फटाके फोडण्यास विरोध, तरुणाच्या मारहाणीत वृद्धाचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 02 Nov 2016 07:24 AM (IST)
सोलापूर : फटाके फोडण्यास विरोध केल्याने तरुणाच्या मारहाणीत एका वृद्धाचा मृत्यू झाला आहे. सोलापुरात ही धक्कादायक घटना घडली. काशीनाथ शंकर यामजले असं मृत वृद्ध व्यक्तीचं नाव असून ते 80 वर्षांचे होते. फटाके फोडण्याच्या कारणावरुन दोघांमध्ये बाचाबाची झाली. काशीनाथ यामजले यांनी घरापुढे फटाके फोडू नको असं सांगितल्याने चिडलेल्या राहुल जमादार या 20 वर्षीय तरुणाने त्यांना मारहाण केली. या घटनेत काशीनाथ यामजले यांचा मृत्यू झाला. बझार पोलिसांनी आरोपी राहुल जमादारला बेड्या ठोकल्या आहेत.