सातारा : साताऱ्यात पुणे-बंगळुरु महार्गावरील डी मार्टसमोर एका खासगी बसने ट्रकला धडक दिली. या अपघातात बसमधील सहा प्रवासी जागीच ठार झाले आहेत. तर 20 प्रवास जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान, या बसमधील प्रवासी कर्नाटकमधील असल्याचे वृत्त आहे.
महामार्गावरून कोल्हापूरकडे मालवाहतूक करणारा ट्रक जात होता. यावेळी सातारा शहराजवळच्या खंडेवाडीजवळून जात असताना ट्रकचे टायर फुटले. ट्रकचालकाने ट्रकवर निंयत्रण मिळवत ट्रक जागीच थांबवला. त्याचवेळी एक ट्रॅव्हल्स ट्रकमागून भरदाव वेगाने येत होती. ट्रक रस्त्याच्या मध्येच थांबवल्यामुळे ट्रॅव्हल्स ट्रकला पाठीमागून धडकली. या भीषण अपघातात सहा प्रवासी जागीच ठार झाले आहेत. तर 20 प्रवासी जखमी झाले आहेत.
साताऱ्यात ट्रक आणि खासगी बसच्या भीषण अपघातात सहा जण जागीच ठार, 20 जखमी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
12 Sep 2019 08:10 AM (IST)
साताऱ्यात पुणे-बंगळुरु महार्गावरील डी मार्टसमोर एका खासगी बसने ट्रकला धडक दिली. या अपघातात बसमधील सहा प्रवासी जागीच ठार झाले आहेत. तर 20 प्रवास जखमी झाले आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -