UPSC Civil Services Examination 2019 result : संघ लोकसेवा आयोग (यूपीएससी)ने सिव्हिल सेवा परीक्षा 2019चा निकाल जाहीर केला आहे. अंतिम निकाल आयोगाची ऑफिशिअल वेबसाइट upsc.gov.in वर जारी करण्यात आला आहे. विद्यार्थी या वेबसाइटवर जाऊन आपला निकाल पाहू शकतात. सप्टेंबर, 2019मध्ये घेण्यात आलेल्या लेखी परीक्षा आणि फेब्रुवारी-ऑगस्ट, 2020 मध्ये घेण्यात आलेल्या इंटरव्ह्यूच्या आधारावर आयोगाने मेरिट लिस्ट जारी केली आहे. सिव्हिल सेवा परीक्षेत प्रदीप सिंह संपूर्ण देशातून पहिला आला आहे.
परीक्षेत एकूण 829 परीक्षार्थींना यश आलं आहे. श्रेणीनुसार त्यांची संख्या खालीलप्रमाणे :
जनरल - 304
आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्ग - 78
ओबीसी - 251
अनुसूचित जाती - 129
अनुसूचित जमाती - 67
यूपीएससी यशस्वितांपैकी काही महाराष्ट्रातील टॉपर्स :
● नेहा भोसले (रँक 15 )
● मंदार पत्की (रँक 22 )
● आशुतोष कुलकर्णी (रँक 44)
● योगेश पाटील (रँक 63 )
● विशाल नरवडे (रँक 91 )
● राहुल चव्हाण (रँक 109)
●नेहा देसाई (रँक 137 )
● कुलदीप जंगम (रँक 135 )(रँक )
● जयंत मंकाळे (रँक 143 )
●अभयसिंह देशमुख (रँक 151 )
● सागर मिसाळ (रँक 204 )
● माधव गित्ते (रँक 210)
● कुणाल चव्हाण (रँक 211)
● सचिन हिरेमठ (रँक 213)
● सुमित महाजन (रँक 214)
● अविनाश शिंदे (रँक 226)
● शंकर गिरी (रँक 230)
● श्रीकांत खांडेकर (रँक 231)
● योगेश कापसे (रँक 249)
● 497 सुब्रमण्य केळकर (रँक 249)
अंधत्वावर मात करत पुण्याचा जयंत मंकले 143वा
अंधत्वावर मात करत पुण्याचा जयंत मंकले यूपीएससी परीक्षेत 143 वा आला आहे. त्याची मागची रँक 937 होती. त्याला संधी देण्यास यूपीएससी तयार नव्हती. यामुळे एक वर्ष तो नैराश्यात होता. त्यामुळे त्यावर्षी त्याने परीक्षा दिली नाही. मात्र यावेळी पुन्हा जोमाने तयारी करुन त्याने 143व्या क्रमांक पटकावला.
पंढरपूर मधील शेतकरी कुटुंबातील अभयसिंह देशमुखने यूपीएससी परीक्षेत 151 वा रँक पटकावला असून त्याची आयएएससाठी निवड झाली आहे. तर अधिकाऱ्यांचे गाव म्हणून ओळख असलेल्या माढा तालुक्यातील उपलाई बुद्रुक येथील अश्विनी वाकडे हिने 200 वा रँक मिळवला आहे.
पाहा व्हिडीओ : यूपीएससीच्या 2019चा अंतिम निकाल जाहीर; महाराष्ट्रातून अभिषेक सराफ पहिला
UPSC Civil Services Final Result असे चेक करा
- खाली दिलेल्या डायरेक्ट लिंकवर करा
Result Link
https://www.upsc.gov.in/sites/default/files/FR-CSE-2019-040820-ENG.pdf - एक पीडीएफ ओपन होईल
- आता यात रोल नंबर आणि नाव चेक करा
दरम्यान, यूपीएससीच्या मुख्य परीक्षेत एकूण 2304 विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. परीक्षेचा तिसरा टप्पा म्हणजेच, मुलाखतींची प्रक्रिया 17 फेब्रुवारी 2020 पासून सुरु झाली होती. परंतु, कोरोना व्हाययरसचा प्रादुर्भाव आणि लॉकडाऊनमुळे मार्चमध्ये काही मुलाखती स्थगित करण्यात आल्या होत्या. त्यानंतर मुलाखती 20 जुलै ते 30 जुलै दरम्यान घेण्यात आल्या असून यूपीएससीने मुलाखतीत सहभागी झालेल्या सर्व पात्र उमेदवारांना अनेक सुविधा दिल्या होत्या.
यूपीएससी परीक्षा म्हणजे काय?
यूपीएससी सिव्हिल सेवा परीक्षेमार्फत आयएएस, आयपीएस, आयएफएस इत्यादी देशाच्या प्रतिष्ठित सेवांसाठी निवड केली जाते. याव्यतिरिक्त भारतीय रेल्वे खाते सेवा अंतर्गत रेल्वे गट ए आणि भारतीय टपाल सेवेसह काही इतर सर्विसेससाठीही देशभरातून उमेदवारांची निवड केली जाते. ही परीक्षा देशातील सर्वात आव्हानात्मक स्पर्धा परीक्षा मानली जाते.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI