मुंबई : 'मॅग्नेटिक महाराष्ट्र कन्व्हर्जन्स 2018' या गुंतवणूकदारांच्या परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 43 सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या करारामुळे महाराष्ट्रात 12 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे.

सामंजस्य करारात देश विदेशातील नामांकित उद्योग समूहांचा समावेश आहे. भविष्यात महाराष्ट्रात कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक होणार असून मोठया प्रमाणात रोजगार निर्मिती होईल. करारावेळी राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

‎प्रामुख्याने स्पॅनडेक्स 12 हजार 350 कोटी, जिनस पेपर नंदुरबार 1 हजार 50 कोटी, येस बँक 10 हजार कोटी, राज बिल्ड इन्फ्रा एलएलपी, 2 हजार 946 कोटी, के. रहेजा डेव्हलपर्स 4 हजार 850 कोटी, छत्रपती शिवाजी महाराज इंडस्ट्रियल सिटी 12 हजार कोटी, क्रेडाई महाराष्ट्र 1 लाख कोटी, नारडेको 90 हजार कोटी, एमसीएचआय क्रेडाई 75 हजार कोटी, खालीजी कमर्शिअल बँक ॲण्ड भूमिराज 50 हजार कोटी, पोतदार हाउसिंग 20 हजार कोटी, मंगल नमोह गृहनिर्माण 25 हजार कोटी, अदानी  ग्रीनएनर्जी लिमिटेड 7 हजार कोटी, टाटा पॉवर कंपनी 15 हजार 560 कोटी, रिन्यू पॉवर व्हेंचर 14 हजार कोटी, जेएनपीटी 7 हजार 915 कोटी, जेम्स ॲण्ड ज्वेलरी 13 हजार 800 कोटी, व्हर्जीन हायपरलूप 40 हजार कोटी, यासह एसबीआय बँक, एचडीएफसी बँक, कोटक बँक, एस बँक, बीव्हीजी लाईफ, नेट मॅजिक, रेडिमेड गारमेंट क्लष्टर, वलसाड जिल्हा सहकारी बँक, कोकण बांबू आणि केन विकास केंद्र, कायनेटीक ग्रीन, बांबू फर्निचर, सोलास इंडस्ट्रिअल सिटी वाडा यांच्यासोबत करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमेरिकेचे भारतातील राजदूत केनेथ जस्ट व रशियाचे भारतातील राजदूत निकोलाय झिलस्तोव्ह यांची भेट घेऊन चर्चा केली. या भेटीत विविध क्षेत्रातील गुंतवणूक कौशल्य विकास व रोजगार निर्मितीबाबत चर्चा करण्यात आली.

संबंधित बातम्या :


पंतप्रधान मोदींच्या हस्ते मॅग्नेटिक महाराष्ट्र 2018 चं उद्घाटन


काय आहे मॅग्नेटिक महाराष्ट्र 2018?


रिलायन्सची सर्वाधिक गुंतवणूक महाराष्ट्रातच : मुकेश अंबानी


'मॅग्नेटिक महाराष्ट्र'च्या आयोजनाची जबाबदारी पुन्हा...