गिरीश महाजन हे गेल्या 25 वर्षांपासून आपल्या मतदारसंघात म्हणजेच जामनेर शहरात आंबेडकर जयंतीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीमध्ये सहभागी होत आहेत. या मिरवणुकीमध्ये ते केवळ सहभागीच नव्हे तर त्यात लेझीमच्या तालावर सबंध मिरवणूकभर नाचत देखील असतात. राज्याचे जलसंपदा मंत्री हे पद मिळाल्यावर देखील त्यांनी आपली ही परंपरा कायम ठेवली आहे.
जामनेर शहरात जयभीम नगरातून निघालेल्या मिरवणुकीत खास निळा शर्ट परिधान करुन मोठ्या उत्साहात गिरीश महाजन हे कार्यकर्त्यांसोबत लेझीमच्या तालावर नाचत असताना बघायला मिळाले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन उपस्थितांना त्यांनी शुभेच्छाही दिल्या.
पाहा व्हिडीओ :