VIDEO : माथेफिरुने कुत्र्याला गाडीला बांधून फरफटवत नेलं!
एबीपी माझा वेब टीम | 14 Apr 2018 03:00 PM (IST)
व्हिडीओ शूट केल्यानंतर माथेफिरुनेच हा व्हिडीओ व्हाट्सअपवर पोस्ट केला. विशेष म्हणजे पोलिस अधीक्षक चंद्रकुमार मीना ज्या व्हाट्सअप ग्रुपचे अॅडमिन आहेत, त्यांच्याच ग्रुपवर याने हा व्हिडीओ टाकला.
नांदेड : माणसांमधली माणुसकी संपत चालली आहे का, अशी शंका यावी अशी घटना नांदेडमध्ये घडली आहे. एका माथेफिरुने कुत्र्याला दुचाकीला बांधून फरफटत नेले. नांदेड शहरातल्या वाघीरोड परिसरातला हा व्हिडीओ आहे. इम्तियाज सय्यद असं या माथेफिरुचं नाव आहे. साखळीनं या कुत्र्याला बांधून हा माणूस त्याला खेचत नेत आहे. यामुळे हा कुत्रा जिवाच्या आकांतानं ओरडतो आहे. पण या माथेफिरुला याची थोडीही दया येत नाही. व्हिडीओ शूट केल्यानंतर माथेफिरुनेच हा व्हिडीओ व्हाट्सअपवर पोस्ट केला. विशेष म्हणजे पोलिस अधीक्षक चंद्रकुमार मीना ज्या व्हाट्सअप ग्रुपचे अॅडमिन आहेत, त्यांच्याच ग्रुपवर याने हा व्हिडीओ टाकला. या सगळ्या प्रकारानंतर पोलीस अधीक्षकांनी इम्तियाजवर कारवाई करण्याचे आदेश दिले. मात्र सध्या हा माथेफिरु फरार असल्याचं कळतं आहे. पाहा व्हिडीओ :