मुंबई : मुलांकडून संपत्तीसाठी होणाऱ्या मानसिक छळामुळे विजय शिवतारेंची अवस्था दयनीय झाल्याचा आरोप कन्या ममता शिवदीप लांडे-शिवतारे यांनी केला आहे. विनय शिवतारेंकडून सातत्याने बदनामी करण्याची धमकी मिळत होती, हे सगळं असह्य झाल्याने विजय शिवतारे यांना पहाटे हृदयविकाराचा झटका आल्याचं ममता लांडे-शिवतारे यांनी सांगितलं. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून तशा प्रकारचा आरोप केला आहे. 

अवघ्या दीड-पावने दोन वर्षांपूर्वी राज्यातील महत्वाचं खातं सांभाळणाऱ्या विजय शिवतारे यांची आताची अवस्था अत्यंत दयनीय असून त्यांच्यावर मुंबईतील एका रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हे सगळं सुरु असताना त्यांच्या घरातील कौटुंबिक वाद चव्हाट्यावर आला आहे. शिवतारे यांच्या कुटुंबात दोन गट पडल्याचं समोर आलं असून एका  बाजूला विजय शिवतारे आणि त्यांची कन्या ममता तर दुसऱ्या बाजूला शिवतारे यांच्या पत्नी मंदाकिनी आणि त्यांची दोन मुलं विनय आणि विनस आहेत.

ममता लांडे-शिवतारे यांनी एका फेसबुक पोस्टच्या माध्यमातून विनय आणि विनस शिवतारे यांच्यावर वडिलांचा छळ करत असल्याचा आरोप केला आहे. विजय शिवतारे हे राजकारणी आहेतच, सोबत ते उद्योजक आहेत. त्यांच्या कंपन्यांची वाटणी त्यांनी आपल्या दोन मुलांत केली आहे. जेजुरीतील इथेनॉल प्लांट आहे तो आपल्या नावावर करुन द्यावा असा दबाब विनय आणि विनस शिवतारे आपल्या वडिलांवर टाकत असल्याचा आरोप ममता शिवतारे यांनी केला आहे. 

 

दुसऱ्या बाजूला विजय शिवतारे यांच्या पत्नी मंदाकिनी शिवतारे यांनी आपल्या दोन मुलांची बाजू घेतली असून त्यांनीही फेसबुकवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये गेली 27 वर्षे विजय शिवतारे हे आपल्यासोबत राहत नसून इतर महिलांसोबत राहतात असा आरोप त्यांनी केला आहे. शिवतारे कुटुंबियामध्ये जो काही वाद आहे तो संपत्तीसाठी नाही असंही त्यांनी सांगितलं आहे. 

विजय शिवतारे यांच्यावर गेल्या वर्षी प्रकृती गंभीर असताना बायपास सर्जरी करण्यात आली होती. गेल्या दीड वर्षांपासून त्यांना किडनीचा आजार जडला आहे. त्यामुळे एक दिवसाआड त्यांना डायलीसिसला सामोरं जावं लागतंय. आता त्यांना पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना मुंबईतील एका खासगी रुग्णालयातील आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं आहे. हे सर्व सुरु असताना शिवतारे कुटुंबियांमधील कौटुंबिक कलह चव्हाट्यावर आला आहे.

पहा व्हिडीओ : Vijay Shivtare : शिवसेनेचे माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांना हृदयविकाराचा झटका

 

महत्वाच्या बातम्या :