निवडणुकीत पडलं तरी चालेल किंवा जिंकलं तरी चालेल. पण तुमचे संस्कार दाखवू नका. कारण देवेंद्र फडणवीसांनी एक नवा डाव टाकला आहे. सगळी कोलीत त्यांच्या हतात आहेत. मी उगाच कोणाला बोलत नाही. फितुरीचे बळ देवेंद्र फडणवीसांनी राऊतांना दिले आहेत. बाकी कोणाला ओबीसी एक होत नाही, त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी डाव रचला आहे. त्यामुळे आमदार राजेंद्र राऊतांना दोष देऊन उपयोग नाही असं म्हणत मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी राजेंद्र राऊत यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे.


राऊतांच्या सोबत 'विनाशकाले विपरीत बुद्धिः असा देवेंद्र फडणवीस यांचा त्याच्या माध्यमातून खेळ....


देवेंद्र फडणवीसांनी डाव टाकला. सगळे यंत्र त्यांच्या हातात आहेत. ओबीसी एक होत नाही. तू मराठ्यांचा आहे उठ, होऊ देत मराठ्यांच्यात फुटाफूटी सर्व बळ आम्ही पुरवतो. ओबीसी पण तुमच्याकडून होईल. मराठे देखील तुमच्याकडून होतील. देवेंद्र फडणवीसांना माहिती नाही आता उलट राज्यातील मराठा जास्त विरोधात जाणार आहेत. त्यांच्या हातात सर्व दिलं आहे, मात्र त्यांचा नाईलाज आहे. राऊतांच्या सोबत 'विनाशकाले विपरीत बुद्धिः असा देवेंद्र फडणवीस यांचा त्याच्या माध्यमातून खेळ झाला आहे, असं म्हणत राऊतांचा बोलनता धनी देवेंद्र फडणवीस असल्याची टीका मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी केली आहे. 


महायुतीच्या नेत्यांकडून कागद घेऊन लिहून आणा


तर महायुतीला पाडून महाविकास आघाडीला निवडून आणायचा पाप तुमच्या मनात नसेल तर तुम्ही महाविकास आघाडीकडून ओबीसीतून आरक्षण देण्याबाबतीची भूमिका लिहून घ्या, देवेंद्र फडणवीस आणि महायुतीकडून भूमिका लिहून घ्यायची जबाबदारी माझी, त्यांनी लिहून दिलं नाही तर आमदार राजेंद्र राऊत राजकीय संन्यास जाहीर करेल अशा शब्दात त्यांनी जरांगेंना आव्हान दिलं होतं, त्यावर बोलताना जरांगे पाटील म्हणाले, मी कशाला आणून लिहून तुम्ही आणून द्या, तुम्ही सत्तेत आहात. आधी तुमची भूमिका सांगा लिहून द्या, तुमची भूमिका जाहीर करा, त्यांच्याकडून कागद घेऊन लिहून आणा. विरोधकांनी लिहून दिला नाही तर त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही. आम्ही सगळं सांगितलं आहे, आता आरसा क्लिअर आहे, मी इमानदारीने शब्द देतो, दिलेला शब्द मी मागे घेत नाही, तुम्ही लिहून आणा, आणि दाखवा मला पण दाखवू नका, बार्शीतील कोणत्याही मराठा समाजाच्या बांधवाला दाखवा, तुम्ही सत्तेत आहात तर करून दाखवा असं उलट आव्हान जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी राजेंद्र राऊत यांना दिलं आहे. 


राऊतांच्या इशाऱ्यावर जरांगेंचं उत्तर


'त्याचबरोबर जर ज्या मराठ्याच्या छाव्याला डिवचायचा प्रयत्न केला तर आमचं घराणे हे मराठे आणि हिंदवी स्वराज्यसाठी रक्त सांडणारे घराणे आहे. खंडोजी खोपडेच्या भूमिकेत याल तर राजा राऊत म्हणतात मला, काय परिणाम होतील याची नोंद संपूर्ण महाराष्ट्र करेल, माझं डोकं तुम्ही फिरवू नका. मी जर मराठ्यांची गद्दारी केली तर शिवरायांच्या चरणी नतमस्तक होऊन सांगतो बार्शीतील पांडे चौकात फाशी घेईन, प्रामाणिक मराठा म्हणून माझ्या दारात आलात तर पेढा भरवीन पण खंडोजी खोपडेच्या भूमिकेत आलात तर मोठी शिक्षा भोगावी लागेल हे राजा राऊतचं चॅलेंज आहे, कोण मराठा बोलत नव्हता पण हा पठ्या बोललाय आज, किती तुकडे व्हायचे आणि किती करायचे याचं भान मला ही राहणार नाही', अशा शब्दात छाती बडवत आमदार राजेंद्र राऊत (Manoj Jarange) यांनी अप्रत्यक्षपणे मनोज जरांगे यांना दम भरला होता त्यावर मनोज जरांगे (Manoj Jarange)'मला काढायचं होतं उकरून ते गेलं बरळून' असं म्हणालेत.