काळी जादू केल्याचा आळ, आजीवर हल्ला करणारा नातू अटकेत
एबीपी माझा वेब टीम | 07 Nov 2018 06:20 PM (IST)
आजीने विरोध करताच आरोपी नातू वसंत गुठेने खिशातून चाकू काढून तिच्या डोक्यावर वार केला.
प्रातिनिधिक फोटो
पालघर : काळी जादू करत असल्याच्या संशयातून आजीला त्रास देणाऱ्या तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पालघरमधील तलासरी तालुक्यात करजगाव-पाटील पाड्यातून 23 वर्षांच्या वसंत गुठेला अटक करण्यात आली. वसंत मंगळवारी आपली 55 वर्षांची आजी सखू गुठेच्या घरी गेला. तू काळी जादू करतेस, असा आरोप करत त्याने आजीशी वाद घालायला सुरुवात केली. तिने विरोध करताच वसंतने खिशातून चाकू काढून तिच्या डोक्यावर वार केला. 'पीटीआय'ने यासंदर्भात वृत्त दिलं आहे. आजी-नातवाचं भांडण पाहून वसंतची मामी मध्ये पडली, मात्र आरोपी वसंतने तिच्यावरही हल्ला केला. ठाणे पोलिसांनी कलम 323 अंतर्गत वसंतवर गुन्हा नोंदवला. त्यानंतर वसंतला राहत्या घरातून अटक करण्यात आली.