पुणे : पुणे जिल्ह्यातील माळीण गाव 2014 मध्ये झालेल्या दुर्घघटनेतून सावरु लागलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज माळीण गावच्या पुनर्वसनाच्या कामाचं उद्घाटन करण्यात येणार आहे. माळीण गावात घरं, शाळा आणि मंदिरांचं बांधकाम करण्यात आलं आहे. पुणे जिल्ह्यातील माळीण गावावर 30 जुलै 2014 रोजी दरड कोसळली होती. या दुर्घटनेत संपूर्ण गाव मातीखाली गाडला गेला होता. माळीण दुर्घटनेने अनेकांना सुन्न करून सोडले होते. साखरझोपेत असताना संपूर्ण गाव मातीखाली गेला होता. राज्य सरकारनं माळीण गावचं पुनर्वसन केलं आहे. त्यामुळे आज माळीणच्या रहिवाशांना पुन्हा त्यांचं हक्काचं घर मिळणार आहे. माळीण दुर्घटनेत 151 जणांचा बळी गेला होता. तसंच काहींचे संपूर्ण कुटुंब मातीखाली गाडलं गेलं होतं, तर काही घरातील कर्त्या पुरुषांचा मृत्यू झाला होता.