बीडमध्ये शाळकरी मुलीवर चाकूहल्ला, नागरिकांकडून हल्लेखोराला चोप
एबीपी माझा वेब टीम | 23 Jan 2017 10:06 AM (IST)
बीड : परळीमध्ये शाळेत जात असलेल्या आठवीतल्या विद्यार्थिनीवर तरुणाने चाकूहल्ला केला. परळी शहरातील नाथ टॉकीज जवळ सकाळी साडेआड वाजता ही घटना घडली. हल्लेखोराने विद्यार्थिनीवर चाकूचे तीन वार केले. सतीश मंत्री असे या 24 वर्षीय हल्लेखोराचे नाव आहे. स्थानिक नागरिकांनी हल्लेखोराला पकडून बेदम चोप दिला आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. दरम्यान, चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या विद्यार्थिनीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हल्ल्याचं कारण अस्पष्ट आहे. मात्र, हल्लेखोराची मानसिक अवस्था ठीक नसल्याचीही माहिती मिळते आहे. या घटनेसंदर्भात पोलिस पुढील तपास सुरु आहे.