मुंबई : पुणे-सोलापूर महामार्गावर उरुली कांचन हद्दीत भीषण अपघात झाला. दोन ट्रकनी एकमेकांना जोरदार धडक दिली.
या अपघातात 11 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी चार जणांची प्रकृती गंभीर आहे.
जखमी पैकी काही जण इंदापूर परिसरातील तर काही उमरगा परिसरातील आहेत.
खेडेकर मळा येथे पहाटे चार वाजण्याच्या सुमारास वाळूची वाहतूक करणारा ट्रक आणि टायरची वाहतूक करणारा ट्रक यांच्यात धडक झाली.
जखमींना लोणी काळभोर येथील विश्वराज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.