बीड : नागरी सेवा परीक्षा 2019 चा निकाल केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून जाहीर करण्यात आला झाला आहे. यात बीड येथील महावितरणमध्ये अभियंता म्हणून सेवानिवृत्त झालेले जयंत पत्की यांचे चिरंजीव मंदार पत्की यांनी देशात 22 क्रमांक मिळवत घवघवीत यश मिळवले आहे.


बीड येथील संस्कार विद्यालयात शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर मंदार याने शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, पुणे येथून पॉलिटेक्निकचे शिक्षण घेतले. त्यानंतर विश्‍वकर्मा इन्स्टिट्यूट पुणे येथून त्याने मॅकनिकल इंजिनियरिंगची पदवी प्राप्त केली. त्यानंतर मंदार याने ज्ञान प्रबोधनी पुणे येथून केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा 2019 साली दिली होती. या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. त्यामध्ये पहिल्याच प्रयत्नात मंदारने अवघ्या 23 व्या वर्षी मोठे यश मिळवले आहे.


मंदार म्हणाला, आजचा दिवस माझ्यासाठी खूप आनंदाचा आहे तेवढाच आनंद माझ्या आई-वडिलांना देखील आहे. मी माझ्या आई वडिलांचे स्वप्न व माझं स्वप्न आज पूर्ण केले. मी दिवसातले दहा ते बारा तास अभ्यास करायचो. पहिला नंबर पटकावण्याची प्रत्येकाचे स्वप्न असते. मात्र प्रत्येकाला पहिला नंबर मिळेल हे शक्य नाही. त्यामुळे आज मला जो क्रमांक भेटला आहे तो माझ्यासाठी खूप आनंददायी आहे. माझं आयएएस होण्याचं स्वप्न मी पहिल्यापासूनच उराशी बाळगले होते. आई-वडिलांना देखील सांगून ठेवलं होतं मी भविष्यात आय ए एस ऑफिसर बनणार आहे. तुम्ही तुमचे ध्येय निवडलं तर तुम्ही त्याच्यावर कायम राहायला हवं कारण ध्येयाकडे वाटचाल करताना इतर गोष्टींकडे लक्ष जात नाही. मी आठवीमध्ये असताना अधिकारी बनण्याचे स्वप्न निश्चित केलं होतं आणि ती मी सिद्ध करून दाखवलं आहे.



मंदारचे वडील जयंत पत्की म्हणाले, पालक म्हणून कोणत्याही आई-वडिलांना मुलं म्हणून जे करून दाखवायचं असतं ते आज माझ्या मंदारन करुन दाखवलेले आहे. त्याचं स्वप्न होतं त्याने मेहनत घेतली आम्ही त्याला कधी तू हे कर असं बजावलं नाही माझे मत मी त्यावर कधी लादले नाहीत. त्याचे इंजिनिअरिंगला सिलेक्शन झाले होते. सहा लाख रुपयांचे पॅकेज मिळते होते. माझी रिटायरमेंट आली होती त्यावेळेस तो थोडा खचून गेला होता. मात्र मी त्याला सांगितले तू तुझे स्वप्न सोडू नकोस भले मी काही करेल त्याने तो शब्द फार मनावर घेतला. तो सोशल मीडियामध्ये तेरा महिने कधी अ्ॅक्टिव्ह राहिला नाही तो आज निकाल लागल्यानंतर सोशल मीडियामध्ये अॅक्टिव्ह झाला. पालक म्हणून माझे एकच सांगणे आहे की, मुलांना त्यांचे स्वप्न ओळखून जर आपण संधी दिली तर निश्चित यशस्वी होतील तेवढी मला खात्री आहे.


संबंधित बातम्या :



UPSC 2019 result | यूपीएससी सिव्हिल सेवा परीक्षा 2019चा अंतिम निकाल जाहीर


WEB EXCLUSIVE | दूर्दम्य इच्छाशक्तीचा जयंत मंकले; नैराश्यावर मात करुन यूपीएससीत घवघवीत यश