धुळे : धुळ्यात उष्माघातानं एका एसटी ड्रायव्हरचा मृत्यू झाला आहे. प्रमोद आनंदा कोळी असं या 36 वर्षीय ड्रायव्हरचं नाव आहे. काल सकाळी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारांदरम्यान त्यांना मृत घोषित करण्यात आलं.


धुळे बसस्थानकात काल सकाळी साडेअकराच्या सुमारास प्रमोद कोळी उष्माघातानं चक्कर येऊन कोसळले. अक्कलकुवा एसटी डेपोमध्ये ते सेवा बजावत होते. चक्कर येऊन पडल्यानंतर त्यांना तातडीनं धुळे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र त्यांना मृत घोषित करण्यात आलं.

याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. धुळे शहराचं तापमान सध्या 42 अंश सेल्सिअस आहे. गेल्या आठवड्याभरातील उष्माघाताने मृत्यूची ही दुसरी घटना आहे.