मुरबाड: माळशेज घाटात पुन्हा दोन-तीन ठिकाणी मध्यम आकाराचे दगड आणि माती रस्त्यावर आली आहे.


 

काल बोगद्याजवळ दरड कोसळली होती. त्यामुळे  नगर, मंचर, नारायणगाव आणि जुन्नरवरून होणारी वाहतूक पुन्हा ठप्प झाली होती. पावसामुळे पुन्हा त्याच ठिकाणी दरड कोसळल्यानं घाटातील वाहतूक ठप्प झाली आहे.

 

दरड कोसळल्यामुळे पुणे आणि नगरमधून मुंबईकडे येणाऱ्या भाजीपाला आणि जीवनाआवश्यक वस्तूंची वाहतूक करणारी वाहने घाटात अडकली आहेत.

 

दरम्यान, पावसाचा जोर जास्त असल्यानं दरड हटवणं शक्य नसल्याचं समजतं आहे. त्यामुळे आज सकाळी दरड हटवण्याचा कामाला सुरुवात होणार होती, पण सततच्या मुसळधार पावसामुळे या कामात व्यत्यय येत आहे. गेल्या काही दिवसांपासून याठिकाणी दरड कोसळत होती.

दरम्यान महाराष्ट्रात सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळत असल्यामुळे इतर घाटांमधील  दरड कोसळली होती. यात करूळ, आंबोली घाटांचाही समावेश आहे.

 

संबंधित बातम्या :

माळशेज घाटात पुन्हा एकदा दरड कोसळली, वाहतूक ठप्प


आंबोली धबधब्याजवळ दरड कोसळली