पुण्यात 15 वर्षीय मुलीचं अपहरण करुन बलात्कार
एबीपी माझा वेब टीम | 12 Oct 2016 01:27 PM (IST)
पुणे : पुण्यातील खडकीमध्ये 15 वर्षीय मुलीचं अपहरण करुन तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. खडकी पोलिस स्टेशनमध्ये 35 वर्षीय राकेश शिंदेविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. 30 सप्टेंबर रोजी ही घटना घडली होती. दरम्यान, आरोपी पसार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहे. पीडित मुलगी आरोपी राकेश शिंदे याच्या शेजारीच राहत होती. राकेश शिंदे विवाहित असून तो ड्रायव्हर म्हणून काम करतो. पीडित मुलगी त्याला आधीपासूनच आवडत होती. ही बाब तिच्या आईच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी घर बदललं. परंतु आरोपीने त्या घरी जाऊन मुलीचं अपहरण केलं. तिला निर्जन स्थळी घेऊन गेला. मारहाण करुन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तो तिथून पसार झाला.