पुणे : पुणे जिल्ह्यातल्या रांजणगावात अभिनेत्री मानसी नाईकची छेडछाड झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 5 फेब्रुवारी रोजी युवासेना जिल्हा प्रमुखाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात हा प्रकार घडला आहे. मानसी नाईकनं याबाबत मुंबईतल्या साकीनाका पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर पोलिसांनी हा गुन्हा रांजणगाव पोलिसांकडे वर्ग केला. 5 तारखेला युवासेना अध्यक्षाचा वाढदिवस होता. या कार्यक्रमात मानसी नाईक नृत्य सादर करत होत्या. त्यावेळी अज्ञात व्यक्तींनी तिची छेड काढली होती. शिवाय कार्यक्रमस्थळी पाठीमागे येऊन दमबाजी केली आणि विनयभंग केला, असं मानसीनं तक्रारीत म्हटलं आहे.


शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याने योग्य वागणूक दिली नसल्याचा अभिनेत्री भाग्यश्री मोटेचा आरोप

मानसीने साकीनाका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. अभिनेत्री मानसी नाईकशी गैरकृत्य केल्याप्रकरणी मानसी नाईक यांच्याकडून मुंबईतील साकीनाका पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. अभिनेत्री मानसी नाईक 5 फेब्रुवारीला शिरूर तालुक्‍यातील रांजणगाव येथे संध्याकाळी वाढदिवसाच्या कार्यक्रमात सादरीकरण करत असताना एका अज्ञात व्यक्तीने त्याच्याशी गैरकृत्य केल्याप्रकरणी मानसी नाईककडून तीन जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

साकीनाका पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत पुढील तपासासाठी रांजणगाव पोलिसांकडे गुन्हा वर्ग केला आहे. 3 जणांवर 354 आणि 506 प्रमाणे साकीनाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला रांजणगाव येथे कार्यक्रमाच्या स्थळी पाठीमागे येवून दमबाजी करुन विनयभंग केला अशी तक्रार नाईकने पोलिसात दिली आहे.



काही दिवसांपूर्वी शिवसेना पदाधिकाऱ्याकडून योग्य वागणूक मिळाली नसल्याचा आरोप मराठी चित्रपट अभिनेत्री भाग्यश्री मोटे हिने केला होता. यासंदर्भात तिने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. गडचांदूर नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी गेले असता हा प्रकार घडल्याचं तिने आपल्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं. या प्रकरणी राजुरा विधानसभा संपर्क प्रमुखाने माफी मागावी, अशी मागणी भाग्यश्रीने केली होती.  गडचांदूर नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी मराठी चित्रपट अभिनेत्री भाग्यश्री मोटे हिला आमंत्रीत करण्यात आलं होतं. यावेळी योग्य सुविधा दिल्या नसल्याचा आरोप भाग्यश्रीने केला होता.