लातूर : लातूर जिल्ह्यातील वलांडी गावात एका व्यक्तीला जिवंत जाळण्यात आल्याची धक्कादायब बाब समोर आली आहे. या प्रकारात संबंधित व्यक्ती संपूर्णपणे जळून खाक झाला आहे. त्यामुळे त्याची ओळख पटवणे अवघड झालं आहे.
लातूरच्या देवणी तालुक्यातील वलांडी गावाजवळ हा मृतदेह सापडला आहे. वलांडीजवळील अचवला बेटाजवळ आज सकाळी एका पुरुषाचा मृतदेह सापडला आहे. रस्त्यालगत मिळालेलं हे प्रेत संपूर्णपणे जळालेलं होतं. त्यामुळे त्याची अद्याप ओळख पटवण्यात आलेली नाही. घटनास्थळाजवळ पडलेले टायर आणि ट्यूब मृतदेहावर टाकून तो जाळण्यात आला आहे.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. तसंच पुढील तपास सुरु केला आहे. या व्यक्तीची हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या व्यक्तीचा मृतदेह पूर्णपणे जळालेला असल्यामुळे त्याची ओळख पटवण्यात पोलिसांना अडचणी येत आहेत.